बाटल्या फेकल्या, खुर्च्यांची तोडफोड, मेस्सीच्या भेटीवेळी प्रचंड गोंधळ; स्टेडियममधील चाहते का संतापले?

SHARE:

कोलकाता : आज GOAT India Tour साठी लियोनेल मेस्सी १४  वर्षांनंतर पहिल्यांदाच भारतात आला आहे. त्यामुळे अर्जेंटिनाचा दिग्गज फुटबॉलपटू पाहण्यासाठी शहरातील विविध ठिकाणी चाहत्यांची मोठी गर्दी जमली होती. मात्र हे सगळे सुरळीत सुरू असतानाच सॉल्ट लेक स्टेडियममधील त्याची भेट पूर्व गोंधळ निर्माण झाला होता . फक्त १०  मिनिटांसाठी मेस्सी स्टेडियममध्ये थांबल्यामुळे संतप्त चाहत्यांनी स्टँडमधून बाटल्या फेकत तोडफोड सुरू केली.

मेस्सी सकाळी ११.३०  वाजता स्टेडियममध्ये दाखल झाला होता. अपेक्षेप्रमाणे मेस्सीसाठी कडेकोट सुरक्षा व्यवस्था करण्यात आली होती. तरीही त्याने स्टेडियममध्ये पाऊल ठेवताच चाहत्यांनी त्याच्या जवळ जाण्यासाठी स्टँडचे गेट तोडण्याचा प्रयत्न केला. मेस्सी बाहेर येताच परिस्थिती हाताबाहेर गेली. अखेर कार्यक्रम अर्धवट थांबवण्यात आला.

परिस्थिती इतकी वाईट झाली की ‘GOAT Tour’ चे आयोजक व प्रवर्तक शतद्रु दत्ता यांना सुरक्षा कर्मचाऱ्यांसह मेस्सीला तात्काळ स्टेडियममधून बाहेर काढावे लागले. मेस्सीला पाहण्यासाठी ४,५००  ते १०,०००  रुपयांपर्यंत तिकीट काढलेल्या चाहत्यांनी बाटल्या फेकल्या आणि फायबरग्लासच्या खुर्च्यांची तोडफोड केली. परिस्थिती नियंत्रणात आणताना पोलिसांची मोठी तारांबळ उडाली.

“इथे एक कोल्ड्रिंक ग्लास ची किंमत १५० ते २००  रुपये आहे, पण आम्हाला मेस्सी ची एक झलक ही पाहायला मिळालेली नाही. ” लोकांनी त्याला पाहण्यासाठी महिन्याचा पगार खर्च केला आहे. मी ५ ,०००  रुपयांचे तिकीट काढले आणि माझ्या मुलासोबत आलो होतो, मेस्सीला पाहण्यासाठी, राजकारण्यांना नाही. पोलीस आणि लष्करी कर्मचारी सेल्फी काढण्यात व्यस्त होते. व्यवस्थापन पूर्णपणे दोषी आहे. पिण्याच्या पाण्याचीही व्यवस्था नव्हती,” असे संतप्त चाहते अजय शाह यांनी पीटीआयशी बोलताना सांगितले.

लेक टाऊनमधील श्रीभूमी स्पोर्टिंग क्लबने उभारलेल्या ७०  फूट उंच लोखंडी पुतळ्याचे मेस्सीने प्रत्यक्ष अनावरण केले. यावेळी त्याने अभिनेता शाहरुख खानचीही भेट घेतली; शाहरुखसोबत त्याचा मुलगा अब्रामही उपस्थित होता. या गोंधळामुळे कोलकात्यासाठी आलेले बॉलिवूड सुपरस्टार शाहरुख खान, माजी भारतीय क्रिकेट कर्णधार सौरव गांगुली आणि मुख्यमंत्री ममता बॅनर्जी हे कार्यक्रमाचा भाग होऊ शकले नाहीत.

Leave a Comment