नववर्षात सोन्याच्या दरात वाढणार की घसरणार ? २२ आणि २४ कॅरेटचे आजचे दर…

SHARE:

  • नववर्षाच्या पहिल्या दिवशी सोन्याच्या दरात वाढ झाली आहे
  • २४ कॅरेट सोन्याच्या १ तोळा दरात १७० रुपयांची वाढ झाली
  • २२ आणि १८ कॅरेट सोन्याचे दरही वाढले
  • चांदीच्या दरात आज काही प्रमाणात घसरण झाली

व्यवसाय : नवीन वर्षाचे देशभरात सर्वांनी जल्लोषात स्वागत केले. नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी अनेक नियमांमध्ये मोठे बदल झाले. गॅस सिलिंडरचे दर वाढले. सोनं-चांदीच्या दराबाबत देखील आज मोठी अपडेट समोर आली आहे. नववर्षाच्या पहिल्या दिवशी सोन्याच्या दरात मोठी वाढ झाली तर चांदीच्या दरात काही प्रमाणात घसरण झाली. आज २४ कॅरेटच्या १ तोळा सोन्याच्या दरामध्ये १७० रुपयांनी वाढ झाली आहे. तर १ ग्रॅम चांदीच्या दरात १ रुपयांनी घसरण झाली आहे. सोन्याच्या दरात वाढ झाल्यामुळे आज नवर्षाच्या पहिल्याच दिवशी सोनं खरेदी करणाऱ्यांच्या खिशाला कात्री लागणा आहे. आज जर तुम्ही रुपेनं-चांदी खरेदी करण्यासाठी जाणार असाल तर आजचे १८, २२ आणि २४ कॅरेटच्या १ तोळा सोन्याचे दर आणि चांदीचे दर किती आहेत ते जाणून घ्या…

गुड रिटन्र्सने दिलेल्या माहितीनुसार, आज २४ कॅरेटच्या सोन्याच्या दरात मोठी वाढ झाली आहे. २४ कॅरेटच्या १ तोळा सोन्याच्या दरात १७० रुपयांनी वाढ झाली आहे. २४ कॅरेटचे एक तोळा सोनं खरेदीसाठी आज तुम्हाला १,३५,०६० रुपये खर्च करावे लागणार आहेत. तर २४ कॅरेटच्या १० तोळा सोन्याच्या दरात १७०० रुपयांनी वाढ झाली आहे. हे सोनं खरेदी करण्यासाठी आज तुम्हाला १३,५०,६०० रुपये खर्च करावे लागणार आहेत.

आज २२ कॅरेटच्या सोन्याच्या दरात देखील वाढ झाली आहे. २२ कॅरेटच्या १ तोळा सोन्याच्या दरामध्ये १५० रुपयांनी वाढ झाली आहे. हे सोनं खरेदी करण्यासाठी आज तुम्हाला १,२३,८०० रुपये खर्च करावे लागणार आहे. तर २२ कॅरेटचे १० तोळा सोन्याच्या दरामध्ये १,५०० रुपयांनी वाढ झाली आहे. हे सोनं खरेदी करण्यासाठी आज तुम्हाला १२,३८,००० रुपये खर्च करावे लागणार आहेत.

तर २४ आणि २२ कॅरेटच्या सोन्यापाठोपाठ आज १८ कॅरेटच्या सोन्याच्या दरात देखील वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. आज १८ कॅरेटच्या १ तोळा सोन्याच्या दरात १२० रुपयांनी वाढ झाली आहे. हे सोनं खरेदीसाठी आज तुम्हाला १,०१,२९० रुपये खर्च करावे लागतील. तर आज १८ कॅरेटचे १० तोळा सोन्याच्या दरामध्ये १,२०० रुपयांनी वाढ झाली आहे. हे सोनं खरेदीसाठी आज तुम्हाला १०,१२,९०० रुपये खर्च करावे लागणार आहेत.

दरम्यान, सोन्याच्या दरात वाढ झाली असली तरी आज चांदीच्या दरात काही प्रमाणात घसरण झाली आहे. आज १ ग्रॅम चांदीच्या दरात १ रुपयांनी घसरण झाली आहे. १ ग्रॅम चांदी खरेदीसाठी आज तुम्हाला २३८ रुपये खर्च करावे लागणार आहे. तर १ किलो चांदी तब्बल १,००० रुपयांनी स्वस्त झाली आहे. ही चांदी खरेदीसाठी आज तुम्हाला २,३८,००० रुपये खर्च करावे लागणार आहे. त्यामुळे आज चांदी खरेदी करताना तुमच्या खिशाला कात्री लागणार नाही.

Leave a Comment

अधिक वाचा