धनंजय मुंडेंना मंत्रीमंडळात घेतले तर, बीडमध्ये उपोषणाला बसणार – खासदार सुप्रिया सुळे

SHARE:

नवी दिल्ली – धनंजय मुंडेंना मंत्रीमंडळात घेतले तर, बीडमध्ये उपोषणाला बसणार असे शरद पवारगट खासदार सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे. मुंडे यांना मंत्रीमंडळात घेतले तर सुप्रिया सुळे बीड मध्ये जाऊन उपोषणाला बसणार आहेत. दिल्लीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी हा निर्धार व्यक्त केला आहे. यानंतर ओबीसी नेत्यांनी सुप्रिया सुळेंना इशारा दिला आहे ’तुम्ही बीडला आला तर आम्ही बारामतीत उपोषण करणार आहे, असे ओबीसी नेत्यांनी म्हटले आहे. धनंजय मुंडे यांना मंत्रिमंडळात घेतल्यास उपोषण करणार आहे असा सुप्रिया सुळेंनी इशारा दिला आहे.

राज्यातील सदनिका वाटपातील गैरव्यवहार प्रकरणी माणिकराव कोकाटे यांना अटक होण्याची शक्यता असतानाच, दुसरीकडे त्यांची खाती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढून घेतली आहे. यामुळे माणिकराव कोकाटे सध्या बिनखात्याचे मंत्री झाले आहेत. सध्या माणिकराव कोकाटेंकडून तिन्ही खाती उपमुख्यमंत्री अजित पवारांकडे सोपवण्यात आली आहे. पण हे खाते वाल्मिक कराडमुळे राजीनामा द्यावा लागलेले धनंजय मुंडे यांच्याकडे दिले जाण्याची शक्यता आहे. यासाठीच त्यांनी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतल्याची चर्चा आहे. मात्र जर धनंजय मुंडे यांना मंत्रीमंडळात घेतलं तर बीडमध्ये जाऊन उपोषणाला बसणार असा इशारा सुप्रिया सुळे यांनी दिला आहे
धनंजय मुंडे यांना मंत्रिमंडळात समाविष्ट करुन घेतल्यास बीड मध्ये जाऊन उपोषणाला बसणार असल्याचे सुप्रिया सुळेंनी म्हटले आहे. दिल्लीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी हा निर्धार व्यक्त केला आहे. धनंजय मुंडे यांना मंत्री मंडळात घेणार असल्याच्या चर्चेनंतर सुप्रिया सुळे यांनी महायुतीच्या नेत्यांना मेसेज केले आहेत. तरीही मंत्रीमंडळात घेतले तर बीड मधे जाऊन उपोषणाला बसणार असल्याचे सुप्रिया सुळे यांनी सांगितलं आहे. यानंतर ओबीसी नेत्यांनी सुप्रिया सुळेंना इशारा दिला आहे.

कोकाटेंच्या अटकेच्या तयारीदरम्यान अमित शाहांची भेट का घेतली? यावर प्रश्नचिन्ह आहे. सुप्रियाताई माणिकराव कोकाटेंचा राजीनामा मागा, पार्थ पवार प्रकरणात लाडक्या दादांचा राजीनामा मागा ना,, त्यासाठी उपोषण करा ना, अशी मागणी राज्यातील ओबीसी नेत्यांनी केली आहे. मुंडे कुटुंबाच्या मागे बीडमधील प्रस्थापित लागले आहेत, याचे नेतृत्व पवार करतात. धनंजय मुंडे यांची मीडिया ट्रायल करून राजीनामा घेतला आहे. तुम्ही बीडमध्ये उपोषण केलात तर आम्ही बारामतीमध्ये करू असा इशारा राज्यातील ओबीसी नेत्यांनी सुप्रिया सुळे यांना दिला आहे. धनंजय मुंडेंच्या मागे महाराष्ट्रामधील ओबीसी समाज आहे. त्याना मंत्रिपद मिळालेच पाहिजे असेही राज्यातील ओबीसी नेते म्हणाले आहेत.

अमित शाह यांच्या भेटीनंतर धनंजय मुंडे यांनी व्टिट केले आहे. नवी दिल्ली येथे केंद्रीय गृह तथा सहकार मंत्री आदरणीय श्री. अमित भाई शहा यांची भेट घेऊन परळी वैद्यनाथ स्थित प्रभू वैद्यनाथ ज्योतिर्लिंग तीर्थ स्थळाचा केंद्र सरकारच्या प्रसाद योजनेत समावेश करण्याबाबत विनंती केली आहे. या योजनेच्या माध्यमातून ज्योतिर्लिंग स्थळाचा विकास व कायाकल्प झाल्यास परळी शहरासह संपूर्ण बीड जिल्ह्याच्या विकासात एक मोठा व सकारात्मक बदल घडणार आहे; त्याचबरोबर मतदारसंघातील एका कारखान्यासंदर्भात चर्चा केली आहे. पूर्वनियोजित वेळ घेतल्याप्रमाणे ही भेट होती,“ असं धनंजय मुंडे यांनी एक्सवरुन पोस्ट करून सांगितले आहे.

Leave a Comment

अधिक वाचा