देशभरात लाखो रेस्टॉरंटमध्ये करचोरीचा प्रकार उघडकीस; ७० हजार कोटीचा कर चोरी केल्याचा प्रकार उघड

SHARE:

नवी दिल्ली – देशभरात लाखो रेस्टॉरंटमध्ये करचोरीचा प्रकार उघडकीस आला आहे. देशभरात चाललेला हजारो कोटी रुपयांची करचोरीचा प्रकार आता समोर आला आहे. देशात ७० हजार कोटी रुपयांची करचोरीचे प्रकरण समोर आले आहे. डिजिटल युगात फसवणूक करणे आता सोपे राहिलेले नाही. कोणी कितीही हुशार असला तरी, सिस्टममध्ये असलेल्या डिजिटल मार्ग अखेर याचा शोध घेण्यास मदत करतो. अशाच प्रकारची करचोरीची एक घटना समोर आली आहे. ७० हजार कोटी रुपयांची करचोरीचे प्रकरण समोर आले आहे. बिर्याणीच्या एका बिलाने हे प्रकरण उघडे पडले आहे.

देशभरातील लाखो रेस्टॉरंटमध्ये हा करचोरीचा प्रकार केला जात होता. देशातील आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी हैदराबादमधील एका रेस्टॉरंटला नियमित तपासणीसाठी भेट दिली तेव्हा ही घटना उघडकीस आली आहे. देशभरात २०१९ पासून १  लाख ७७ हजार रेस्टॉरंटमधील बिलिंग डेटाच्या तपासणीत असे दिसून आले की, २७ टक्के विक्री लपवली जात होती. एकूणच ७० हजार कोटींची छुपी उलाढाल लपवण्यात आली होती, ज्यामुळे अब्जावधी डॉलर्सचे कर नुकसान होणार आहे. देशात कर्नाटकने सुमारे २००० कोटी रुपयांचे व्यवहार हटवले आहेत, तसेच तेलंगणाने सुमारे १ हजार ५०० कोटी रुपयांचे व्यवहार हटवले आहेत, तामिळनाडू, महाराष्ट्र आणि गुजरातमध्येही मोठ्या प्रमाणात करामध्ये अनियमतता झाली आहे.

आंध्र प्रदेश आणि तेलंगणामधील ३७३४ पॅनच्या तपासणीत ५००० कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीची लपवलेली विक्री उघड झाली आहे. फक्त ४० रेस्टॉरंटसच्या नमुन्यामध्ये ४०० कोटी रुपयांची अघोषित उलाढाल आढळून आली. काही ठिकाणी, सुमारे २५ टक्के विक्री दडपण्यात आली. यानंतर, केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने तपासाची व्याप्ती इतर राज्यांमध्ये वाढवली आहे. देशातील आयकर विभाग आता पुनर्निर्मित बिलांची कर विवरणपत्रे आणि बँक रेकॉर्डशी जुळणी करत आहे आणि लवकरच नोटिसा आणि दंड जारी केले जाऊ शकतात.

देशातील आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी हैदराबादमधील एका रेस्टॉरंटला नियमित तपासणीसाठी भेट दिली तेव्हा ही बाब उघडकीस आली. हा छापा नव्हता. काउंटरवर बिलिंग चालू होते आणि ग्राहक सामान्यपणे जेवत होते., अधिकार्यांच्या लक्षात आले की, रेस्टॉरंटमध्ये उपस्थित असलेल्या ग्राहकांची संख्या आणि बिलिंग सिस्टममध्ये नोंदवलेल्या बिलांची संख्या जुळत नाही. काही रोख बिल सिस्टममध्ये थोडक्यात दिसतील आणि नंतर गायब होतील. छापलेले सारांश बरोबर असल्याचे दिसून आले, परंतु सॉफ्टवेअर लॉगने वेगळीच गोष्ट सांगितली. हे स्पष्ट झाले की, ही साधी चूक नव्हती, तर एक सुनियोजित प्लॅन होता.

देशभरात बिलिंग सॉफ्टवेअरद्वारे एक मोठा घोटाळा उघडकीस आला आहे. सुरुवातीला, ही स्थानिक चूक मानली जात होती, परंतु तपासात असे दिसून आले आहे की, देशभरातील अनेक रेस्टॉरंट समान बिलिंग सॉफ्टवेअर वापरत होते. जेव्हा ही चौकशी सॉफ्टवेअर प्रोव्हायडरच्या अहमदाबादस्थित बॅकएंडपर्यंत पोहोचली तेव्हा, देशभरातील १ लाखाहून अधिक रेस्टॉरंटमधील ६० टेराबाइट डेटा उघड झाला आहे. हैदराबादमधील डिजिटल लॅबमधील तज्ञांनी हटवलेल्या बिलांचे पुन्हा एकत्रीकरण करण्यास सुरुवात केली. प्रत्येक व्यवहारामुळे सिस्टममध्ये एक डिजिटल ट्रेल राहिला, जो पूर्णपणे मिटवता आला नाही.

एआय टूल्स वापरून डिलीट केलेली बिले परत मिळवण्यात आली आहेत. तपासात असे दिसून आले की, देशभरातील अनेक रेस्टॉरंटनी ६ वर्षांत अंदाजे २.४३ लाख कोटींची बिले तयार केली आहेत. यापैकी १३ हजार कोटींपेक्षा जास्त किमतीची बिले रेकॉर्ड केल्यानंतर डिलीट करण्यात आली आहेत. देशीरातील काही रेस्टॉरंट दररोज काही रोख बिले डिलीट करत असतात, तर काहींनी देशभरात एकाच वेळी संपूर्ण ३० दिवसांसाठीची बिले डिलीट करत असतात, हा हेतू स्पष्ट झाला आहे.

देशभरातील अनेक रेस्टॉरंटनी विक्री कमी दाखवणे आणि कमी कर भरणे हेप्रकरण आता उघडकीस आले आहे. तपासात देशभरातील अनेक राज्यांमध्ये अनेक रेस्टॉरंटनी विक्री कमी दाखवल्याचा प्रकार उघड झाला आहे. त्यामूळे देशभरातील अनेक रेस्टॉरंटनी अनियमितता उघड झाली आहे, असे देशातील आयकर विभाग प्रशासनाने सांगितले आहे.

Leave a Comment

अधिक वाचा