सांगलीमध्ये शाळेतील मूलीवर, सामूहिक बलात्कार झाल्याची घटना उघड, याप्रकरणात दोन नराधमांना अटक…

SHARE:

ईश्वरपुर – सांगलीमध्ये शाळेतील मूलीवर, सामूहिक बलात्कार झाल्याची घटना उघड झाली आहे ,तर याप्रकरणात दोन नराधमांना अटक केली आहे. महाराष्ट्रात अशा घटना वाढत आहेत. सांगली येथे एका मूलीला उसाच्या शेतात नेऊन बलात्कार केलयाची घटना घडली आहे. नंतर पीडितेला गंभीर अवस्थेत सोडले आहे. सांगलीत एकच खळबळ माजली आहे. सांगलीत एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. आठवीत शिकणाऱ्या तरुणीवर अत्याचार करुन तिला गंभीर अवस्थेत चालायला लावले आहे.

सांगलीत मानवतेला काळमि फासणारी घटना घडत आहेत. सांगलीच्या ईश्वरपूर येथे ही घटना घडली आहे. अल्पवयीन मुलीच्या असहाय्यतेचा गैरफायदा घेत दोघा नराधमांनी तिच्यावर सामूहिक अत्याचार केला आहे. ही तरुणी इयत्ता आठवीत शिकत होती. या प्रकरणी पोलिसांनी दोघा तरुणांना अटक केली असून या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दोघा सराईत गुन्हेगारांनी मुलीच्या ओळखीचा फायदा घेत तिचे अपहरण केले. त्यानंतर तिला उसाच्या शेतात नेण्यात आले. तिथे दोघांनी तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. यावेळी पीडित तरुणींनी दोघांना विरोध करण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी तिला मारहाण केली. बलात्कारानंतर नराधमांनी पलायन केले. त्यामुळं मदतीसाठी तिला त्या अवस्थेत पायपीट करावी लागली. मंगळवारी रात्री ९  च्या सुमारास ही घटना घडली असून दोघा नराधमांवर अपहरण, बलात्कार आणि बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्याच्या विविध कलमांनुसार गुन्हा नोंद केला आहे.

पीडित मुलीला गंभीर अवस्थेत उसाच्या शेतात सोडून नराधमांनी पळ काढला होता. तर त्या अवस्थेतच मुलीला शहराच्या दिशेने पायपीट करावी लागली. ही पीडित मुलगी रस्त्यावरुन चालन निघाली असताना आसपासच्या नागरिकांनी त्या मूलीला मदत केली. व मूलीसोबत झालेल्या प्रकाराची ईश्वरपूर पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर हा लैंगिक अत्याचाराचा गुन्हा समोर आला आहे. या प्रकरणी ईश्वरपूर पोलीस ठाण्यात ऋतिक महापुरे आणि आशिष खांबे या दोघा तरुणांच्या विरोधात पोक्सो कायदा अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणात दोघा तरुणांना अटक करण्यात आली आहे, मात्र या घटनेमुळे खळबळ उडाली आहे.

बलात्कारानंतर तब्बल १  किमी अंतर रात्रीच्या अंधारात ती गंभीर अवस्थेत ती चालत आली होती. शहरालगत आल्यानंतर नागरिकांनी तिला पोलिसांना बोलवून पीडित मुलीला पोलिसांच्या हवाली केले. काही वेळातच पोलीस पीडित मुलीला घेऊन गेले. त्यानंतर आईने मुलीकडे विचारपूस केल्यानंतर तिने घडलेला हा सगळा प्रकार सांगितला आहे. तेव्हा ईश्वरपुर पोलिसांनी त्वरित पुढील कारवाई केली आहे. याप्रकरणात पोलिस अधिक तपास करत आहेत.

Leave a Comment

अधिक वाचा