बड्या कंपन्यांची आपल्याकडं गुंतवणूक का नाही? फडणवीस दावोस दौऱ्यावर असतानाच रोहित पवारांचा खोचक टोला

SHARE:

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उद्योगमंत्री उदय सामंत आणि अधिकारी असा लवाजमा घेऊन दावोसला जात आहे. महाराष्ट्रात गुंतवणूक वाढवण्यासाठी आणि जगभरातील कंपन्यांना महाराष्ट्राकडे वळवण्यासाठी त्यांचा हा दौरा महत्त्वाचा मानल्या जात आहे. गेल्यावेळी ते दावोसला गेल्यावर मोठी गुंतवणूक आणि अनेक कंपन्या राज्यात येणार असल्याचा दावा करण्यात आला होता. पण रोहित पवार यांनी आता त्यावरूनच मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यापूर्वी ट्विटमधून खोचक टोला लगावला आहे. त्यांनी जागतिक दर्जाच्या कोणत्या कंपन्या इतर राज्यात गेल्या याची माहिती दिली आहे.

राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी कोणत्या कंपन्या या इतर राज्यात गेल्या याची माहिती ट्विटमधून दिली आहे. त्यांनी ट्विटमध्ये म्हटल्यानुसार, Disney ही मनोरंजन क्षेत्रातील तर Honeywell ही सायबर सिक्युरिटी तंत्रज्ञानांतील आघाडीची कंपनी आहे. या दोन्ही कंपन्यांनी भारतात विस्तार करण्यासाठी बंगळुरु मधील बेलंदुर ची निवड केलीय. Disney ने बेलंदुर इथे १,७४,०००  Sqft जागा भाड्याने घेण्याचा करार केलाय तर honeywell ने तब्बल ४,००,००० Sqft चं ऑफिस सात वर्षांसाठी घेतलंय. बाहेरील कंपन्या या इतर राज्यात गुंतवणूक करत आहेत अशा आशयाचे ट्विट त्यांनी केलं आहे.

मग आपल्याकडं गुंतवणूक का नाही?

तर यावेळी सरकार दावोसमध्ये जाते मग आपल्याकडं मोठ्या कंपन्या का येत नाही याविषयीचे सूतोवाच केले.Deloitte ने देखील मंगलुरु मध्ये येऊन तब्बल ५०,०००  लोकांची भरती करणार असल्याची घोषणा केली आहे. maruti suzuki तब्बल ३५००० कोटी गुंतवणूक करून गुजरातमध्ये नवा प्लांट उभारत आहे. मुंबई पर्यायाने महाराष्ट्र देशाचे आर्थिक इंजिन असताना व राज्यात बेरोजगारी वाढत असताना या कंपन्या आपल्याकडं ही गुंतवणूक का करत नाहीत, असा एक नागरिक म्हणून प्रश्न पडतो, असा टोला रोहित पवार यांनी लगावला.

आजपासून मुख्यमंत्री आणि उद्योगमंत्री दावोस दौऱ्यावर जात आहेत. या दोघांनी शर्थीचे प्रयत्न करून जागतिक दर्जाच्या अशा नामांकित कंपन्यातून राज्यात जास्ती जास्त गुंतवणूक आणून राज्यातील बेरोजगार युवकांना दिलासा द्यावा अशी अपेक्षाही त्यांनी या ट्विटमधून व्यक्त केली आहे.


मुख्यमंत्री 5 दिवसीय दाओस दौऱ्यावर

उद्यापासून देवेंद्र फडणवीस 5 दिवसीय दावोस दौऱ्यावर आहेत. वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या वार्षिक बैठकीला ते उपस्थित असतील. मुख्यमंत्री १९ ते २३ जानेवारीपर्यंत दावोसमध्ये असतील. गेल्यावर्षी राज्य सरकारने जवळपास १६  लाख कोटींहून अधिकचे करार केले होते. यंदाही तितकेच करार करण्याचे सरकारचे लक्ष आहे. तर गेल्यावेळी केलेल्या करारातील ७२ टक्के MOU प्रत्यक्षात आल्याचा दावा मुख्यमंत्र्यांनी केला आहे.

Leave a Comment

अधिक वाचा