मुंबईत वाहन चोरीच्या घटना वाढल्या, मागील वर्षात ६४,०१२ वाहने चोरी, रोज ५ ते ६ वाहने चोरीस जातात

SHARE:

मुंबई – मुंबईत वाहन चोरीच्या घटना वाढल्या आहेत, तर मागील वर्षात ६४,०१२  वाहने चोरीस गेली आहेत, तर रोज ५  ते ६  वाहने मुंबईत चोरीस जातात, अशी माहिती मुंबई पोलिसांनी दिली आहे. मुंबईकरांची वाहने मोठ्या प्रमाणावर चोरीला जात आहेत. हा गाड्या चोरीचा प्रश्न पुन्हा उपस्थित झाला आहे. मुंबई शहरात वाहन चोरीच्या घटना सातत्याने वाढत असून, अनेक गुन्ह्यांचा तपास अजूनही अपूर्ण आहे. रोज दिवसाढवळ्या आणि रात्रीच्या वेळी होणाऱ्या चोरीमुळे सामान्य नागरिकांमध्ये, वाहनांच्या असुरक्षिततेची भावना वाढत चालली आहे.मुंबईत वाहन चोरीचं मोठं रॅकेट आहे. एका वर्षाला ६४,०१२  दुचाकी वाहने चोरीस जात आहेत. तर या चोरलेल्या वाहनांची परराज्यात विक्री होत आहे. मुंबई पोलिसांच्या माहितीनुसार वाहने चोरीच्या घटना मुंबई शहरात रोज वाढत चालल्या आहेत.

मुंबईतील वाहन चोरी ही समस्या, केवळ मुंबई शहरापुरती मर्यादित राहिलेली नाही. अंधेरी, जोगेश्वरी, मालाडसारख्या परिसरांबरोबरच, उपनगरांमध्येही दुचाकी चोरीचे प्रमाण वाढले आहे. वसई-विरार परिसरातही अशा घटना समोर आल्या आहेत. सर्वसामान्य नागरिक नाराज झाले आहेत. मुंबईत गेल्या एका वर्षात वाहन चोरीचे एकूण २,२९९  गुन्हे नोंदवले गेले आहेत. यापैकी निम्म्या म्हणजे १,३५७  वाहने चोरींच्या गुन्ह्यांचीच चौकशी झालेली आहे. अनेक वाहनांचे अजूनही काहीही ठावठिकाणा लागला नाही. मुंबईत दररोज सरासरी ५  ते ६ वाहने, चोरीला जात असल्याने, ही समस्या गंभीर बनत चालली आहे.

मुंबई पोलिसांच्या माहितीनुसार, मागील वर्षात शहरात एकूण ६४,०१२  गुन्हे नोंद झाले, त्यापैकी ५१,५५९  गुन्ह्यांची चौकशी झाली आहे. मात्र वाहन चोरीच्या बाबतीत वाहने परत मिळण्याचे प्रमाण कमी आहे. २०२४ मध्ये वाहन चोरीचे २,५८९   गुन्हे नोंदले गेले होते. त्याच्या तुलनेत थोडी घट झाली असली, तरी परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात आली आहे, असे म्हणता येणार नाही, अशी मुंबई पोलिसांनी माहिती दिली आहे. चोरी झालेल्या बहुतांश गाड्या, मुंबईबाहेर नेल्या जात असल्याचे पोलिस तपासात उघड झाले आहे. या गाड्या गुजरात, राजस्थान, मध्यप्रदेश, उत्तरप्रदेश आणि कर्नाटकसारख्या राज्यांमध्ये विकल्या जातात. काही वेळा या चोरीच्या वाहनांचा वापर, इतर गुन्ह्यांसाठीही केला जातो, ज्यामुळे गुन्ह्यांची आकडेवारी वाढते आहे.

राज्यात पूर्वी वाहन चोरीसाठी, स्वतंत्र पथक होते. मात्र २०१८ मध्ये हे पथक बंद करून, मालमत्ता कक्षात विलीन करण्यात आले. त्यामुळे वाहन चोरीच्या तपासासाठी लक्ष देणारी यंत्रणा, कमी पडत आहे. एखादी टोळी पकडली गेली, तर १० ते १५ गुन्ह्यांची चौकशी होते, हे पोलिस कारवाईतून माहिती झाले आहे. राज्यात काही गुन्हेगारी टोळ्या भंगार आणि सोशल मीडियाचा गैरवापर वापर करत आहेत. काही टोळ्या चोरी केलेल्या वाहनांचे सुटे भाग वेगळे करून, ते भंगारात किंवा गॅरेजमध्ये स्वस्तात विकतात. तर काही जण भंगारातील कागदपत्रांचा वापर करून ,चोरीच्या गाड्या पुन्हा विक्रीस काढतात. सोशल मीडियावरही अशा फसव्या जाहिराती दिसतात. याप्रकरणात कडक कारवाई करण्याची गरज आहे. राज्यातील वाहन चोरीचे वाढते प्रकार पाहता, स्वतंत्र तपास पथक, कडक कारवाई आणि नागरिकांची जागरूकता, यांची गरज आहे. आजघडीला राज्यात दुचाकी वाहनांच्या चोरीचे प्रमाण, हे दिवसेंदिवस रोजच वाढतच चालले आहे.

Leave a Comment

अधिक वाचा