मुंबईत आपला महापौर व्हायला पाहिजे हे स्वप्न आहेच, उद्धव ठाकरेंच्या सूचक वक्तव्याने चुरस वाढली

SHARE:

मुंबई – मुंबई महापालिकेसाठी झालेल्या अटीतटीच्या लढतीत महायूतीला जेमतेम काठावर बहुमत मिळाले. भाजपला ८९ जागा आणि शिंदेसेनेला २९ जागा मिळाल्या. म्हणजे महायूतील जेमतेत ११८ जागा मिळाल्या. ठाकरे बंधू आणि कांग्रेस व इतर पक्षांची गोळाबेरीज केली तर केवळ ४  जागा कमी पडतात. दरम्यान ठाकरेंनी देखील मुंबइत महापौर बनवण्याचा चंग बांधल्याचे दिसून येत आहे. मुंबईत आपला महापौर व्हायला पाहिजे हे तर स्वप्न आहेच, असं सूचक वक्तव्य शिवसेना उबाठाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केलं आहे. त्यांच्या या वक्तव्याने मुंबई महापौर पदाची चुरस वाढल्याचे दिसून येत आहे.

मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीचे निकाल शुक्रवारी लागले. भाजपा आणि शिंदेसेनेच्या महायुतीला ११८ जागांवर विजय मिळाला. त्यात ८९ जागा भाजपाला तर २९ जाग शिंदेसेनेला मिळाल्या. तर दुसरीकडे ठाकरे बंधूंना ७१ जागा मिळाल्या आहेत. त्यात उद्धव ठाकरेंच्या सेनेला ६५, मनसेला ६, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला १, काँग्रेसला २४, एमआयएमला ८, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाला ३  आणि उर्वरित जागा इतरांना मिळाल्या आहेत. या एकुण १०७ जागा होतात. त्यामुळे महापौरपदाच्या निवडीबाबत चुरस वाढली आहे.जर ठाकरे बंधू, कांग्रेस, एमआयएम, अजित पवार आणि शरद पवार गट एकत्र येवून त्यांनी महापौर पदावर दावा केला तर वावगे ठरू नये. तसं वक्तव्य देखील उद्धव ठाकरे यांनी केलं आहे.

दुसरीकडे शिंदे सेनेचे नगरसेवक फुटण्याची शक्यता असल्याने शिंदेंनी सर्व २९ नगरसेवकांना हॉटेलमध्ये हलवलं आहे. कारण एकीकडे शिंसेसेनेत गेलेल्या अनेक नगरसेवकांचा पराभव झाला आहे. त्यामुळे त्यांना यापुढे निवडून येण्याची भीती सतावत आहे. याशिवाय शिंदेसेनेत गेलेल्या अनेक नगरसेवकांनी उद्धव ठाकरे यांच्यासोबत काम केलं आहे. त्यामुळेच शिंदेंचे नगरसेवक फुटू शकतात, अशी शक्यता असल्याने शिंदेंनी आपल्या सर्व २९ नवनिर्वाचित नगरसेवकांना महापौर पदाची निवडणूक होईपर्यंत मुंबईतील पंचतारांकीत हॉटेलमध्ये हलवलं आहे.

मुंबईत झालेल्या अटीतटीच्या निवडणुकीमध्ये भाजपा आणि शिंदे सेनेला काठावरचं बहुमत मिळालं आहे. तर विरोधी पक्षातील ठाकरे बंधूंची युती आणि काँग्रेससह इतर पक्षांच्या नगरसेवकांची गोळाबेरीज देखील बहुमताजवळ जाणारी आहे. त्यामुळे आता मुंबईच्या महापौरपदाच्या निवडणुकीबाबत उत्सुकता निर्माण झालेली आहे. त्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी मुंबईच्या महापौरपदाबाबत सूचक विधान केलं आहे. मुंबईत आपला महापौर बसावा अशी इच्छा आहेच, देवाच्या मनात असेल तर तेही होईल, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.
मुंबई महानगरपालिका निवडणुकीत विजयी झालेल्या उद्धवसेनेच्या नगरसेवकांनी शनिवारी मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांची भेट घेतली.

त्यावेळी उपस्थितांना संबोधित करताना उद्धव ठाकरे म्हणाले की आपला महापौर व्हायला पाहिजे हे तर स्वप्न आहेच. बघू देवाच्या मनात असेल तर तेही होईल, असं सूचक विधान केलं आहे. ठाकरेच्या या वक्तव्यानंत उपस्थित शिवसैनिकांनी टाळ्या वाजवत जल्लोष केला. ठाकरेंच्या या वक्तव्याने मुंबई महानगरपालिकेच्या महापौरपदाच्या निवडणुकीची चुरस वाढली आहे.
दुसरीकडे पत्रकार परिषदेत बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले कि मुंबईमध्ये आमचा महापौर होणार आणि व्हावा अशी आमची एक इच्छा होतीच व आजही आहे. परंतु तो आकडा आम्ही गाठू शकलो नाही. पण त्यांच्या सर्व खेळाला उत्तर देऊन जे काही निकाल लागला आहे, त्या निकालाने सत्ताधारी पक्षाला घाम फोडलाय, हे मात्र नक्की. कारण त्यांनी शिवसेनेला नामोहरण करण्याचा एकही प्रयत्न सोडला नाही.

विधानसभेला शिवाजी पार्कवर त्यांच्या खुर्च्या रिकाम्या होत्या, आत्तासुद्धा आमच्या सभेला शिवाजी पार्क फुलून गेलं पण त्यांच्या सभेला गर्दी नव्हती. मग, आमच्या सभेला गर्दी होते पण मतं मिळत नाही, यांना रिकाम्या खुर्च्यांनी मतदान केलं का? असा सवाल उद्धव ठाकरेंनी उपस्थित केला. शिवसेना संपवण्याचा त्यांनी पूर्ण प्रयत्न केला, आमचे अर्धे आमचे नगरसेवक त्यांनी गळाला लावले पण आता ते गाळात गेले आहेत. भाजप पक्ष हा कागदावर आहे पण जमिनीवरती नाही, असा टोला त्यांनी भाजपला लगावला.

Leave a Comment

अधिक वाचा