विमान अपघाताला डीजीसीए जबाबदार, अजित पवारांच्या मृत्यूवर संजय राऊतांनी केले प्रश्न उपस्थित

SHARE:

मुंबई – दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा बुधवारी बारामती विमानतळावर झालेल्या अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला आहे. बारामती विमानतळावर लँडिंग करण्याच्या प्रयत्नात त्यांचं विमान शेतात कोसळलं, त्यानंतर विमानाला आग लागली. यात अजित पवारांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. अजित पवारांच्या मृत्यूवरून अनेक तर्क विर्तक लावले जात आहेत. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी तर सुप्रीम कोर्टाच्या नेतृत्वाखाली चौकशीची मागणी केली आहे. आता शिवसेना (उबाठा) चे खासदार संजय राऊत यांनी विमान अपघातावरून डीजीसीएला जिम्मेदार ठरवले आहे.

संजय राऊत म्हणाले की अजित पवारांच्या मृत्यूकडे राजकीय दृष्टिकोनातून पाहू नये, तर तांत्रिकदृष्ट्या त्याची सखोल चौकशी झाली पाहिजे. ज्या विमानतळावर अपघात झाला तेथे आवश्यक सुविधांचा प्रचंड अभाव आहे. संजय राऊत यांनी असा प्रश्न उपस्थित केला की विमानतळावर एटीसी, रडार आणि पुरेसे कर्मचारी नसतानाही मोठी व्हीआयपी विमाने उतरत आणि उड्डाण करत राहिली. बारामती विमानतळ आवश्यक उपकरणांनी पूर्णपणे सुसज्ज नाही तर मग विमान वाहतुकीला परवानगी का देण्यात आली, असा सवाल राऊत यांनी विचारला आहे.

राऊत म्हणाले की देशभरात आणि महाराष्ट्रात असंख्य हवाई पट्ट्या बांधल्या गेल्या आहेत, परंतु त्या चालवण्यासाठी ना यंत्रणा आहे ना पुरेशा सुरक्षा उपाययोजना. यामुळे अपघातांचा धोका निर्माण होतो आणि अजित पवार यांचा मृत्यू हे त्याचे एक उत्तम उदाहरण आहे. राऊत म्हणाले की अशा प्रत्येक घटनेनंतर डीजीसीए चौकशीची घोषणा करते, परंतु त्याचे निकाल माहित होत नाहीत.

राज्यसभा सदस्य म्हणाले कि बारामती विमानतळावर रडार किंवा एटीसी नव्हते. तिथे कोणतीही यंत्रणा नव्हती, फक्त एकच धावपट्टी होती आणि या विमान अपघातसाठी डीजीसीए जबाबदार आहे. अशा घटनांची चौकशी झाली पाहिजे. आपण महाराष्ट्रातील एका महत्त्वाच्या व्यक्तीला गमावले आहे आणि डीजीसीएने याची जबाबदारी घेतली पाहिजे. तुम्ही अशा विमानतळांना कसे चालवू देता?, असा सवाल राऊतांनी उपस्थित केला.

संजय राऊत म्हणाले कि विमानात कोणत्या त्रुटी होत्या? हे सार्वजनिक केले पाहिजे. त्यांनी गुजरातमधील अहमदाबाद येथे झालेल्या विमान अपघाताचाही उल्लेख केला. ते म्हणाले की या विमान अपघातात गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपानी यांच्यासह अनेकांना आपले प्राण गमवावे लागले.

शिवसेना नेते रामदास कदम म्हणाले की जेव्हा सहा वेळा उपमुख्यमंत्री राहिलेल्या व्यक्तीसोबत असा अपघात होतो तेव्हा त्याची सखोल चौकशी होणे आवश्यक आहे. जर असे अपघात सामान्य झाले तर कोणताही राजकीय नेता विमानाने प्रवास करणार नाही. एका व्हिडिओमध्ये विमान लँडिंग करताना एका बाजूला झुकताना दिसत आहे. काही लोकांनी म्हटले की त्याचा आवाज वेगळा होता. मग पायलटला कोणती समस्या भेडसावत होती? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

Leave a Comment

अधिक वाचा

नागपुरात एका NGO मध्ये हैराण करणारी घटना समोर आली आहे, ज्यात एका व्यक्तीने महिलेच्या कपाळावर किस करण्याचा प्रयत्न केला आणि तिला मिठी मारण्याचा प्रयत्न केला, ज्यामुळे पोलीस देखील चक्रावले आहेत!