बनावट आंबा रॅकेटवर पोलिसांची कडक कारवाई; २०० किलो बनावट आंबे जप्त, बाजारातून खरेदी करतांना बारकाईने लक्ष द्यावे

SHARE:

हैद्रराबाद – बनावट आंबा रॅकेटवर पोलिसांनी कडक कारवाई केली आहे, तर या कारवाईत २०० किलो बनावट आंबे जप्त करण्यात आले आहेत. हैदराबाद मधील बाजारपेठेत बनावट आंब्यांच्या तस्करीच्या रॅकेटचा भांडाफोड करण्यात आला आहे. या कारवाईत २०० किलो बनावट आंबे जप्त केले आहे.
उन्हाळा सुरु झाला की आंबा बाजरपेठेत येतो. कारण वर्षभरातून फक्त उन्हाळ्यातच आंब्यांची आवक बाजारपेठेत होते. त्यामुळे बाजार पिवळ्या आंब्यांची भरून जातो.

पण हेच पिवळे आंबे नागरिकांच्या आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकतात. असाच एक धक्कादायक प्रकार हैद्रराबादमधून उघडकीस आला आहे. हैद्रराबादच्या बाजारपेठेत बनावट आंब्याची विक्री होत असल्याचा प्रकार समोर आला आहे. हे बनावट आंबे खाल्ल्याने अनेक लोक आजारी पडत आहेत. या माहितीवरून पोलिसांनी अचानक हैदराबादमध्ये काही ठिकाणी धाड टाकली आहे. हैदराबादमध्ये बाजापेठेत एका फळ विक्रेत्याकडून २००  किलो बनावट आंबे हे जप्त केले आहेत.

हैद्रराबाद पोलिसांनी कडक कारवाई करत एका आंबा तस्करी रॅकेटचा भांडाफोड केला आहे. हैदराबाद शहरात बनावट आंबे ही बाजापेठेत विक्रीसाठी मोठ्या प्रमाणात आणले जातात. माहितीनुसार हैद्रराबाद खाद्य सुरक्षा अधिकारी आणि हैदराबाद पोलिसांनी संयुक्तपणे शहराच्या विविध भागात धाडी टाकल्या आहेत. या कारवाईदरम्यान अनेक धक्कदायक प्रकार उघडकीस आले आहेत. ग्राहकांच्या शरीराशी खेळले जाणारे आंबे हे कॅल्शिअम कार्बोईडसारख्या घातक रसायनांचा वापर करून आंबे पिकवले जात होते.

हैदराबाद पोलिसांनी घटनास्थळावरून २०० किलो आंबे आणि घातक केमिकल रसायनांची पाकिटे जप्त केली आहेत. हे असे आंबे शरीरासाठी धोकादायक आहेत. केमिकल रसायनांचा अति प्रमाणात वापर करून आंबे बाजारात विकले जात होते. कॅल्शियम कार्बोईडने पिकवलेले आंबे खाल्ल्याने घसा खवखवणे, पोटात दुखणे उलट्या आणि जुलाब यांसारखे त्रास होऊ शकतात. दीर्घकाळ अशा बनावट फळांचे सेवन केल्यास मज्जासंस्था आणि श्वसनाचा गंभीर आजारांचा धोका होऊ शकतो.

उन्हाळात आंब्यांची मागणी ही दिवससेंदिवस वाढत जाते. या वाढत्या मागणीचा फायदा घेऊन जास्त आणि लवकर पैसे कमवण्यासाठी काही फळ विक्रेते बनावट आंबे विकून ग्राहकांना फसवतात. आणि याचा परिणाम ग्राहकांच्या शरीराशी होतो. ग्राहकांनी फळे खरेदी करताना अधिक सावधगिरी बाळगावी काही संशयास्पद दिसल्यास प्रशासनाशी संपर्क साधावा, असे आवाहन हैदराबाद पोलीस प्रशासनाने केले आहे.

हैदराबादमधील ग्राहकांनी फळे खरेदी करताना अधिक सावधगिरी बाळगावी आणि संशयास्पद वाटल्यास प्रशासनाशी संपर्क साधावा असे हैदराबाद प्रशासनाने म्हटले आहे. तसेच बाजारातील वाढत्या मागणीचा फायदा घेण्यासाठी काही आंबा व्यापारी हे आंबा विक्रीसाठी चुकीच्या व अनैतिक मार्गांचा अवलंब करत आहेत. त्यामुळे हैदराबादमधील अशा बनावट फळ विक्रेत्यांवर कायदेशीर कडक कारवाई करण्याचे आदेश हैदराबाद प्रशासनाने दिले आहेत.

Leave a Comment

अधिक वाचा