
नागपूर – नागपूर ग्रामीण अंतर्गत येणाऱ्या कळमेश्वर पोलीस स्टेशन मध्ये डायल १२२ वर माहिती प्राप्त झाली की फेटरी येथे नागपूर ते काटोल रोडवर एका ट्रकला आग लागली आहे. कळमेश्वर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी पोहोचून पाहणी केली असता. एक टाटा कंपनीचा ट्रक क्रमांक एम एच ४० सीडी ५०९४ हा जळताना दिसला. वाहन चालकाबाबत विचारपूस केली असता चालक घटनास्थळावरून पडून गेल्याची माहिती प्राप्त झाली. पोलिसांनी तात्काळ अग्निशमन दलास बोलावून आग विजवली पोलिसांनी पंचायत समक्ष वाहनाची तपासणी केली असता त्यात गोवंश जनावरे दिसून आली. नमूद जनावरे दोर खंडाने बांधून निर्दयतेने कोंबून असल्याचे दिसून आले. एकूण ३७ जनावरे मिळून आली पैकी २९ जनावरे मृत पावली होती तसेच 8 गोवंश जनावरांना वाचविण्यात यश आले जनावरांना राउळगाव येथील जैन गोशाळेत दाखल करण्यात आले. नमूद वाहन चालक आरोपी याने अवैधरित्या जनावरांची वाहतूक करीत असताना त्याचे ताब्यातील वाहन भरधाव वेगाने व निष्काळजीपणाने चालविल्याने वाहनाचा टायर फुटला टायर फुटल्यानंतर सुद्धा नमूद चालक आरोपी यांनी दुर्घटना होऊ शकते हे माहिती असताना सुद्धा सदर वाहन न थांबविता चालवीत राहिल्याने रोडचे आणि टायरचे घर्षण झाल्याने आग लागली. टायरने पेट घेतल्यानंतर सुद्धा आरोपीने नमूद वाहन महामार्ग क्रमांक एन एच ३५३ जे वर चालविल्याने रोडचे सुद्धा नुकसान झाले. आरोपीला वाहनाला लागलेल्या आगीमुळे नजीकच्या वस्त्यांमध्ये जीवित हानी होऊ शकते हे माहीत असताना सुद्धा तो पेटलेला ट्रक सोडून पळून गेला. सदर प्रकरणी नमूद आरोपीवर कळमेश्वर पोलीस स्टेशन येथे ३२६ (ग), ६१ (२), भा.न्या. सं. ५ (१) (अ), महाराष्ट्र पासून संरक्षण अधिनियम ११ (१ )(ड), प्राण्यांचा छळ प्रतिबंधक अधिनियम १३४ /१७७ मोटर वाहन अधिनियम 8(ब), राष्ट्रीय महामार्ग अधिनियम ३ (१ ), सार्वजनिक संपत्ती नुकसान प्रतिबंध अधिनियम कलम ७ फौजदारी सुधारणा कायदा अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला.
पोलिसांनी सदर प्रकरणाचा सखोल तपास केला असता, असे निदर्शनास आले की सदर गुन्हा हा संघटित रित्या केलेला असून आरोपी क्रमांक
१ ) टोळी प्रमुख नामे मोहम्मद नासिक मोहम्मद शफी कुरेशी, वय ४५ वर्षे, रा. महिंद्र नगर, बुर्ज खलिफा हॉटेल जवळ, टेका नाका, नागपूर असून टोळी सदस्य
२ ) वाहन चालक सैय्यद सुलतान उर्फ सोनू हमीद अली, वय ३० वर्षे, रा. महेंद्र नगर, पाण्याची टाकी जवळ, आजरी-माजरी यशोधरा नगर, नागपूर जनावरे वाहनात भरणारे आरोपी क्र.
३ ) आमिर रऊफ कुरेशी, वय २९ वर्षे, राहणार महेंद्र नगर, पाण्याची टाकी पाचपावली, नागपूर आणि
४ ) रफिक कुरेशी शेख सत्तार कुरेशी, वय ३२ वर्षे, रा. टेक नाका, पाण्याची टाकीजवळ, नागपूर जनावरे खरेदी विक्री करणारा तसेच साले कसा जिल्हा गोंदिया येथून कापसी नागपूरपर्यंत जनावरे आणणारा वाहन चालक मालक
५ ) शोएब नौशाद सय्यद, वय २६ वर्षे, रा. बुरड मोहला, लाखनी जि. भंडारा, गोंदिया जिल्ह्यातून अवैधरित्या जनावरांचा पुरवठा करणारा
6) मनोहर भोजराज मनगटे, वय २६ वर्षे, रा. पानगाव पोलीस स्टेशन, सालेकसा जनावरे खरेदी विक्रीमध्ये मध्यस्थी आरोपी
7) इख्तीयार कुरेशी मुस्ताक कुरेशी, वय ३३ वर्षे, रा. प्रवेश नगर, यशोधरा नगर तसेच सदर गुन्ह्यात मदत करणारे इतर पाच आरोपी टोळी सदस्य अशा एकूण १२ आरोपींची टोळी ही अवैधरित्या गोवंशाची कत्तली करिता तस्करी/वाहतूक, खरेदी, विक्री आणि इतर सहकार्य करतात.
या टोळीतील सर्व आरोपींवर वेगवेगळ्या पोलीस स्टेशनमध्ये वेगवेगळे गुन्हे नोंद आहेत. गोवंश तस्करी, विक्री तसेच इतर अनेक गुन्ह्यांमध्ये या टोळीतील सहकारी काम करतात. त्याच पार्श्वभूमीवर आरोपी क्र. १ ते ७ यांना अटक करण्यात आली आहे. तसेच टोळीतील इतर सदस्यांवर सुद्धा गोवंश जनावर तस्करीचे अनेक गुन्हे नोंद आहे. सदर टोळी प्रमुख हा आपले टोळी सदस्यांकडून महाराष्ट्र, मध्य प्रदेश व छत्तीसगड येथे अवैधरित्या गोवंश जनावरांची तस्करी करून घेत असतो. सदर टोळीतील सदस्य हे त्याचे सांगणेवरून अनेक राज्यातून कत्तली करिता जनावरे वाहतूक करीत असतात. सदर टोळीतील सदस्य हे पोलिसांना व काही सामाजिक संस्थांना माहिती होऊ नये म्हणून विविध प्रकारची वाहने उदाहरणार्थ छोटे पिकअप व्हॅन, ॲम्बुलन्स अशा प्रकारची वाहने वापरून आपला व्यवसाय करीत असतात. एकंदरीत टोळी प्रमुख हा वेगवेगळे सदस्यांना हाताशी धरून आपल्या आर्थिक फायद्यासाठी निर्दयीपणे गोवंश जनावरांची कत्तली कामी वाहतूक करून असे गुन्हे करतो. आरोपीतांवर अनेक गुन्हे नोंद असून सुद्धा नमूद आरोपीतांनी त्यांची गुन्हेगारी गतीविधी निरंतर सुरूच ठेवली त्यामुळे नमूद १२ आरोपीतांच्या टोळी विरुद्ध महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम सन १९९९ (MCOCA) लावण्यात आला आहे.





