मुंबई – भगतसिंह कोश्यारी पहिले नीट धोतर नेसायला शिका आणि मग इथे महाराष्ट्रात येऊन आम्हाला अक्कल शिकवा, असे ठाकरे गटाचे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी माजी राज्यपाल भगतसिंग कोश्यारीवर टीका केली आहे. हा कोश्यारी नीट धोतर नेसता येत नाही आणि आम्हाला अक्कल शिकवतोय, असे संजय राऊत म्हणाले आहेत.
काही दिवसापूर्वी राज ठाकरे हे नरेंद्र मोदींना जास्तच घाबरले आहेत, अशी टीका महाराष्ट्राचे माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केली होती. त्यांना प्रत्यूत्तर देताना माजी राज्यपाल व भाजपाचा नेता असलेला हा भगतसिंह कोश्यारी एक नंबरचा लफंगा माणूस आहे, तर याला नीट धोतर नेसता येत नाही आणि मुंबईत येऊ आम्हाला अक्कल शिकवतो आहे, अशी टीका ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी केली आहे.
मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्यावर महाराष्ट्राचे माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी टीका केली होती. जी लोक कार्यक्रमाला आली ती सर्व लोक प्रधानमंत्री मोदीला घाबरली नसतील. पण, राज ठाकरे हे मोदींना जास्तच घाबरले आहेत, अशी टीका कोश्यारी यांनी केली होती. आता शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी यांनी भगतसिंह कोश्यारी यांच्यावर जोरदार टीका केली आहे.
संजय राऊत म्हणाले की, त्या भगतसिंग कोश्यारीला नीट धोतर नेसता येत नाही, तो काय आम्हाला अक्कल शिकवतोय. जो स्वतःचे धोतर नीट नेसू शकत नाही, तो ठाकरेंना सांगतो आहे की मोदींना घाबरू नका. मोदींना कोण घाबरते आहे? काल राहुल गांधींचे भाषण सुरू असताना प्रधानमंत्री मोदी आणि अमित शाह यांनी संसदेतून पलायन केले आणि हे आम्हाला सांगत आहेत.
तुमच्या हातात सत्ता आणि एजन्सी आहे म्हणून तुम्ही आम्हाला सांगत आहात. कोश्यारी पहिले नीट धोतर नेसायला शिका, आणि मग इथे महाराष्ट्रात येऊन आम्हाला अक्कल शिकवा. हा एक नंबरचा लफंगा माणूस आहे. त्याला पदमभूषण दिलेले आहे. छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले यांचा अपमान करणारा हा माणूस आहे, असे ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत म्हणाले आहेत. त्याला या भारतीय जनता पक्षाने पदमभूषण दिले आहे. त्या कोश्यारीला पदमभूषण देणाऱ्यांना ठाकरेंनी जोड्याने मारले असते, अशी टीका ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी, सत्ताधारी भाजपा सरकारवर केली आहे.




