कोल्हापूर – कोल्हापूरमध्ये राज्य महामार्गावर, कार अपघातामध्ये महिलेचा मृत्यू झाला आहे, या प्रकरणात पोलिसांकडून एक जणाला अअक करण्यात आली आहे.तर बाळंतपणानंतर डिस्चार्ज घेऊन जाणाऱ्या महिलेचा अपघाती मृत्यू झाला आहे, यामूळे संतप्त जमावाने कार पेटवली आहे. कोल्हापुरमध्ये दोन कार समोरासमोर धडकल्यानंतर झालेल्या, अपघातामध्ये महिलेचा मृत्यू झाला आहे. त्यानंतर संतप्त जमावाने नेसरी पोलीस ठाण्यावर मोर्चा काढला.
कोल्हापूरमध्ये चंदगड-गडहिंग्लज राज्य महामार्गावर घडलेल्या अपघातामध्ये, बाळंतपणानंतर डिस्चार्ज घेऊन निघालेल्या महिलेचा मृत्यू झाला आहे. सुवर्णा कुंदेकर असं मृत महिलेचं नाव असून, दोन गाड्यांची समोरासमोर धडक झाल्याने हा अपघात झाला. या घटनेनंतर गावकरी संतप्त झाले ,आणि त्यांनी कार पेटवून दिली. ग्रामस्थांच्या उद्रेकानंतर या प्रकरणात, एकाला अटक करण्यात आली आहे. या घटनेनंतर संतप्त लोकांचा पोलिसांना आक्रोश थांबवता आला नाही. रस्ता आणि वाहतुकीची जबाबदारी, प्रश्नांवरून संतप्त जमावाने कार पेटवली.
महिलेच्या मृत्यूनंतर ग्रामस्थांचा उद्रेक झाल्याचे दिसून आले आहे. तर नेसरी ग्रामस्थांनी, पोलीस ठाण्यावर मोर्चा काढला. ग्रामस्थांच्या उद्रेकानंतर सहायक पोलीस निरीक्षक आबा गाढवे ,यांची पोलीस कंट्रोल रूमला तडकाफडकी बदली करण्यात आली. आमदार शिवाजी पाटील यांनी ग्रामस्थांची, समजूत काढल्यानंतर महिलेच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. घटनेच्यावेळी नेसरी पोलिसांना आणि नागरिकांना मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, हा अपघात खराब रस्त्यामुळे आणि वाहनचालकाच्या चुकांमुळे, घडला असण्याची शक्यता आहे.
तरीही, नेमके कारण अजून स्पष्ट झाले नाही.नेसरी पोलीस ठाण्याचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून, तपास सुरू आहे. अपघातातील कारणे आणि त्याचे नेमके तपशील उलगडण्यासाठी, चौकशी करण्यात येत आहे. भविष्यात अशी दुर्दैवी घटना पुन्हा होऊ नये यासाठी प्रशासनाने प्रयत्न करावेत अशी भूमिका नागरिकांनी व्यक्त केली. याप्रकरणात अधिक तपास कोल्हापुर पोलिस करत आहेत.





