धुळे महापालिका निवडणुकीत, ईव्हीएम मशीनची तोडफोड

SHARE:

धुळे – महापालिका निवडणुकीत, ईव्हीएम मशीनची तोडफोड करण्यात आली आहे, तर राज्यातील सत्ताधारी भाजपाच्या उमेदवारांवर तोडफोडीचा आरोप करण्यात आला आहे. धुळे महापालिका निवडणुकीचे मतदान पार पडत असताना प्रभाग क्रमांक १८ मध्ये मशीन तोडफोड झाली आहे.

महाराष्ट्रात २९ महापालिकांच्या निवडणुकांचे आज १५  जानेवारी रोजी मतदान पार पडत आहे. अनेक ठिकाणी शांततेत मतदान पार पडत असून, काही ठिकाणी मतदान केंद्रांवर गोंधळ पाहायला मिळतो आहे. अशातच धुळे महापालिका निवडणुकीचे मतदान पार पडत असताना, प्रभाग क्रमांक १८ मध्ये ईव्हीएम मशीनची तोडफोड करण्यात आली. त्यामुळे मतदान केंद्रावर एकच गोंधळ उडाला.

मतदान सुरु असताना, धुळे प्रभाग क्रमांक १८ मध्ये मतदान करण्यात येणाऱ्या, ईव्हीएम मशीनची तोडफोड करण्यात आली. शिवसेना उमेदवार सतीश महाले यांनी, भाजप उमेदवारांवर ईव्हीएम मशीनची तोडफोड केल्याचा आरोप केला. भाजप कार्यकर्त्यांनी मतदान केंद्रावर दादागिरी करून, दहशत माजवल्याचा आरोप शिवसेना उमेदवार सतीश महाले यांनी केला.

यावेळी धुळे पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून, पुढची कारवाई करत आहेत. तसेच संबंधित घटनेची चौकशी सुरु असून, निवडणूक आयोग पुढे काय निर्णय घेतो, याकडे सर्वांचे लक्ष आहे. राज्यात आज मतदान होत असताना ही, काही ठिकाणी वादाच्या घडत आहेत.

Leave a Comment

अधिक वाचा