आंधप्रदेश – भारतात ग्रीन अमोनिया प्लांट प्रकल्प सुरु होणार आहे, तर आंध्रप्रदेश राज्यातील ८००० लोकांना नोकरी मिळणार आहे. जगातील सर्वात मोठा ग्रीन अमोनिया प्लांट प्रकल्प, भारतातील आंधप्रदेश या राज्यात सुरू होणार आहे, तर या राज्यात ८००० लोकांना नोकरी मिळणार आहे. भारतातील पहिला आणि जगातील सर्वात मोठा, हिरवा अमोनिया आणि हायड्रोजन उत्पादन प्रकल्प, भारतात सुरू होत आहे.
देशातील विविध राज्यांमध्ये रस्ते, ब्रीज, मेट्रो, रेल्वे लाईनसह अनेक, प्रकल्पांवर काम सुरु आहे. या निर्माणातून जनतेला सुविधा मिळणार आहेत. तसेच रोजगार निर्मितीही होतेय. जगातील सर्वात मोठा ग्रीन अमोनिया प्लांट, भारतात सुरु होतोय. यातून अनेक रोजगाराच्या, संधी निर्माण होणार आहेत. आंध्रप्रदेश राज्यातील काकिनाडा येथे भारतातील ,पहिला आणि जगातील सर्वात मोठा हिरवा अमोनिया, आणि हायड्रोजन उत्पादन प्रकल्प सुरू होतो आहे. हा ’एएम ग्रीन’ नावाचा उपक्रम असून यात, विद्यमान अमोनिया-युरिया युनिटला, हिरव्या अमोनियाच्या कॉम्प्लेक्समध्ये रूपांतरित केले जाणार आहे.
हा प्रकल्प जर्मनी, जपान आणि सिंगापूर सारख्या देशांना, ग्रीन एनर्जी पुरवण्यासाठी महत्त्वाचा आहे. आंध्र प्रदेशच्या ’इंटिग्रेटेड क्लीन एनर्जी पॉलसी २०२४’ अंतर्गत हा राज्याला, ग्रीन हायड्रोजन आणि अमोनियाचे केंद्र बनवण्यात मदत करणार आहे. यामुळे ऊर्जा आयातीवर अवलंबित्व कमी होईल, आणि भारताची पहिली ग्रीन ऊर्जा निर्यात सुरू होईल. हा उपक्रम पर्यावरणस्नेही ऊर्जा उत्पादनासाठी एक मोठे पाऊल आहे.
आंध्रप्रदेशातील हा प्रकल्प ’एएम ग्रीन’ कंपनीच्या, नेतृत्वात सुरु होतो आहे. ज्यात मलेशियाची जेंटारी, सिंगापूरची सरकारी संपत्ती निधी, जीआयसी आणि अबू धाबी इन्व्हेस्टमेंट अथॉरिटी यांचा सहभाग आहे. या कंपन्या एकत्र येऊन ग्रीन एनर्जी, उत्पादनात गुंतवणूक करत आहेत. ’एएम ग्रीन’ने जर्मनीच्या युनिपर कंपनीसोबत, लॉंगटर्म पुरवठा करार केला आहे. तर जपान आणि सिंगापूरमधील संभाव्य, खरेदीदारांसोबत चर्चा सुरू आहेत. याद्वारे भारताला आंतरराष्ट्रीय बाजारात, मजबूत स्थान मिळू शकणार आहे.
या मोठ्या स्वच्छ ऊर्जा प्रकल्पात, एकूण १० अब्ज डॉलर म्हणजेच ८३००० कोटी रुपये गुंतवणूक होणार आहे. ही रक्कम भारतातील सर्वात मोठ्या, क्लीन एनर्जी उपक्रमांपैकी एक आहे. गुंतवणूकदारांमध्ये परदेशी आणि स्थानिक भागीदार आहेत. जे ग्रीन एनर्जी क्षेत्रात विश्वास दाखवतात. या गुंतवणुकीतून उत्पादन वाढणार आहेच. यासोबत राज्याच्या अर्थव्यवस्थेला चालना, मिळून नवीन रोजगार संधी निर्माण होणार आहेत.
या प्रकल्पाची पूर्ण क्षमता दरवर्षी १.५ दशलक्ष टन ग्रीन अमोनिया उत्पादनाची आहे. यातइ ७.५ गिगावॅट सौर आणि पवन ऊर्जा उत्पादन, १९५० मेगावॅट इलेक्ट्रोलाइजर आणि पंप हायड्रो स्टोरेज समाविष्ट आहे, जे २ गिगावॅट नवीकरणीय ऊर्जेची २४ तास पुरवठा सुनिश्चित करेल. हा भारतातील पहिला असा प्लांट आहे जा,े पिन्नापुरम येथे आहे. हे तंत्रज्ञान स्वच्छ ऊर्जा उत्पादनासाठी प्रगत आहे , आणि जागतिक स्तरावर हिरवी हायड्रोजन वाहक म्हणून अमोनियाचा वापर वाढणार आहे.
हा प्रकल्प तीन टप्प्यांत पूर्ण होईल. पहिल्या टप्प्यात २०२७ पर्यंत ५ लाख टन उत्पादन, दुसऱ्या टप्प्यात २०२८ पर्यंत १० लाख टन आणि तिसऱ्या टप्प्यात २०३० पर्यंत १५ लाख टन उत्पादन होईल. हे टप्पे क्रमाक्रमाने वाढवले जाईल, ज्यामुळे उत्पादन सातत्याने वाढेल. मुख्य उपकरणांचे उदघाटन मुख्यमंत्री एन. चंद्रबाबू नायडू आणि उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांच्या हस्ते झाले आहे. राज्यात ग्रीन अमोनिया जहाजांसाठी स्वच्छ इंधन, वीज उत्पादन आणि हिरवी हायड्रोजन वाहक म्हणून वापरला जाईल, ज्यामुळे कार्बन उत्सर्जन कमी होईल आणि टिकाऊ ऊर्जा प्रोत्साहित होईल, असे सांगितले जात आहे.
या प्रकल्प बांधकाम काळात ,8000 रोजगार निर्माण होणार आहेत. बांधकाम सुरु झाल्यानंतर नवीकरणीय ऊर्जा, लॉजिस्टिक्स आणि बंदर सेवांमध्ये नोकऱ्या मिळणार आहेत. या प्रकल्पातून राज्य पर्यावरणस्नेही विकासात अग्रेसर बनेल आणि स्थानिक अर्थव्यवस्थेला मजबूत होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे, तर या प्रकल्पामूळे आंध्रप्रदेशातील लोकांना मोठा रोजगार मिळणार आहे, आंध्रप्रदेशात राज्यातील स्थानिक लोकांना ऊर्जा, लॉजिस्टिक्स आणि बंदर सेवांमध्ये नोकऱ्या मिळणार आहेत, असे आंध्रप्रदेश राज्यातील प्रशासनाने म्हटले आहे.





