आग्रा – उत्तर प्रदेशातील योगी सरकार भ्रष्टाचारावरून झिरो टॉलरन्स नीती लागू असल्याचा दावा सात्यताने करत आलेली आहे. तसेच योगी सरकारची पोलिस कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत राहत असते. आता असाच एक प्रकार समोर आला आहे. एका ऑटोचालकाने पोलिस आयुक्तांकडे तक्रार दाखल केली आहे, ज्यामध्ये इन्स्पेक्टरने त्यांना मारहाण करून त्यांच्याकडून ३००० रुपये उकळल्याचा आरोप केला आहे. यामुळे आता ही योगी सरकारची झिरो टॉलरंस निती आहे का? असा प्रश्न निर्माण होतो आहे.
हे प्रकरण जगदीशपुरा पोलिस स्टेशन परिसरातील बोडला चौकातील आहे. शाहगंजमधील हमीद नगर येथील रहिवासी जानबाज यांच्या मते, तो ऑटो चालक आहेत. सोमवारी संध्याकाळी 6 वाजताच्या सुमारास त्यांनी बोदला चौकात प्रवाशांना घेण्यासाठी ऑटो थांबवली. दरम्यान, चौकीचे प्रमुख योगेश कुमार यांनी त्यांना मारहाण केली, नंतर शिवीगाळ केली आणि त्यांच्यासोबत असलेल्या कॉन्स्टेबलला त्यांना चौकीत घेऊन जाण्यास सांगितले. कान्स्टेबलने उद्धटपणे वागले, त्यांची ऑटो जप्त केली आणि शांतता बिघडवण्याच्या आरोपाखाली तुरुंगात पाठवण्याची धमकी दिली. त्यानंतर त्यांची पत्नी आली आणि तीने जानबाज आणि ऑटो सोडवण्यासाठी ३००० रुपये दिले. यानंतर जानबाज यांना सोडण्यात आले.
मात्र पोलिस संपूर्ण प्रकरणाबाबत सफाई देत असल्याचे दिसून येते. त्यांचे म्हणणे आहे की इन्स्पेक्टरने ड्रायव्हरला मारहाण केली की ताब्यात घेतले हे तपासात सिद्ध झालेले नाही. जवळच्या सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करण्यात आली आहे, परंतु फुटेजमध्ये असे काहीही दिसत नाही. पोलिस चौकात ऑटो थांबू देत नाहीत, ज्यामुळे ऑटो चालक पोलिसांवर खोटे आरोप करत आहेत. या प्रकरणाची चौकशी सुरू आहे.
एसीपी लोहामंडी गौरव कुमार म्हणाले की बोदला चौकातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी, पोलिस चौकापासून ६० मीटर अंतरावर ऑटोरिक्षा पार्क करू देत नाहीत. यामुळे ऑटोचालक खोट्या तक्रारी करत आहेत. सीसीटीव्ही फुटेजमध्ये ऑटोचालकाला ताब्यात घेतल्याची पुष्टी मिळत नाही. या प्रकरणाची चौकशी सुरू आहे.




