मुंबई – मुंबईत आमचे जे नगसेवक निवडून आलेत, ते सत्ताधार्यांना पुरून उरतील, अशी राज ठाकरे यांनी मुंबईतील महापालिका निवडणूकीच्या निकालानंतर प्रतिक्रिया दिली आहे. मुंबईतील ठाकरेंच्या पराभवामुळे मराठी माणूस वाऱ्यावर सोडला जाणार नाही, असे राज ठाकरेंनी निवडणूकीनंतर प्रतिक्रिया दिली आहे.
राज ठाकरे यांनी मुंबई महानगरपालिकेच्या निकालांवर, पहिली प्रतिक्रिया देताना कार्यकर्त्यांना पुन्हा नव्याने ऊर्जा देण्याचा प्रयत्न केला आहे. मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये, राज ठाकरेंच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला, अवघ्या 6 जागा जिंकता आल्या आहेत. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसोबत युती केल्यानंतरही राज यांच्या पक्षाला, दुहेरी नगरसेवकांचा आकडा गाठता आलेला नाही.
दादरसारख्या मराठीबहूल परिसरामध्ये नक्कीच राज ठाकरेंच्या पक्षाचा, उमेदवार निवडून आला असला , एकंदरित कामगिरी चांगली राहिलेली नाही. असे असतानाच निराश झालेल्या मनसैनिकांमध्ये नवा जोश फुंकण्यासाठी, राज ठाकरेंनी एक पोस्ट लिहिली आहे. राज ठाकरेंनी कार्यकर्त्यांना निराशा नक्कीच झाली आहे असे सांगतानाच पुन्हा जोमाने कामाला लागूया असेही सांगितले आहे.
मुंबईत महापालिका निवडणुकीत ठाकरे बंधूंना, मुंबईमध्ये अपेक्षित यश मिळाले नाही. ठाकरेंना महानगरपालिकेवर सत्ता राखण्यात, अपयश आल्यानंतर शिवसैनिकांबरोबरच मनसैनिकांकडून आता मराठी माणसाचे मुंबईत काय होणार? अशी चिंता व्यक्त करणार्या पोस्ट येत आहेत. मराठी माणसाच्या मुंबई कनेक्शनच्या भविष्याबद्दल सोशल मीडियावर, चिंता व्यक्त होत असतानाच राज ठाकरे यांनी याच सोशल मीडियावरुन पुन्हा जोमाने कामाला लागूया अशी पोस्ट केली आहे.
राज यांनी मनसैनिकांना पुन्हा उर्जा दिली आहे. राज ठाकरेंनी मुंबईत निवडून आलेले नगरसेवक ,नक्कीच सत्ताधार्यांना जेरीस आणण्याचे काम करतील असा विश्वास राज ठाकरे यांनी व्यक्त केला आहे, तर सर्व मनसैनिक यांना मुंबईत व राज्यात पुन्हा एकदा मराठीच्या मुद्दयावरुन आक्रमक भूमिकेमध्येच राहण्याचा सल्ला राज ठाकरे यांनी दिला आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला यावेळेस अपेक्षित यश मिळालं नसले याचे दुःख आहे, पण म्हणून खचून जाणाऱ्यातले आपण नाही. यावेळची निवडणूक ही सोपी नव्हती. अचाट धनशक्ती, सत्तेची शक्ती विरुद्ध शिवशक्ती अशी लढाई होती. पण अशा लढाईत सुद्धा पक्षाच्या कार्यकर्त्यांनी उत्तम झुंज दिली. मुंबईत आपले जे नगसेवक निवडून आलेत ते तिथल्या सत्ताधाऱ्यांना पुरून उरतील. आणि मराठी माणसाच्या विरोधात काही होत आहे असे दिसले तर, त्या सत्ताधार्यांना जेरीस आणतील , असे राज ठाकरे म्हणाले आहेत.
राज्यात व मुंबईत आपली लढाई मराठी माणसाची, मराठी भाषेची, मराठी अस्मितेसाठी आणि समृद्ध महाराष्ट्रासाठी लढाई आहे. ही लढाई हेच आपले अस्तित्व आहे. अशा लढाया या दीर्घकालीन असतात. त्यामुळे आपल्या मराठी माणसाच्या पाठीशी आपल्याला ठाम उभे राहायचे आहे. राज्यात निवडणुका येतील जातील पण, आपला श्वास हा मराठी आहे हे विसरायचे नाही, असे राज ठाकरे म्हणाले आहेत.





