उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या भावाच्या रिसॉर्टमध्ये, १३४ कोटींचे ड्रग्ज सापडल्याचा सुषमा अंधारेंचा आरोप…

SHARE:

मुंबई – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या भावाच्या रिसॉर्टमध्ये, १४५  कोटींचे ड्रग्ज सापडल्याचा ठाकरे गटाच्या शिवसेना नेत्या सुषमा अंधारेंचा आरोप आहे. १४५  कोटींच्या ड्रग्सचे गंभीर आरोप अंधारेनी केले आहेत. तर प्रकाश शिंदेंनी हे आरोप फेटाळले आहेत. आता सुषमा अंधारेंनी मोबाईवरून पुरावेच दाखवले आहेत. प्रकाश शिंदे यांनी सुषमा अंधारेंचे सर्व आरोप फेटाळले होते, तर ते हॉटेल आपण चालवत नाही, दुसरयाला चालवायला दिलेले आहे, अशी माहिती प्रकाश शिंदेंनी दिली होती.

शिवसेनेचे मुख्य नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भावाच्या रिसॉर्टमध्ये १४५  कोटी रुपयांचे ड्रग्ज सापडल्याचा आरोप ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी काल केला होता. मात्र साताऱ्याचे पोलीस अधिक्षक तुषार दोषी यांनी ही माहिती लपवल्याचा दावा सुषमा अंधारे यांनी केला आहे. साताऱ्यातील जावळी तालुक्यातील सावरीत गावातील एका रिसॉर्टमध्ये टाकलेल्या धाडीत ४५  किलो ड्रग्जचा साठा सापडला होता. हे रिसॉर्ट प्रकाश शिंदे हे चालवत असल्याचा आरोप होत आहे. अशातच प्रकाश शिंदे हे एकनाथ शिंदे यांचे सख्खे भाऊ असल्याचा दावाही सुषमा अंधारे यांनी केला होता. त्यानंतर पुन्हा एकदा सुषमा अंधारे यांनी पत्रकार परिषद घेत अनेक महत्त्वाचे मुद्दे मांडले आहेत. त्याचबरोबर प्रकाश शिंदे यांनी सुषमा अंधारेंचे सर्व आरोप फेटाळले होते, तर ते हॉटेल आपण चालवत नाही, दुसऱयाला चालवायला दिलेले आहे, अशी माहिती प्रकाश शिंदेंनी दिली होती, त्यानंतर अंधारेंनी ते हॉटेल प्रकाश शिंदेंच आहे आणि तेच ते हॉटेल चालवत असल्याचे पुरावे त्यांनी माध्यमांसमोर दाखवले आहेत.

आता त्यांच्या सातबारा बदलण्याच्या हालचाली सुरू आहेत. पत्रकार परिषद घेत सुषमा अंधारे म्हणाल्या, काल प्रकाश शिंदे यांनी आरोपांवर आपले स्पष्टीकरण दिले. त्यावर बोलताना सुषमा अंधारे म्हणाल्या, प्रकाश शिंदे काल माध्यमांशी बोलत होते, खरंतर आता त्यांच्या सातबारा बदलण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत, बावनकुळेंच्या मुलाचा देखील असाच प्रवास होता, ती गाडी त्याची नाही, नंतर ती गाडी मित्राची पण तो बसलेला नाही, मग तो मागच्या सीटवर आला, मागच्या सीट वरून पुढच्या सीटवर आला, हीच गोष्ट आता इथे घडते आहे. आधी प्रकाश शिंदे तो प्रकाश शिंदे नाही. मग प्रकाश शिंदे हा तोच आहे. आता तोच प्रकाश शिंदे आहे, पण मी ती जागा दुसऱ्याला वापरायला दिली. तिथे हॉटेलच नाही किंवा मी माझी जागा दुसऱ्याला दिली, असे सगळे राजकारण चालवले असल्याचे सुषमा अंधारे यांनी म्हटले आहे.

व्हॉटस ॲपमध्ये प्रकाश शिंदे असं नाव इथे आले आहे. यावेळी सुषमा अंधारेंनी काही महत्त्वाच्या गोष्टी दाखवत ते हॉटेल प्रकाश शिंदे यांचेच असल्याचा दावा केला आहे, पत्रकार परिषदेत आपल्या फोनवरून प्रात्यक्षिक दाखवत अंधारे म्हणाल्या, गुगलमध्ये जाऊन तुम्ही तेजयश त्या हॉटेलचं नाव टाकले तर ते येते, प्रकाश शिंदे खोटे का बोलले, ते म्हणाले हे माझे हॉटेल नाही, यावेळी अंधारे यांनी त्यांच्या फोनवरून हॉटेल तेजयश सर्च केले, जर ही जागा कमर्शियल नसेल तर त्याला रेटिंग कशी काय येईल, याला ४.८  चा रेटिंग आहे, गुगल वरती डायरेक्शन आहे आणि व्हॉटसॲप नंबर देखील दिलेला आहे, इथे ऑनलाईन बुकिंगही करता येते, शेअर आहे आणि हॉटेलचा मॅपही दाखवण्यात आलेला आहे, तिथे दिलेल्या नंबर वर क्लिक केल्यानंतर व्हॉटसॲपमध्ये प्रकाश शिंदे असं नाव इथे आले आहे, हे हॉटेल अजूनही प्रकाश शिंदे चालवतात कारण इथे त्यांचा नंबर दिलेला आहे. त्याचबरोबर त्यांचं नाव आलेले आहे, माझ्या प्रामाणिकपणावर शंका घ्यायची नाही, मी लॉजिकल बोलते आहे, मी प्रामाणिकपणे बोलते आहे, मी एका एका पुराव्यासाठी मेहनत घेते आहे, मी पुन्हा एकदा सांगते महाराष्ट्रातील १४ कोटी जनतेच्या विश्वासाचा विषय आहे, आमच्या महाराष्ट्रातली पोरे तुम्ही देशोधडीला लावणार आहात का, आणि असा ड्रग्स मधून कमवलेला पैसा तुम्ही निवडणुकीत वापरता, मग २२  हजाराला एक मत तर फार सोपी गोष्ट आहे, २२  काय तर २५  हजाराला देखील तुम्ही मत घेऊ शकता, अशा टोला देखील अंधारेंनी लगावला आहे.

तर शंभूराज देसाई यांना पालकमंत्री म्हणून घेण्याचा अधिकार आहे का? पुढे अंधारे म्हणाल्या की, मला तुषार दोषी आणि पालकमंत्री शंभूराज देसाई या दोघांनाही प्रश्न विचारायचे आहेत. तुम्ही नेमके काय करत होतात. मुंबईच्या लोकांनी कारवाई केली, तरी तुम्ही ढिम्म होतात, काल पत्रकार परिषद घेतल्यानंतर हे सगळे सुचले असेल तर त्याच्या आधी या लोकांनी किती हैदोस दिवस घातला असेल, पाचगणी हे पर्यटन ठिकाण आहे. महाराष्ट्रातलं सगळयात महत्त्वाचं ज्याला मिनी स्वित्झर्लंड म्हणून ओळखलं जाते. हा मिनी स्वित्झर्लंड जिथे अनेक ठिकाणाहून पर्यटक येतात. अशा ठिकाणी जर ड्रगचा आणि कोकेनचा विळखा असेल, आणि याची कल्पना पालकमंत्र्यांना नसेल तर त्यांना पालकमंत्री म्हणून घेण्याचा अधिकार आहे का? तिथल्या पालकमंत्र्यांना कळले पाहिजे की राज्यातील सर्वात महत्त्वाचा पर्यटन क्षेत्र माझ्या जिल्ह्यामध्ये येते आणि मी या पर्यटन स्थळाची सुरक्षा बघितली पाहिजे. ज्याअर्थी तिथे इतके सगळे होत आहे, तिथे कोणी बॉम्ब ब्लास्ट करून गेले तरी त्यांना कळणार नाही, पालकमंत्री नेमके काय करत आहे असा सवाल यावेळी सुषमा अंधारे यांनी उपस्थित केला आहे.

शिवसेना नेते सुषमा अंधारेंनी एकनाथ शिंदे यांचा राजीनामा मागितला आहे. पत्रकार परिषदेत म्हणाल्या की, मी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राजीनामा मागत आहे. वाल्मिक कराड प्रकरणी मुंडे यांचा राजीनामा घेतला, तर मग इथे प्रकाश शिंदे तर एकनाथ शिंदेंचे भाऊ आहेत. मग उपमुख्यमंत्री असल्यामुळे तपासाला आपले पद प्रभावित करू शकते ,असे वाटत असेल तर राजीनामा द्यावा, अशी मागणी शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांनी केली आहे. राज्यात भाजपा सरकारच्या तीनही राजकीय पक्षांचे हात भ्रष्टाचारात गुतलेले आहेत. राज्यातील भाजपा सरकारमध्ये सामील झालेले राजकीय पक्ष यांची काही ना काही राज्यातील घोटाळयाची प्रकरणे रोज बाहेर येत आहेत, असे शिवसेना नेते सुषमा अंधारे म्हणाल्या आहेत.

Leave a Comment

अधिक वाचा