पर्यावरण…

SHARE:

पर्यावरणावर आधारित श्री. संजय अण्णाजी देशमुख यांची कविता वाचकांसाठी येथे प्रकाशित करत आहोत

 

ठेव माणसा रे भान…

 

ठेव माणसां रे भान
निसर्गान दिले दानं,
नको जाऊ विसरून
त्याची वाढवं रे शान..

सुखी तुझे हेची धाम
नको होऊ बेईमान,
फेड उपकार त्याचे
लावुनिया झाडं दोन..

ऊन वारा नि पाऊस
हीच त्याचीच रे देणं,
फुले फळे नि औषध
निवविती सारे जण..

आज कोंडतोय दम
बोले सहज मुखानं,
कसा ओरडतो आज
तूच त्याच्या रे नावानं..

कसा केला वेडेपणा
केली सारी तूच घाण,
झाली दुःखी वसुंधरा
तुझं पाहून वागणं..

सारे घेऊया शपथ
आता टाळू प्रदुषण,
ठेवू कर्तव्याची जाणं
करू वृक्ष संवर्धन..

लेखक –
संजय अण्णाजी देशमुख
मु. पळसखेड, जि. अमरावती.
संपर्क – ९४२१७८९००९

संजय अण्णाजी देशमुख
Author: संजय अण्णाजी देशमुख

लेखक एक उत्कृष्ट शिक्षक, साहित्यिक, मार्गदर्शक, कवी, अभंगकार, पोवाडे रचियेता, सर्वोत्कृष्ट काव्य रचनेचे राज्य स्पर्धा पुरस्कर्ते आहेत. 'चरे अंतरीचे' हा त्यांचा काव्यसंग्रह २०२३ ला प्रकाशित झालेला असून पुढील दोन काव्य संग्रह लवकरच प्रकाशित होत आहे. तसेच राजकीय, सामाजिक, शैक्षणिक व धार्मिक विषयावरील ज्वलंत सडेतोड विचार मांडणारेउत्कृष्ट लेखक आहेत. विविध सामाजिक संघटनेच्या माध्यमातून सुद्धा ते सामाजिक क्षेत्रात अग्रेसर आहेत. सा. रयत रक्षक, महाराष्ट्र व रयत रक्षक न्यूज, महाराष्ट्र च्या माध्यमातून साहित्य व वैचारिक लेख, काव्यरचना च्या माध्यमातून सतत आपले विचार जनतेपुढे मांडत असतात..

Leave a Comment