भरघोस नफा मिळवण्याच्या आमिषाने एका महिलेची ५५ लाख रुपयांची फसवणूक; ४५ वर्षांची ओळख म्हणून दाखवला विश्वास

SHARE:

मुंबई – बोरीवली मधे भरघोस नफा मिळवण्याच्या आमिषाने एका महिलेची ५५ लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. 45 वर्षांपासूनची ओळख म्हणून विश्वास ठेवल्याने मुंबईतील दांम्पत्याने एका महिलेला ५५ लाखाला फसवल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. मुंबईमध्ये बोरीवलीतील एका महिलेची ५५ लाख रुपयांची फसवणूक झाल्याची घटना समोर आली आहे. तर या प्रकरणात मुंबईतील खार पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मुंबईमध्ये जास्त नफा मिळवण्याच्या हेतूने अनेकांची आर्थिक फसवणूक होत असल्याचे प्रकार वारंवार उघडकीस येत आहेत. ओळखीच्या व्यक्तींवर विश्वास ठेवून योग्य पडताळणी न करता गुंतवणूक केल्यास मोठे नुकसान होऊ शकते, याचाच प्रत्यय मुंबईत एका महिलेला आला आहे. बोरीवलीतील एका महिलेची ५५ लाख रुपयांची फसवणूक झाल्याची घटना उघडकीस आली आहे. मुंबईमध्ये बोरीवलीतील रहिवासी असलेल्या मनीषा निकम यांचे खार पश्चिमेतील प्रवीण नार्वेकर आणि त्यांची पत्नी प्रमिला नार्वेकर यांच्याशी ४५ वर्षांपासून ओळखीचे संबंध होते.

या ओळखीचा फायदा घेत नार्वेकर यांनी प्रांजल मॅनेजमेंट सर्व्हिस प्रा. लि. या कंपनीच्या माध्यमातून सोन्याच्या व्यवहारात गुंतवणूक करण्याचे आमिष दाखवले. कमी कालावधीत जास्त परतावा देण्याचे आश्वासन देत त्यांनी मनीषा निकम या महिलेस गुंतवणुक करण्यासाठी सांगितले. सप्टेंबर २०२५ मध्ये ५५ लाख रुपये गुंतवल्यास ३ महिन्यांत ९५ लाख रुपये परत देण्याचे आश्वासन देण्यात आले होते. यावर विश्वास ठेवत ५४ सप्टेंबर २०२५  रोजी दोन्ही पक्षांमध्ये कर्ज करार करण्यात आला होता.

त्याच दिवशी ५ लाख रुपये रोख देण्यात आले होते. त्यानंतर १५ सप्टेंबर २०२५ रोजी ५०  लाख रुपये आरटीजीएसद्वारे नार्वेकर दांम्पत्य यांच्या खात्यावर जमा करण्यात आले. विश्वास बसावा म्हणून नार्वेकर यांनी २५ लाख रुपयांचा सिक्युरिटी चेकही दिला होता. मात्र ठरलेली मुदत संपल्यानंतर पैसे परत देण्याबाबत नार्वेकर दाम्पत्याने टाळाटाळ सुरू केली होती. संपर्क साधण्याचा प्रयत्न करूनही समाधानकारक प्रतिसाद मिळाला नाही. काही दिवसानंतर नार्वेकर दाम्पत्याने ९५ लाख रुपयांचा चेक दिला, मात्र तो बँकेत जमा केल्यानंतर बाऊन्स झाला आहे.

यानंतर फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर मनिषा निकम यांनी मुंबईतील खार पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीच्या आधारे मुंबईतील खार पोलिसांनी ३१ मार्च २०२६ रोजी प्रवीण नार्वेकर आणि प्रमिला नार्वेकर या दांम्पत्याच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ४५  वर्षांपासूनची ओळख असुनही मुंबईतील प्रवीण नार्वेकर आणि प्रमिला नार्वेकर या दांम्पत्याने एका महिलेला ५५ लाखाला फसवले आहे. आता या प्रकरणात अधिक तपास खार पोलिस करत आहेत.

Leave a Comment

अधिक वाचा