
राशींभविष्य – वैदिक पंचांगानुसार, आज १६ डिसेंबर २०२५ , आजचा वार मंगळवार आहे. ज्योतिषशास्त्रानुसार आजचा दिवस सर्व राशींसाठी खास आणि लाभदायक ठरण्याची शक्यता आहे. या दिवशी ग्रहांची हालचाल पाहता दिवस फार महत्त्वाचा आहे, आज ग्रहांचा दुर्लभ संयोगही होत आहे. ज्याचा परिणाम सर्व १२ राशींच्या लोकांवर दिसून येईल. श्रीगणेशाच्या कृपेने तुमचा आजचा दिवस कसा असेल? कोणासाठी दिवस फलदायी ठरेल? १२ राशींचे आजचे राशीभविष्य जाणून घ्या.
मेष रास (Aries)
मेष राशीच्या लोकांनो आज थोडा मानसिक त्रास सहन करावा लागेल, नोकरी व्यवसायात कोणतेही निर्णय घेणे टाळावे.
वृषभ रास (Taurus)
वृषभ राशीच्या लोकांनो आज कल्पनाशक्तीच्या भरारी उत्तुंग राहतील, तुमच्या नवीन विचारांचे स्वागत होईल.
मिथुन रास (Gemini)
मिथुन राशीच्या लोकांनो आज प्रवासाचे बेत आखाल, परंतु प्रवासामध्ये प्रकृती आणि पैसा दोन्ही गोष्टी सांभाळाव्या लागतील.
कर्क रास (Cancer)
कर्क राशीच्या लोकांनो आज भाग्याची साथ मिळेल आणि यशाला खेचून आणाल.
सिंह रास (Leo)
सिंह राशीच्या लोकांसाठी आज तुमचे विचार इतरांना समजून देण्यात थोडे कमी पडाल, त्यामुळे कुठलीही कार्यवाही होण्यास दिरंगाई अनुभवावी लागेल.
कन्या रास (Virgo)
कन्या राशीच्या लोकांनो आज महिलांच्या कलांना प्रोत्साहन मिळेल, उत्कृष्ट तर्क आणि निर्मिती क्षमता चांगली राहील.
तूळ रास (Libra)
तूळ राशीच्या लोकांनो आज काही गोष्टी गृहीत धरून पुढे वाटचाल करावी लागेल, मी कोणाची बंधने तोडून टाकावी लागतील.
वृश्चिक रास (Scorpio)
वृश्चिक राशीच्या लोकांनो आज जास्तीत जास्त दुसऱ्यांच्या भावनांचा विचार करावा, विद्यार्थ्यांनी आळस सोडावा.
धनु रास (Sagittarius)
धनु राशीच्या लोकांनो आज आपला पराक्रम आणि प्रतिष्ठा सिद्ध करण्यासाठी जीवाचे रान करावे लागेल.
मकर रास (Capricorn)
मकर राशीच्या लोकांनो आज विद्यार्थ्यांना शैक्षणिक क्षेत्रात अभ्यासू वृत्ती ठेवावी लागेल, थोडा तापटपणा वाढेल.
कुंभ रास (Aquarius)
कुंभ राशीच्या लोकांनो आज यशाच्या पलीकडे जाऊन विचार करण्याच्या तुमच्या सवयीचा आज उपयोग करून घ्याल.
मीन रास (Pisces)
मीन राशीच्या लोकांनो आज संघर्षाचा आणि प्रतिकाराचा भाग जास्त असल्यामुळे थोडे निराश व्हाल.
(टीप : वरील सर्व बाबी रयत रक्षक न्यूज केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून रयत रक्षक न्यूज कोणताही दावा करत नाही.)





