मुंबई – मंत्रालयाच्या अर्थ खात्यातील अधिकार्याला ६ लाख रुपयांची लाच घेताना एसीबीकडून अटक करण्या आली आहे. अर्थ खात्यातला मंत्रालयातील अधिकार्याला सहा लाखांची लाच घेताना अटक केली आहे. राज्यातील लाचखोर अधिकार्यांंविरुद्ध उघडलेल्या मोहिमेत आता अर्थ आणि नियोजन विभागाचा अधिकारी सापडला आहे. निधी मंजूर करून देण्यासाठी ६ लाख ३७ हजार रुपयांची लाच स्वीकारताना कक्ष अधिकारी विलास लाड याला एसीबीने खारघर परिसरात अटक केली आहे.
माहितीनुसार, ग्रामविकास विभागाचा निधी मंजूर करून देण्यासाठी अधिकारी विलास लाड याने संबंधित व्यक्तीकडे ६ लाखाची मागणी केली होती. शासकीय कामासाठी अडवणूक करून लाचेची मागणी होत असल्याची तक्रार एसीबीकडे प्राप्त झाली होती. या तक्रारीची दखल घेत एसीबीने सापळा रचून ६ लाख ३७ हजारांची लाच स्वीकारताना अधिकारी विलास लाड याला अटक केली आहे. एसीबीच्या पथकाने नवी मुंबईतील खारघर परिसरात सापळा रचला होता.
मंत्रालयातील कामासाठी अशा प्रकारे उघडपणे लाच घेण्याचे हे दुसरे मोठे प्रकरण समोर आल्याने राज्यात मोठी खळबळ उडाली आहे. राज्याच्या प्रशासनातील लाचखोर अधिकार्यांचे पुन्हा एकदा भ्रष्टाचाराचे प्रकरण समोर आले आहे. राज्यातील लाचखोर अधिकाऱ्यांवर आता एसीबी नजर ठेवणार आहे. भ्रष्टाचाराला थांबवण्यासाठी एसीबीकडून कडक कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईमुळे राज्याच्या प्रशासनातील लाचखोर अधिकाऱ्यांवर आता एसीबीचे लक्ष राहणार आहे.
राज्याच्या प्रशासनातील भ्रष्टाचार कोणत्याही परिस्थितीत सहन केला जाणार नाही, असा स्पष्ट संदेश या कारवाईतून पुन्हा एकदा देण्यात आला आहे. राज्यातील मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या कार्यालयात काम करणाऱ्या क्लर्कलाही काही दिवसांपूर्वी एसीबीकडून अटक झाली होती. राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या कार्यालयातील क्लर्कला ५० हजारांची लाच घेताना अटक केले होते. एसीबीने क्लर्कला अटक करण्यात आल्यामुळे महायुती सरकारमधील राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री अडचणीत आले होते.





