मुंबईत दादरमध्ये ठाकरे बंधुंचा बोलबोला, तर सत्ताधारी भाजपा व शिंदेगट शिवसेना पराभूत

SHARE:

मुंबई – मुंबईमध्ये दादरमध्ये ठाकरे बंधुंचा विजय झाला आहे, तर सत्ताधारी भाजपा व शिंदेगट शिवसेना पराभूत झाली आहे. मुंबईत दादरमध्येठाकरे बंधुचाच विजय झाल्यामूळे, उद्धव ठाकरेंचा भाजपला तर राज ठाकरेंचा यांचा शिंदेंगट शिवसेनेला धक्का दिला आहे.

मुंबईत दादरमध्ये ठाकरे बंधूंनी आपला गड राखला आहे. त्यामुळे ठाकरे ब्रँड चालत नसल्याचे म्हणणाऱ्यांना ठाकरे बंधूंनी चोख उत्तर दिले आहे. दादरमध्ये मनसे आणि शिवसेना या दोघांचेही उमेदवार विजयी झाले आहेत. मुंबईत ठाकरे हा ब्रँड नाही त्याचा बँड वाजवू असे म्हणणाऱ्यांना ठाकरे बंधूंनी चोख उत्तर दिले आहे. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे या दोघांनीही दादरचा गड राखला आहे. राज ठाकरे यांचे उमेदवार यशवंत किल्लेदार हे विजयी झाले आहेत. तर उद्धव ठाकरे यांचे मिलिंद वैद्य विजयी झाले आहेत.

यशवंत किल्लेदार यांनी यांनी एकनाथ शिंदेंच्या प्रिती प्रकाश पाटणकर यांना हरवून विजय मिळवला आहे. तर मुंबईतील माहीममध्ये उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा दबदबा पाहायला मिळाला. ठाकरे गटाचे उमेदवार मिलिंद वैद्य हे वॉर्ड क्र. १८२ मधून विजयी झाले आहेत. शिवसेना व मनसे कार्यकर्त्यांनी एकत्र येत विजयी मिरवणूक काढली. उद्धव ठाकरेंनी दाखवलेला विश्वास मी कार्यकर्त्यांना दिला आणि निवडून आलो, असे ते म्हणाले.

मुंबईत लालबाग-परळच्या बालेकिल्ल्यात ठाकरे बंधूंचाच झेंडा कायम राहिला आहे. तर गिरणगावचा गड ठाकरे बंधूंनी राखला असून, गिरणगावातील ७  प्रभागांपैकी ६  प्रभागांमध्ये ठाकरे बंधूंचे उमेदवार विजयी झाले आहेत. ७  पैकी ६ जागांवर ठाकरे बंधूंचा विजय झाला असून, एका जागेवर समाजवादी पक्षाचा विजय झाला आहे. मुंबईत मनसेचे ६ उमेदवार विजयी झाले आहेत.

मुंबईत ठाकरे बंधूंनी बालेकिल्ल्यावर वर्चस्व कायम राखले आहे. मुंबईतील गिरणगाव आणि मध्यमवर्गीय मराठी बहुल लोकसंख्या असणाऱ्या परळ आणि लालबाग या भागामध्ये सुरुवातीपासूनच वर्चस्व होते. २०२६ च्या निवडणुकांमध्येसुद्धा ठाकरेंचे वर्चस्व या मतदारसंघावर असल्याचे पाहायला मिळाले आहे. २०३ आणि २०४ या प्रभागांमध्ये शिवसेना उबाठा साठी उभ्या असणाऱ्या उमेदवारांना कायमच मताधिक्य मिळाले आहे. नारायण राणेंपासून ते अगदी शिंदेंपर्यंत ठाकरेंच्या पक्षात झालेली बंडखोरीसुद्धा लालबाग-परळचे आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे नाते तोडू शकली नाहीत.

मुंबईत बंडखोरीची दृष्ट लागलेल्या ठाकरे गटशिवसेनेचे लालबागमधीत मतदार आणि कट्टर शिवसैनिकांनी हा गड राखला आहे. दादरमध्ये ठाकरे बंधूंचा विजय झाल्याने , मुंबईतील काही भागात अजुनही ठाकरेगटाला लोकांची साथ मिळत आहे, हे पाहायला मिळाले आहे. मुंबईतील यावर्षीच्या निवडणुका अतिशय संघर्षमय झालेल्या आहेत, आणि मुंबईत निवडणुकीत एकमेकांवर खुप आरोप-प्रत्यारोप झाल्याच्या घडामोडी पाहायला मिळाल्या आहेत.

Leave a Comment

अधिक वाचा