नवी दिल्ली – अमेरिकतील लैंगिक गुन्हेगार आणि मानवी तस्कर जेफ्री एपस्टाईच्या फायलींमध्ये प्रधानमंत्री नरेंद्र मोदींचे नाव आल्याने देशातील राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे. यामुळे देशभरात भाजप आणि प्रधानमंत्री मोदींना टीकेला समोर जावे लागत आहे. दरमयान आता कांग्रेस नेते पवन खेडा यांनी मोठा दावा केला आहे. भारत-अमेरिका दरम्यान व्यापार करार झाल्यानंतर एपस्टिन फाईलींमधून भारताशी संबंधित ६० फायली गायब झाल्या, असा खळबळजनक दावा पवन खेडा यांनी केला आहे.
काँग्रेसचे प्रवक्ते पवन खेरा यांनी सोमवारी दावा केला की अमेरिकेच्या न्याय विभागाच्या वेबसाइटवर प्रसिद्ध झालेल्या जेफ्री एपस्टाईनच्या कागदपत्रांच्या टप्प्यातील भारताचा संदर्भ असलेल्या किमान ६० फायली अमेरिका-भारत व्यापार करारावर स्वाक्षरी झाल्यापासून गायब झाल्या आहेत. यादरम्यान घडलेला एकमेव विकास म्हणजे एकतर्फी, अमेरिका समर्थक व्यापार करार. भारतविरोधी व्यापार करारामुळे निंदनीय साहित्य गायब होण्याची किंमत मोजावी लागली का? सरकारने भारताची वेगाने कोसळणारी प्रतिष्ठा वाचवण्यासाठी त्याच्या हितसंबंधांचा व्यापार केला का? असा सवाल खेडा यांनी समाज माध्यमांत उपस्थित केला.
खेडा म्हणाले की काँग्रेसकडे एपस्टाईन फाईलमध्ये भारताचे संदर्भ शोधण्यासाठी एक टीम होती. ६ फेब्रुवारी रोजी, अमेरिकन न्याय विभागाच्या वेबसाइटवर एपस्टाईन फाइल्समध्ये ‘भारत’ असा शोध घेण्यात आला तेव्हा ४८४ पानांचे निकाल मिळाले. प्रत्येक पानावर १० कागदपत्रे आहेत. टीम प्रत्येक पानातील फाइल्स चाळत होती आणि प्रत्येक पान क्रमांकावरून कागदपत्रे पद्धतशीरपणे कॅटलॉग करत होती.
आज, जर तुम्ही ही प्रक्रिया पुन्हा केली तर फक्त ४७८ पाने दिसतील. याचा अर्थ ६ पाने किंवा सुमारे ६० फायली गायब झाल्या आहेत. भारत सरकारने आपली घसरणारी प्रतिष्ठा वाचवण्यासाठी देशाच्या हितांशी तडजोड केली आहे का? भाजप, सहसा, अनावश्यकपणे मोठ्याने बोलतो, एपस्टाईनच्या खुलाशांवर मात्र गप्प आहे. शांततेच्या भिंतीमागे पक्ष काय लपवण्याचा प्रयत्न करत आहे?, असा सवाल खेडा यांनी उपस्थित केला.
पवन खेरा यांनी एक्स वर लिहिले कि ‘भारत’ या नावाच्या नोंदीनंतर, इंटरनॅशनल पीस इन्स्टिट्यूट आणि ‘जोशुआ फिंक’ यासी संबधित निकालही गायब होत आहेत. मनोरंजक गोष्ट म्हणजे, इंटरनॅशनल पीस इन्स्टिट्यूट ही तीच न्यूयॉर्क-आधारित थिंक टँक आहे जिथे हरदीप पुरी भारतीय सुरक्षा दलातून निवृत्त झाल्यानंतर आणि भाजपमध्ये सामील होण्यापूर्वी काम करत होते. त्यांना एपस्टाईनकडून निधी देखील मिळत होता. जोशुआ फिंक हा ब्लॅकरॉकचे प्रमुख लॅरी फिंक यांचा मुलगा आहे, ज्या कंपनीने अदानी समूहाच्या बाँड जारी करण्यात गुंतवणूक केली होती. खेरा यांनी लिहिले कि यामुळे अनेक चिंताजनक प्रश्न उपस्थित होतात. ते काय लपवण्यासाठी इतके हताश आहेत? मोदी आणि त्यांच्या चापलूसांना संरक्षण देण्यासाठी या व्यापार करारात भारत विकला गेला का? असा टोलाही खेडा यांनी लगावला.
माहित असावे कि जेफ्री एपस्टाईनशी संबंधित नवीन फायली प्रसिद्ध झाल्यानंतर त्यात प्रधानमंत्री नरेंद्र मोदींचे नाव आले आहे. अमेरिकन सिरीयल रेपिस्ट, बाल लैंगिक शोषण करणारा आणि मानवी तस्कर जेफ्री एपस्टाईन यांनी ९ जुलै २०१७ रोजीच्या ईमेलमध्ये लिहिले आहे कि भारतीय पंतप्रधान मोदींनी अमेरिकन राष्ट्राध्यक्षांच्या फायद्यासाठी इस्रायलमध्ये सल्ला घेतला. त्यांनी गाणी गायली आणि नाचले आणि ते यशस्वी झाले. मात्र, परराष्ट्र मंत्रालयाने तो दोषी ठरलेल्या गुन्हेगाराचे मूर्खपणा असल्याचे सांगत फेटाळून लावले.





