कांदिवलीमध्ये ठाकरेगट शिवेसेनेचा उमेदवार पराभूत, तर मुंबईतील मराठी अभिनेत्रीचा निवडणुकीत विजय

SHARE:

मुंबई – मुंबईतील कांदिवलीमध्ये ठाकरेगट शिवेसेनेचा उमेदवार पराभूत झाला आहे, तर मुंबईतील मराठी अभिनेत्रीचा निवडणुकीत विजय झाला आहे. मुंबईत या मराठी अभिनेत्रीला निवडणुकीत यश मिळाले आहे. ठाकरेंचा उमेदवार निवडणुकीत पडला आहे.

मुंबईमध्ये कांदिवलीमधून भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवलेल्या मराठी अभिनेत्रीला मुंबई मनपा निवडणुकीत यश मिळाले आहे. मुंबईतील प्रभाग क्रमांक २५ कांदिवली ठाकूर व्हिलेज परिसरामधून, अभिनेत्री भाजपच्या तिकिटावर निवडणूकीत विजयी झाली आहे.

काल शुक्रवार 16 जानेवारी रोजी राज्यातील २९ महानगरपालिकांच्या, निवडणुकांचा निकाल जाहीर झाला आहे. यापैकी मुंबई महापालिकेची निवडणूक सर्वाधिक चर्चेत राहिली असून, येथे महायुतीला मुंबईकरांनी मोठे यश दिले आहे. अशातच भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवलेल्या मराठी अभिनेत्रीला सुद्धा या निवडणुकीत यश मिळाले आहे.

या मराठी अभिनेत्रीने मुंबईत प्रभाग क्रमांक २५ मधून निवडणूक लढविली आहे. तर अभिनेत्री निशा परूळेकर ही आतापर्यंत मराठी चित्रपटसृष्टी, नाटक इत्यादींमधून काम करत आहे. निशा परूळेकर हिला प्रभाग क्रमांक २५ कांदिवली ठाकूर व्हिलेज परिसरामधून भाजपकडून उमेदवारी मिळाली होती. काल शुक्रवारी हाती आलेल्या निकालांच्यानुसार, प्रभाग क्रमांक २५ मध्ये निशा परूळेकर विजयी झाली आहे. तिने ठाकरेगट शिवसेनेचे उमेदवार योगेश भोईर यांचा पराभव केला आहे.

ही मराठी अभिनेत्रीने याआधी राजकारणात सक्रिय होती, तर मनोरंजनसृष्टीत कार्यरत असलेल्या निशा परूळेकर यांचे पूर्वीपासूनच राजकीयपक्षांशी संबंध होते. भाजपचे विधानपरिषद आमदार आमदार प्रवीण दरेकर यांच्या कार्यकर्त्या म्हणून त्या ओळखल्या जात होत्या. या कारणामुळेही निशा परुळेकर यांना प्रभाग क्रमांक २५ कांदिवली ठाकूर व्हिलेज परिसरामधून उमेदवारी देण्यात आली होती.

सुरुवातीला मराठी अभिनेत्रीला कांदिवलीमधून उमेदवारी का देण्यात आली? यासंदर्भात कार्यकर्त्यांमध्ये काहीशी नाराजी होती, मात्र उमेदवारी जाहीर झाल्यावर, निशा परुळेकर यांनी मुंबईतील कांदिवली परिसरातील घराघरात जाऊन प्रचार केला. त्यामूळे मुंबई महापालिकेवर त्या नगरसेवक म्हणून निवडून आल्या आहेत. मुंबईतील काही मतदारसंघात मोठी संघर्षाच्या निवडणुका झाल्या आहे. तर मुंबईतील कांदिवली परिसरात ठाकरेगट शिवसेनेचे सक्रीय असलेले उमेदवार योगेश भोईर हे या महापालिका निवडणूकीत पराभूत झाले आहेत.

Leave a Comment