भाजपा सरकारच्या अर्थसंकल्पात वंचितांना कोणतीही मदत नाही आणि शेतकरी बांधवांकडे दुर्लक्ष करण्यात आले; काँग्रेस चे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे

SHARE:

नवी दिल्ली – देशातील भाजपा सरकारच्या अर्थसंकल्पात देशातील वंचितांना कोणतीही मदत दिली नाही आणि शेतकरी बांधवांकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे, असे काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे म्हणाले आहेत. 2026 च्या भाजपा सरकारच्या अर्थसंकल्पावर मल्लिकार्जुन खरगे यांनी टीका केली आहे. भाजपा सरकारच्या अर्थसंकल्पात गोरगरिब लोकांसाठी कोणतेही धोरण नाही, योग्य उपाय नाही आणि राजकीय इच्छाशक्तीचा अभाव दिसून येतो आहे. खरगे यांनी म्हटले आहे की, देशातील भाजपा सरकारकडे आता नवीन योजनांचा अभाव असल्याचे दिसून येते आहे.

काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी, केंद्रीय अर्थसंकल्पावरून देशातील भाजपा सरकारवर तीव्र शब्दांत टीका केली आहे. आणि म्हटले आहे की, धोरण, दृष्टी, उपाय आणि राजकीय इच्छाशक्तीचा अभाव आहे. त्यांनी असाही दावा केला की, भाजपा सरकारच्या सादर केलेल्या अर्थसंकल्पात देशातील गोरगरिब वंचितांना कोणतीही मदत देण्यात आली नाही, आणि देशातील शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे.

२०२६ च्या अर्थसंकल्पात भारताच्या आर्थिक, सामाजिक आणि राजकीय आव्हानांवर कोणताही उपाय दिला नाही. आता भाजपा सरकारकडे कोणतेही धोरणात्मक दृष्टीकोन नाही आणि राजकीय इच्छाशक्ती नाही, असे पाहायला मिळत आहे. देशातील अन्न पुरवठा करणारे शेतकरी अजूनही सरकारकडे कल्याणकारी मदत किंवा उत्पन्न सुरक्षा योजनांची वाट पाहत आहे. देशात असमानता, जातीयवाद, ब्रिटिश राजवटीपेक्षा जास्त वाढला आहे, तरीही सरकारच्या अर्थसंकल्पात त्याचा कोठेही उल्लेख केलेला नाही. देशातील अनुसूचित जाती, जमाती, इतर मागासवर्गीय, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक आणि अल्पसंख्याक समुदायांसाठी कोणतीही मदत केली नाही.

देशातील भाजपा सरकारने वित्त आयोगाच्या शिफारशींचा अधिक अभ्यास करण्याची आवश्यकता आहे. परंतु देशात आर्थिक दबावाचा सामना करत असलेल्या, राज्य सरकारांना भाजपा सरकारने कोणताही दिलासा दिला नाही. या अर्थसंकल्पात कोणत्याही ठोस उपाययोजना केल्या नाहीत. देशातील भाजपा सरकारने अर्थसंकल्पात देशातील गोरगरिब वंचित लोक आणि शेतकरी बांधव यांच्याकडे दुर्लक्ष केले आहे, असे काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी म्हटले आहे.

Leave a Comment

अधिक वाचा