नाशिक – टंचाई निर्माण झाल्यामुळे, कांदा व धान्य मार्केट 25 मे पासून बेमुदत बंद राहणार आहे. डिझेल टंचाईमुळे सोमवारपासून नाशिक जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये लिलाव बंद करण्यात येणार आहे. राज्यात ही इंधन टंचाई निर्माण झाली आहे. आशिया खंडातील सर्वात मोठी कांदा बाजार समिती म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लासलगाव बाजार समितीतील व्यापार्यांनी सोमवार 25 मे 2026 पासून कांदा व धान्याचे पुर्ण लिलाव बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
तसेच, जोपर्यंत नाशिक जिल्ह्यात डिझेलचा पुरवठा सुरळीत होत नाही, तोपर्यंत देशातील अन्य राज्यांमध्ये कांदा व धान्य पाठविणेही बंद ठेवण्याचे निश्चित करण्यात आले आहे. या निर्णयामुळे नाशिक जिल्ह्यातील शेतमालावर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. नाशिक जिल्ह्यातील इतर बाजार समित्यांनी हेच धोरण स्वीकारण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचा परिणाम नाशिक जिल्ह्यातून अनेक भागांत जाणाऱ्या भाजीपाला आणि इतर शेतमालावर होणार आहे.
केंद्रातील सरकारने मागील आठवड्यात 2 वेळा पेट्रोलियम पदार्थांच्या किमती वाढवल्यानंतर अचानक डिझेलची टंचाई निर्माण झाली आहे. प्रशासन आणि राज्य सरकारकडून डिझेल व पेट्रोल मुबलक प्रमाणात उपलब्ध असल्याचा दावा केला जात आहे. तरी राज्यात प्रत्यक्ष परिस्थिती वेगळी असल्याचे दिसून येत आहे. राज्यातील ग्रामीण भागात शेतीसाठी आवश्यक डिझेल उपलब्ध होत नसल्याने शेतकरी बांधवांच्या शेतीकामांवर मोठा परिणाम होत आहे.
दुसरीकडे, हिरवा भाजीपाला, कांदा व धान्य बाजार समितीत लिलावासाठी आणण्यासाठी शेतकऱी बांधवांकडे वाहनांसाठी डिझेल उपलब्ध नसल्याने आवकही कमी होत आहे. कांदा पिकांचे भाव कमी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नाशिक जिल्ह्यातील कांदा शेतकर्यांचे नुकसान होणार होणार आहे. लासलगाव कांदा मार्केट आणि नाशिकमधील इतर व्यापाऱ्यांनी सोमवार 25 मे 2026 पासून मोठी अडचण निर्माण होण्याची शक्यता आहे, असे म्हटले आहे.
नाशिक जिल्ह्यातील कांदा व इतर शेतीपिकांचा शेतीमाल देशातील अनेक राज्यांत पाठविण्यासाठी वाहनचालकांना इंधन वेळेवर उपलब्ध होत नसल्यामुळे नाशिक जिल्ह्यातील बाजार समितीतील कांदा व धान्याचे लिलाव बेमुदत बंद राहणार आहेत. नाशिक जिल्ह्यातील लिलाव ठप्प झाल्यास कांद्याचे दर आणखी घसरण्याची भीती व्यक्त केली जात आहे. नाशिक जिल्ह्यातील व्यापारी असोसिएशनने सोमवारपासून कांदा व धान्य लिलावात सहभागी होणार नसल्याचे पत्र बाजार समितीला दिले आहे.
राज्यातील इंधन टंचाईमुळे केवळ व्यापारीच नाही, तर शेतकरी, ट्रान्सपोर्ट व्यावसायिक, आणि अडते व्यापारी यांनाही इंधन अंचाईचा फटका बसणार आहे. नाशिक जिल्ह्यातील लासलगाव कांदा बाजारपेठ बंद राहिल्यास त्याचा परिणाम पुर्ण देशातील कांदा पुरवठ्यावर होईल. आणि देशातील अनेक राज्यांमध्ये कांद्याचे भाव वाढू शकतात. त्यामुळे आता सरकारच्या चुकीच्या नियोजनांमूळे राज्यांत इधन टंचाई निर्माण झाली आहे. व राज्यातील शेतकरी बांधव आणि सर्वसामान्य लोकांच्या अडचणी वाढल्या आहेत.
Author: विवेक गंगाधरराव राऊत
Cheif Editor, Rayat Rakshak News, Maharashtra.






