धाडकन तोंडावर आपटलं सोनं, चांदीचे भावही झटक्यात खाली; आजचे दर किती बघा ?

SHARE:

सोन्या-चांदीच्या दरात सातत्याने वाढ पहायला मिळत होती, ते सर्सामान्य लोकांच्या आवाक्याबाहेर जाताना दिसत होतं. मात्र आज, शुक्रवारी सकाळी सोन्या-चांदीच्या दरांमध्ये मोठी घसरण झालेली पहायला मिळाली.
गेल्या काही दिवसांपासून सराफा बाजारात सुरू असलेला तेजीचा वेग शुक्रवारी अचानक थांबला. तुम्ही सोनं किंवा चांदी खरेदी करण्याचा विचार करत असाल आणि वाढत्या किमतींबद्दल काळजीत असाल, तर आजची बातमी तुम्हाला दिलासा देणारी ठरू शकते. २९  जानेवारी रोजी विक्रमी उच्चांक गाठल्यानंतर, ३०  जानेवारीच्या म्हणजेच आज, शुक्रवारी सकाळी सोनं- चांदी या मौल्यवान धातूंच्या बाजारपेठेत घबराट पसरली होती. मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर सोनं आणि चांदी दोन्हीही मोठ्या प्रमाणात घसरले. गुरुवारी तेजीत असलेल्या बाजारात आज वेगळंच चित्र होतं.
MCX वर सुरुवातीच्या व्यवहारात दोन्ही धातू ५ टक्क्यांहून अधिक घसरले. ३० जानेवारी रोजी सकाळी एमसीएक्सवर सोन्याचा भाव ५.५५  टक्क्यांनी घसरून १,६०,००१ रुपये प्रति १० ग्रॅम झाला. ही घसरण लक्षणीय आहे कारण सोनं अलीकडेच १,९३,०६९ या सर्वकालीन उच्चांकावर पोहोचलं होतं. मात्र आज, सोन्याचे भाव अंदाजे ९ हजार ४०२ रुपयांनी घसरले आहेत.
दरम्यान, दुसरीकडे चांदीचे दर ४.१८ टक्क्यांनी घसरले आणि १ किलोसाठी चांदीची किंमत ३,८३,१७७  रुपये झाली. चांदीच्या किमतीत फक्त एकाच दिवसात १६,७१६ रुपयांची मोठी घसरण झाली आहे. गुरुवारी चांदीने ४,२०,०४८  रुपये प्रति किलोचा नवा विक्रम प्रस्थापित केला होता, परंतु आजच्या नफा वसुलीमुळे किमती खाली आल्या.

किरकोळ बाजारात परिस्थिती काय ?

आज केवळ फ्युचर्स मार्केटच नाही तर किरकोळ बाजारातही मंदी दिसून आली आहे. सामान्य खरेदीदारांसाठी ही एक चांगी संधी असू शकते. बुलियन वेबसाइटवरील आकडेवारीनुसार, ३० जानेवारी रोजी किरकोळ बाजारात सोन्याचा भाव ५,३०० रुपयांनी घसरून १,६५,१८० रुपये प्रति १० ग्रॅम झाला. दरम्यान, चांदीचा भाव २३,३६० रुपयांनी घसरून ३,७९,१३०  रुपये प्रति किलो झाला.

आंतरराष्ट्रीय बाजारातील गोंधळामुळे भारतीय बाजारावरही दबाव निर्माण झाला. जागतिक स्तरावर, स्पॉट गोल्ड १.६५ % घसरून ५२,१७ डॉलर प्रति औंस झाले, जे एका दिवसापूर्वी ५,५९४ .८२  २ डॉलरचा विक्रमी उच्चांक होता. त्याचप्रमाणे, स्पॉट चांदीचा भावही २.८६ टक्क्यांनी घसरून ११० डॉलर प्रति औंस झाला.

Leave a Comment

अधिक वाचा