मुंबई – वाहनांवर अवैधरित्या शासकीय दिवे व सायरन लावून फिरणाऱ्यांविरोधात मुंबई पोलिसांकडून कडक कारवाई करण्यात आली आहे. मुंबईतील मंत्रालय परिसरात वाहनांवर अवैधरित्या शासकीय दिवे व सायरन लावून फिरणाऱ्यांविरोधात कडक कारवाई केली आहे. मुंबईमध्ये वाहनांवरील बेकायदा दिवे आणि सायरन जप्त केले आहेत. मुंबई पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. मुंबई पोलिसांनी पुढील काळात अशा प्रकारच्या नियमभंगावर आणखी कडक कारवाई करण्याचा इशारा दिला आहे.
वाहनांवर अवैधरित्या शासकीय दिवे व सायरन लावून फिरणाऱ्यांविरोधात मुंबई वाहतूक पोलिसांनी कडक कारवाई केली आहे. गेल्या २ दिवसांत मुंबईत ८० वाहनांवर कडक कारवाई केली आहे. तर त्या वाहनांवरील त्यांवरील लाल, निळे आणि पिवळे फ्लॅश लाईटस तसेच सायरन जप्त करण्यात आले आहेत. या सर्व वाहनचालकांवर राज्यातील मोटार वाहन कायद्यांतर्गत दंडात्मक कडक कारवाई करण्यात आली आहे. राज्याचे मंत्रालय आणि विधानभवन परिसरातच अशा गाड्यांवर ही कडक कारवाई करण्यात आली आहे.
राज्यातील वाहतूक पोलिस प्रशासनाच्या दृष्टीने हा गंभीर मुद्दा आहे. मुंबईतील वाहतूक पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, राज्यातील मोटर वाहन कायदा अंतर्गत नियमांनुसार केवळ आपत्कालीन सेवा, कायदा-सुव्यवस्था राखणाऱ्या यंत्रणा आणि अधिकृत शासकीय वाहनांनाच अशा दिव्यांचा वापर करण्याची परवानगी आहे. मात्र, राज्यातील अनेक खासगी वाहनचालक प्रतिष्ठा दाखवण्यासाठी किंवा वाहतुकीत सवलत मिळवण्यासाठी बेकायदा दिवे आणि सायरनचा वापर करत असल्याच्या तक्रारी सातत्याने येत होत्या.
या कारणामुळे मुंबई वाहतूक पोलिसांनी ही कडक कारवाई सुरू केली आहे. अशा प्रकारच्या दिव्यांचा गैरवापर केल्यामुळे इतर वाहनचालकांमध्ये संभ्रम निर्माण होतो, तसेच वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करण्यास काही जण प्रवृत्त होतात. याशिवाय, अशा वाहनांचा गैरवापर करून गंभीर गुन्ह्यांमध्येही वापर होण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे या प्रकरणाला केवळ वाहतूक नियमभंग म्हणून न पाहता सुरक्षेच्या दृष्टीनेही गंभीर बाब आहे.
मुंबई पोलिसांनी पुढील काळात अशा प्रकारच्या नियमभंगावर आणखी कडक कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. बेकायदा दिवे किंवा सायरन लावलेले आढळल्यास संबंधित वाहनचालकांवर मोठा दंड आकारला जाणार आहे. शिवाय वाहनाची नोंदणी रद्द केली जाईल. काही गंभीर प्रकरणांमध्ये गुन्हा दाखल केला जाणार आहे, व कडक कारवाई केली जाणार आहे. तसेच, नागरिकांनीही अशा प्रकारच्या बेकायदा वापराबाबत जागरूक राहावे, असे आवाहन मुंबई पोलिसांनी केले आहे. राज्यात कोणतेही वाहन बेकायदा दिवे किंवा सायरन वापरत असल्याचे दिसल्यास त्याचा फोटो किंवा माहिती मुंबई वाहतूक पोलिसांच्या अधिकृत सोशल मीडिया हँडलवर पाठवावी, असेही सांगण्यात आले आहे.
गाडीवरती दिवे लावून फिरणे ही प्रतिष्ठेची बाब मानली जाते. काहीजण तर वाहनात अतिमहत्त्वाची व्यक्ती असल्याचे भासवून टोल माफ करून घेणे, नो पार्किंग परिसरात देखील वाहने उभे करणे, रुग्णवाहिकेप्रमाणे वाहतूक कोंडीतून वाट मोकळी करून घेणे, यासाठी लाल, पिवळ्या, निळ्या दिव्यांचा वापर करतात. तर नागरिकांनी गाडीवरती बेकायदेशीर दिवे लावू नये. वाहनांवर अवैधरीत्या दिवे, सायरन दिसल्यास संबंधित चालक, मालकावर मोटार वाहन कायद्यांतर्गत दंड आकारला जाणार आहे, असे मुंबईतील वाहतूक पोलिस प्रशासनाने म्हटले आहे.





