अकोला महापालिकेत मतदानास गेलेल्या, मतदाराचा हृदयविकाराने मृत्यु

SHARE:

अकोला – महापालिकेत मतदानास गेलेल्या, एका मतदाराचा हृदयविकाराने मृत्यु झाला आहे. मतदानासाठी घरातून निघालेला एक मतदार घरी गेलाच नाही, तर त्या मतदाराचा हृदयविकाराने मृत्यु झाला आहे. अकोला शहरात मतदानाच्या दिवशी एक धक्कादायक घटना घडली आहे. मतदानासाठी निघालेल्या एका व्यक्तीच्या मृत्युमुळे ,घरातील करता पुरुष गमावण्याची वेळ एका कुटुंबावर आली आहे.

अकोल्यातील प्रभाग क्रमांक १८  मधील शहा बाबू हायस्कूल येथील मतदान केंद्रावर सकाळी साडेआठच्या सुमारास मतदानासाठी घरातून निघालेल्या गौतम भगवान गरड (वय ६२ ) यांना रस्त्यातच अचानक हृदयविकाराचा तीव्र झटका आला, आणि ते कोसळले. उपस्थित नागरिकांनी तातडीने त्यांना, उपचारासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी उपचारादरम्यान त्यांना मृत घोषित केले.

गौतम गरड हे पानपट्टीचा छोटा व्यवसाय करून आपल्या कुटुंबाचा, उदरनिर्वाह करत होते, घरचा कमवता पुरुष गेला, त्यांच्या पश्चात पत्नी अनुसया गरड आणि दिव्यांग मुलगा कुणाल आहे. घरातील कर्त्या पुरुषाच्या अचानक निधनाने, कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

या घटनेनंतर मतदान केंद्र परिसरात, हळहळ व्यक्त करण्यात येत असून, गरड कुटुंबाला शासनाने तातडीची, आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी नातेवाईकांकडून करण्यात येत आहे. अकोल्यात मतदानाचा हक्क बजावण्यासाठी घरातून बाहेर पडलेल्या एका मतदाराला, जीव गमवावा लागला आहे. या घटनेमुळे सगळीकडे हळहळ व्यक्त केली जात आहे.

Leave a Comment

अधिक वाचा