तामिळनाडू – चाणक्य टुडेडने एक्झिट पोलचे आकडे समोर आणले आहे. तामिळनाडू, केरळम, आसाम आणि पुद्दुचेरी विधानसभेत कोण सत्तेत येणार आणि कोण बाहेर होणार याची उत्सुकता ताणली गेलेली आहे. ४ मे रोजी पश्चिम बंगालसह चार राज्यांचा निकाल समोर येईल.
देशातील पाच राज्यातील मतदान प्रक्रिया पूर्ण झाली आहे. आता सर्वांना ४ तारखेच्या निकालाकडे लक्ष लागले आहे. पश्चिम बंगाल, तामिळनाडू, आसाम, केरळ आणि पद्दुचेरी विधानसभान निवडणूक २०२६ निकाल समोर येईल. आता सर्वांचे लक्ष एक्झिट पोलच्या आकडेवारीकडे आहे. इंडिया टुडेने टुडेज चाणक्य एक्झिट पोल जाहीर केला आहे. यापूर्वी पश्चिम बंगालच्या अंतिम टप्प्यातील निकालानंतर लागलीच अनेक एजन्सींनी एक्झिट पोल जाहीर केले आहे. पश्चिम बंगाल वगळून केरळम, आसाम, तामिळनाडू आणि पुद्दूचेरी विधानसभा निवडणुकीचा कौल जाहीर करण्यात आला आहे.
आसामध्ये भाजपचे कमबॅक?
आसाम एक्झिट पोल विषयी चाणक्यने आकडेवारी जाहीर केली आहे. या कौलनुसार, एनडीएला स्थानिक विधानसभा निवडणुकीत मोठे यश मिळताना दिसत आहे. सर्व्हेत एनडीएला जवळपास ५० टक्के मतदानाचा वाटा मिळताना दिसत आहे. अर्थात काँग्रेससह इतर सहकारी पक्षाने यावेळी भाजपला काँटे की टक्कर दिल्याचे दिसून आले आहे. टुडेज चाणक्यनुसार, आसाम विधानसभा निवडणूक २०२६ च्या एक्झिट पोलमध्ये एनडीएला दणदणीत विजय मिळेल. भाजपसह एनडीएच्या युतीला १०२ जागा मिळतील. याशिवाय काँग्रेस आघाडीला २३ जागा आणि अधिक एक जागा मिळेल.
केरळममध्ये UDF ची मुसंडी, डाव्यांची कडवी झुंज
केरळम विधानसभा निवडणुकीत यावेळी कडवी झुंज दिसली. टुडेज चाणक्यनुसार, युडीएफसह एलडीएफला जोरदार मतं मिळतील. तर भाजपला २० टक्के मतदान मिळेल. तर इतरांच्या वाट्याला २ टक्के मतदान पडेल. युडीएफला १४० पैकी ६९ जागा, एलडीएफला ६४ , भाजपला ७ आणि इतर पक्षांच्या खात्यात ०-१ जागा जातील. डाव्यांच्या सत्तेला इथं आखेरचा सर्वात मोठा आघात होणार आहे. त्रिपुरा, पश्चिम बंगालनंतर केरळमधून डावे सत्तेतून हद्दपार होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
तामिळनाडूत टीव्हीकेचा जोर, डीएमकेला बहुमत
तामिळनाडूत यंदा टीव्हीकेची जोरदार चर्चा आहे. विधानसभा निवडणूक २०२६ मध्ये टुडेज चाणक्यच्या एक्झिट पोलमध्ये डीएमके आघाडीला स्पष्ट बहुमत मिळताना दिसत आहे. डीएमकेला १२५ जागा मिळू शकतात. तर त्याखालोखाल टीव्हीके एक मोठी शक्ती म्हणून समोर येईल. टीव्हीकेला एक या निवडणुकीत ६३ जागा मिळू शकतात. तर AIDMK च्या झोळीत ४५ जागा पडू शकतात. एक जागा अपक्षाला जाऊ शकते.






