भंडारा जिल्ह्यात शैक्षणिक कागदपत्रासाठी लाच घेताना सेतू केंद्र संचालकाला अटक; ११ हजारांची लाच घेतांना अटक करण्यात आली

SHARE:

भंडारा – जिल्ह्यात शैक्षणिक कागदपत्रासाठी लाच घेताना सेतू केंद्र संचालकाला अटक करण्यात आली आहे. सतीश मोटघरे असे सरकारी सेतू केंद्र चालकाचे नाव आहे. भंडाऱ्याच्या लाखनी येथील सिंधी लाईन चौकात असलेल्या नेहा सेतू केंद्रावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ही कडक कारवाई केली आहे. भंडारा जिल्ह्यातील गरीब कामगार बापाकडे मूलांच्या कागदपत्रासाठी हा सेतू संचालक पैशांची मागणी करत होता. ११ हजारांची लाच घेताना सेतू केंद्र संचालकास अटक केली आहे.

भंडारा जिल्ह्यामधील गरीब कामगाराच्या मुलाची शैक्षणिक कागदपत्र परत करण्यासाठी ११ हजार रुपयांची लाच मागणाऱ्या नेहा सेतू केंद्राच्या संचालकाला भंडारा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली आहे. शासकीय कामासाठी लागणारी मूळ कागदपत्रे जमा करून ठेवून पैशांची मागणी करणाऱ्या या सेतू केंद्र संचालकावर कडक कारवाई झाली आहे. राज्यातील महसूल प्रशासन आणि राज्यातील इतर सरकारी सेतू सुविधा केंद्रांच्या कार्यक्षमतेवरही या निमित्ताने प्रश्न उपस्थित झाला आहे. राज्यातील सरकारी सेतू सुविधा केंद्राकडून सातत्याने होणार्या फसवणूक आणि लुटीबाबत राज्यातील पालक आणि विद्यार्थ्यांमधून संतपा व्यक्त करण्यात आला आहे.

भंडारा जिल्ह्यातील सतीश मोटघरे असे सेतू केंद्र संचालकाचे नाव आहे. भंडाऱा जिल्ह्यातील लाखनी येथील सिंधी लाईन चौकात असलेल्या नेहा सेतू केंद्रावर एसीबीने ही कडक कारवाई केली आहे. तक्रारदार हे एक नोंदणीकृत बांधकाम गरीब कामगार आहेत. त्यांनी २०२१ मध्ये आपल्या मुलांच्या शिष्यवृत्तीसाठी भंडार्यातील या सरकारी सेतू केंद्रातून ऑनलाईन अर्ज भरला होता. त्यावेळी संचालक सतीश मोटघरे याने विद्यार्थ्यांची दहावीची मार्कलिस्ट, डोमिसाईल सर्टिफिकेट, शाळा सोडल्याचा दाखला आणि आधार कार्ड अशी महत्त्वाची मूळ कागदपत्र आपल्या ताब्यात घेतली होती.

गेल्या अनेक दिवसांपासून तक्रारदार आपली कागदपत्र परत मागण्यासाठी चकरा मारत होते, मात्र सरकारी सेतू संचालक सतीश मोटघरे काही ना काही कारण सांगून टाळाटाळ करत होता ३० जानेवारी २०२६ रोजी त्याने ही कागदपत्र परत करण्यासाठी भंडारा सहायक कामगार आयुक्त कार्यालयातील अधिकाऱ्यांच्या नावाखाली आणि स्वतःसाठी १२  हजार रुपये मागितले होते. तडजोडीनंतर तक्रारदाराकडून ११ हजार रुपयांची लाच घेताना सरकारी सेतू संचालक सतीश मोटघरे याला एसीबीच्या पथकाने अटक केली आहे. भंडारा जिल्ह्यातील या लाच प्रकरणामुळे राज्यातील शालेय शिक्षण व्यवस्था आणि कागदपत्रांची पूर्तता करणार्या, राज्यातील महसूल प्रशासनाच्या कारभारावरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

अनेकवेळा राज्यातील सर्वसामान्य पालकांना, विद्यार्थ्यांना जात प्रमाणपत्र, उत्पन्न प्रमाणपत्र आणि इतर सरकारी कागदपत्रांसाठी सरकारी सेतू संचालकांकडून अडवणूक केली जाते. जास्त पैशांची मागणी केली जाते. यामूळे राज्यातील गोरगरिब पालकांची व विद्यार्थ्यांची या सरकारी सेतू संचालकांकडून मोठ्या प्रमाणावर फसवणुक केली जाते. आणि अमाप पैसे घेतले जातात. त्यामुळे, राज्यातील अनेक जिल्ह्यातील सरकारी तहसीलदार, जिल्हाधिकारी यांनी सरकारी सेतू सुविधा केंद्र आणि सरकारच्या महसूल विभागावर यासंदर्भात कडक कारवाई करणे आवश्यक आहे. राज्यात सरकारी कागदपत्राच्या नावाखाली व सरकारी महसूल खाते व सरकारी सेतू सुविधा केंद्राकडून, सर्वसामान्य ना्रगरिक आणि गोरगरिबांच्या शाळेतील मूलांवर अन्याय केला जात आहे, याप्रकरणात राज्य सरकारने वेळीच लक्ष देणे गरजेचे आहे, असे भंडारा जिल्ह्यातील नागरिकांनी आणि मुलांच्या पालकांनी मागणी केली आहे.

Leave a Comment

अधिक वाचा