“जा आणि मर” हे शब्द भांडणात वापरले तर कलम ३०६ अंतर्गत, आत्महत्येस प्रवृत्त करणे मानले जात नाही; केरळ उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय

SHARE:

केरळ – पती पत्नीच्या भांडणात पतीने जा आणि मर म्हणणे हे शब्द भांडणात वापरले तर कलम ३०६ अंतर्गत, हे शब्द आत्महत्येस प्रवृत्त करणे आहे असे मानले जात नाही, असे केरळ उच्च न्यायालयाने म्हटले आहे. भांडणाच्या वेळी पतीने “जा, मर“ म्हणणे गुन्हा आहे का? उच्च न्यायालयाने यासंदर्भात एक मोठा निर्णय दिला आहे.

केरळ राज्यातील वैवाहिक वाद आणि घरगुती संघर्षांबाबत, केरळ उच्च न्यायालयाने एक अतिशय महत्त्वाचा निर्णय देऊन ,कायदेशीर अर्थ लावला आहे. केरळ उच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे की, जर कोणत्याही पती-पत्नीमध्ये संघर्ष असेल तर मारामारीत पतीने “जा, मर“ म्हणणे गुन्हा नाही. हा उच्च न्यायालयाने मोठा निर्णय दिला आहे. केरळ उच्च न्यायालयाने म्हटले आहे की , रागाच्या भरात बोललेले कोणतेही शब्द कलम ३०६ अंतर्गत गुन्हा नाहीत.

केरळ राज्यातील एका प्रकरणात अवैध संबंधांवरून झालेल्या वादात पतीने “जा आणि मर“ म्हटले, पत्नीने तिच्या मुलीसह आत्महत्या केली. या प्रकरणात आत्महत्येस प्रवृत्त करण्यासाठी “गुन्हेगारी हेतू“ सिद्ध करणे आवश्यक आहे. केरळ उच्च न्यायालयाने, केरळ राज्यातील वैवाहिक वाद आणि घरगुती भांडणांबाबत एक अतिशय महत्त्वाचा कायदेशीर अर्थ लावला आहे. केरळ उच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे की, जर कोणत्याही पती-पत्नीमधील वादाच्या वेळी रागाच्या भरात “जा आणि मर“ सारखे शब्द वापरले गेले आहेत, तरी ते भारतीय दंड संहितेच्या कलम 306 अंतर्गत “आत्महत्येस प्रवृत्त करणे“ मानले जाऊ शकत नाही. केरळ उच्च न्यायालयाने यावर भर दिला की, हा गुन्हा सिद्ध करण्यासाठी, आरोपीचा प्रत्यक्षात पीडितेला आत्महत्या करण्यास भाग पाडण्याचा हेतू होता, हे सिद्ध करणे आवश्यक आहे.

केरळ राज्यात एका पतीपत्नीच्या वादाच्या प्रकरणात ही एक दुःखद घटना १५ सप्टेंबर २०२३ रोजी घडली होती. केरळ उच्च न्यायालयातील सरकारी वकिलांच्या म्हणण्यानुसार, एका महिलेला तिच्या पतीचे दुसऱ्या विवाहित महिलेशी अवैध संबंध आढळले होते. तिने विरोध केल्यावर दोघा पती पत्नीमध्ये मध्ये जोरदार वाद झाला होता. या वादात पतीने म्हटले की, तू “जा, येथून निघून जा आणि मर.“ त्या पतीपत्नीच्या वादानंतर लगेचच, त्या महिलेने तिच्या 5 वर्षांच्या मुलीसह विहिरीत उडी मारून आत्महत्या केली होती.

केरळ राज्यातील या घटनेनंतर, कासारगोडमधील मेलपरंबा पोलिसांनी पतीविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. केरळ उच्च न्यायालयाने आरोपीची निर्दोष मुक्तता याचिका फेटाळली होती, त्यानंतर त्या पतीने केरळ उच्च न्यायालयात धाव घेतली होती. या प्रकरणात केरळ उच्च न्यायालयाने तू “जा, येथून निघून जा आणि मर, असे शब्द कलम ३०६ अंतर्गत , कोणत्याही महिलेला आत्महत्येस प्रवृत्त केले आहे, असे मानले जाणार नाही, आणि हे शब्द बोलणे फक्त गून्हा असू शकत नाही, असे केरळ उच्च न्यायालयाने म्हटले आहे. याप्रकरणात आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याचा गुन्हा न्यायालयात सिध्द करणे गरजेचे आहे, असे केरळ उच्च न्यायालयाने म्हटले आहे.

Leave a Comment

अधिक वाचा