शिर्डीत बोगस पेढ्यांचा फज्जा: अन्न व औषध प्रशासनाची उत्पादक व विक्रेत्यांवर धडक कारवाई!

SHARE:

अहिल्यानगर – अन्न व औषध प्रशासनाने शिर्डीत बोगस पेढा प्रकरणात विक्रेते व उत्पादकांवर कारवाई केली आहे.शिर्डीतील बुरशीयुक्त पेढ्यांबाबत नागरिकांकडून तक्रारी आल्यानंतर अन्न आणि औषध प्रशासन जागे झाले आहे.अहिल्यानगर मध्ये गेल्या काही दिवसात अन्न व औषध प्रशासनाने कारवाई करत आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील माफिया, भेसळखोर लोकांवर कडक कारवाई होत आहे. शिर्डीत भाविकांच्या आरोग्याशी प्रसादाच्या नावाखाली आरोग्याशी खेळ सुरू असल्याचे समोर आले आहे.

शिर्डीत प्रसादाच्या नावाखाली भेसळयुक्त आणि निकृष्ट दर्जाच्या पेढ्यांची विक्री होत असल्याचे उघड झाले आहे. काही नागरिकांनी बुरशीयुक्त पेढ्यांबाबत तक्रारी केल्यानंतर अन्न आणि औषध प्रशासनाने कारवाई सुरू केली आहे. दररोज हजारो तर वर्षाकाठी करोडो भाविक शिर्डीत येतात. अनेक भाविक साई मंदिर परिसरातील खाजगी दुकानदारांकडून पेढे विकत घेतात. मात्र या दुकानांमध्ये विकल्या जाणाऱा पेढा प्रसादावर पॅकेजिंग आणि एक्सपायरी डेट, तसेच हा पेढा नेमका कुठे? आणि कोण बनवतो? याबाबत कोणताही उल्लेख नसल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

शिर्डी परिसरात अनेक वर्षांपासून दगडासारख्या पेढा प्रसादाची भाविकांना विक्री केली जात आहे. पॅकिंग केलेल्या पेढ्यांना बुरशी लागल्याचे प्रकरण समोर आले आहे. प्रसादाच्या नावाखाली भाविकांच्या आरोग्याशी खेळ सुरू आहे. शिर्डी नगरपालिकेसह अन्न व औषध प्रशासनाचे दुर्लक्ष झाल्यामुळे भाविकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. निकृष्ट दर्जाच्या पेढ्यांमुळे भाविकांमध्ये तीव्र नाराजी असून, श्रद्धेच्या नावाखाली भाविकांच्या आरोग्याशी सुरू असलेला हा मृत्युचा खेळ थांबणार तरी कधी? असा प्रश्न उपस्थित होतो आहे.

यामुळे शिर्डीत येणार्या भाविकांच्या तक्रारीवरून अन्न व औषध प्रशासनाने अहिल्यानगरमधील शिर्डीतील पेढे विक्रेते आणि उत्पादकांवर कारवाईला सुरूवात केली आहे. शिर्डीत बोगस पेढा प्रसाद विक्री होत असल्याची माहिती समोर येताच अन्न व औषध प्रशासनाने गंभीर दखल घेतली आहे. शिर्डीतील अनेक दुकानांमध्ये अन्न औषध प्रशासनाचे अधिकारी दाखल झाले आहेत. शिर्डीतील पेढे आणी इतर खाद्यपदार्थाचे नमुने घेण्याचे काम सुरू आहे.

शिर्डीतील पेढे आणी इतर खाद्यपदार्थाचे नमुने लॅबमध्ये तपासणीसाठी पाठवले आहेत. दोषी आढळल्यास शिर्डीतील पेढे विक्रेते आणी उत्पादकांवर कडक कारवाई होणार आहे. भेसळयुक्त आणि प्रतिबंधित अन्नपदार्थांविरोधात अन्न व औषध प्रशासनाने कडक कारवाई केली आहे. राज्यभरात अन्न भेसळप्रकरणात अन्न व औषध प्रशासनाने 8 कोटी 57 लाख रुपयांहून अधिक किमतीचा भेसळयुक्त आणि प्रतिबंधित अन्नपदार्थाचा साठा जप्त केला आहे. गुटखा, पानमसाला, भेसळयुक्त सुपारी, खाद्यतेल, गूळ, खवा आणि एनर्जी ड्रिंक यांसारख्या अन्नपदार्थांवर कारवाई केली आहे. तर या अन्न भेसळप्रकरणात 33 जणांना अटक करण्यात आली आहे.

विवेक गंगाधरराव राऊत
Author: विवेक गंगाधरराव राऊत

मुख्य संपादक सा. रयत रक्षक, महाराष्ट्र. रयत रक्षक न्यूज, महाराष्ट्र.

Leave a Comment