
नवी दिल्ली – देशात आता पीएफ रक्कम, एटीएमने काढू शकणार आहे, तर देशातील पीएफ खातेधारकांना मोठा दिलासा मिळणार आहे असे केंद्रसरकारने म्हटले आहे. केंद्र सरकार पीएफची रक्कम काढण्याच्या प्रक्रियेला एटीएम आणि यूपीआय सोबत जोडण्यास तयार झाले आहे. याबाबत केंद्रीय श्रममंत्री मनसुख मांडवीय यांनी मोठे वक्तव्य केले आहे. पीएफ खात्यातील रक्कम एटीएम मधून काढता येणार आहे, असे केंद्रीय मंत्र्यांनी स्पष्ट सांगितले आहे.
देशातील सर्व पीएफ खातेधारकांना दिलासा देणारी अपडेट समोर आली आहे. प्रॉविडंट फंडमधील रक्कम काढण्यासाठी लागणारा वेळ कमी करण्यासाठी सरकारने नवी सुविधा आणली आहे. पीएफ खात्यातील रक्कम एटीएम आणि यूपीआयद्वारे काढण्याची सुविधा मार्च २०२६ पासून सुरु होणार आहे. केंद्रीय श्रममंत्री मनसुख मांडवीय यांच्या मते देशातील पीएफ खातेधारकांना त्यांच्या खात्यातून ७५ टक्के रक्कम काढता येते. येत्या काळात पीएफ खात्यातून रक्कम काढण्याची प्रक्रिया सोपी केली जाणार आहे.
देशातील सर्व पीएफ खात्यातील रक्कम एटीएममधून २०२६ मार्चपासून काढता येणार आहे. केंद्रीय श्रममंत्री मनसुख मांडवीय यांनी एका मुलाखतीत म्हटले आहे. मार्च २०२६ अगोदर श्रम मंत्रालय अशी सुविधा आणणार आहे. त्या सुविधेद्वारे पीएफ खातेदार एटीएममधून पीएफ खात्यातील रक्कम काढू शकतात, असे मनसुख मांडवीय म्हणाले आहेत. श्रम मंत्रालय ईपीएफमधून पैसे काढण्याची प्रक्रिया यूपीआयसोबत जोडली जाणार आहे, असे त्यांनी म्हटले आहे. नव्या सुविधांचा उद्देश खातेदारांना फंडाची रक्कम जितक्या सोप्या पद्धतीने काढता येईल तितकी सोपी बनवणे हा आहे. सध्या सर्वसामान्य लोक दैनंदिन आयुष्यात पैशांच्या व्यवहारांसाठी एटीएम आणि यूपीआयचा वापर करतात. त्यामुळे ईपीएफला देखील त्याच प्रमाण जोडण्याचे नियोजन आहे, असे मनसुख मांडवीय म्हणाले आहेत.
मनसुख मांडवीय म्हणाले, यामुळे दैशातील सर्व पीएफ खातेदारांना ऑनलाईन पोर्टल किंवा एम्प्लॉयरवर अवलंबून राहावे लागणार नाही. क्लेम सेटल होण्यासाठी लागणारा वेळ देखील कमी होणार आहे. पीएफ खात्यातून रक्कम काढण्यासाठी वेगवेगळे फॉर्म भरावे लागतात. काही सदस्यांसाठी ही प्रक्रिया किचकट वाटते, क्लेम मंजूर होऊन पैसे काढण्यास उशीर होतो. केंद्रीय मंत्री मनसुख मांडवीय म्हणाले की, ईपीएफ खात्यातील रक्कम खातेदाराची असते. मात्र, वेगवेगळे फॉर्म भरावे लागत असल्याने अनेकांची अडचण होते. ही अडचण सोडवण्यासाठी पीएफची रक्कम एटीएम आणि यूपीआयद्वारे काढण्याची सुविधा सरकार आणत आहे. पीएफ खात्यातील रक्कम नोंदणीकृत खात्यात जमा होणार आहे.
देशातील सर्व पीएफ खात्यातील रक्कम काढण्यासाठीच्या नियमात यापूर्वीचे अनेक बदल करण्यात आले आहेत. ईपीएफओच्या नव्या नियमांनुसार पीएफ खात्यातून रक्कम काढायची असल्यास जो क्लेम फॉर्म भरायचा असतो त्यासोबत चेक किंवा पासबुकच्या पहिल्या पानाचा फोटो अपलोड करणे आवश्यक नाही. आता आधार ओटीपीच्या आधारे पडताळणी पूर्ण करुन पीएफ खात्यात रक्कम जमा केली जाते. पीएफ क्लेम मंजूर करण्यासाठीचा कालावधी देखील कमी करण्यात आला आहे. पीएफ खात्यातून रक्कम काढण्यासाठी क्लेम फॉर्म भरल्यास आता तीन दिवसांमध्ये क्लेम मंजूर होऊन ती रक्कम खातेदाराच्या खात्यात जमा केली जाणार आहे, असे केंद्रीय मंत्री म्हणाले आहेत.





