शेतकरी आणि दिव्यांगांच्या न्यायासाठी बच्चू कडूंचा मोठा निर्णय; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश

SHARE:

मुंबई – राज्यातील वंचित, कष्टकरी आणि विशेषतः दिव्यांग बांधवांचे खंबीर नेतृत्व म्हणून ओळखले जाणारे माजी मंत्री बच्चू कडू यांनी आज एक महत्त्वपूर्ण राजकीय पाऊल उचलले आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत बच्चू कडू यांनी जाहीर प्रवेश केला असून, यामुळे राज्याच्या राजकारणात नव्या समीकरणांची नांदी झाली आहे.

​प्रवेशाचा मुख्य हेतू ‘शेतकरी आणि दिव्यांगांना न्याय’
​प्रवेशावेळी आपली भूमिका स्पष्ट करताना बच्चू कडू म्हणाले की, “केवळ सत्तेसाठी नाही, तर राज्यातील शेतकरी आणि दिव्यांग बांधवांच्या प्रलंबित प्रश्नांना मार्गी लावण्यासाठी आणि त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी मी हा निर्णय घेतला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यपद्धतीवर विश्वास ठेवून ही नवी सुरुवात करत आहे.”
​उपमुख्यमंत्र्यांकडून स्वागत
​या प्रसंगी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बच्चू कडू यांचे स्वागत केले. “बच्चू कडू हे जमिनीवर काम करणारे कार्यकर्ते आहेत. त्यांच्या येण्याने सामान्य माणसाचा आवाज सरकारमध्ये अधिक बुलंद होईल. शेतकरी आणि दिव्यांगांच्या कल्याणासाठी आम्ही कटिबद्ध आहोत,” असे त्यांनी यावेळी नमूद केले.


​विधानपरिषदेची उम्मेदवारी जाहीर होताच माजी मंत्री बच्चू कडू यांनी शिवसेनेत प्रवेश केला. बच्चू कडू यांच्या प्रवेशामुळे शिवसेनेला विदर्भात आणि ग्रामीण भागात मोठे बळ मिळणार आहे. तसेच सत्तेत राहून दिव्यांग मंत्रालयाच्या माध्यमातून सुरू असलेल्या कामांना अधिक गती देण्याचा मानस असल्याचे यावेळी बच्चू कडू यांनी सांगितले. ​शेतकरी आणि दिव्यांगांच्या हितासाठी बच्चू कडू यांनी घेतलेल्या या निर्णयाचे त्यांच्या समर्थकांकडून स्वागत होत आहे.

Leave a Comment