नाशिकमध्ये २५ वर्षीय तरुणीची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना; तरुणीची ओडख अद्याप स्पष्ट नाही

SHARE:

नाशिक – २५ वर्षीय तरुणीची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली नाशिक जिल्ह्यात घडली आहे. नाशिकमधील वाडीवरे परिसरात सारुळच्या जंगल परिसरात एका तरुणीचा रक्ताच्या थारोळ्यात मृतदेह सापडला आहे. या घटनेने नाशिकमध्ये खळबळ उडाली आहे.

नाशिक-मुंबई महामार्गालगत असलेल्या वाडीवऱे पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका अंदाजे २५ वर्षीय तरुणीची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. वाडीवरेच्या सारूळ शिवारातील जंगल भागात तरुणीचा मृतदेह सापडल्याने वाडीवरे परिसरात भीतीचे आणि दहशतीचे वातावरण पसरले आहे.

माहितीनुसार, नाशिक-मुंबई महामार्गाजवळ सकाळी स्थानिक नागरिकांना एका तरुणीचा मृतदेह दिसून आला आहे. घटनेची माहिती मिळताच वाडीवऱे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहेत. २५ वर्ष वयोगटातील तरुणी मृतावस्थेत सापडली आहे. या घटनेत तरूणीवर धारदार शस्त्राने वार करून हत्या करण्यात आली आह असे नाशिक पोलिसांनी सांगितले आहे. नाशिक पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करताना मृतदेहाजवळ पिझ्झाचा बॉक्स तसेच काही खाद्यपदार्थ दिसून आले आहेत.

त्यामुळे ही तरुणी कोणासोबत येथे आली होती का? किंवा तिने येथे अन्न मागवले होते का? हे तपासले जात आहे. तरुणीच्या अंगावर काळ्या रंगाची कपडे असून अद्याप पोलिसांना तिची ओळख पटलेली नाही. त्या तरूणीबद्दल काहीच माहिती मिळाली नाही. नाशिकमध्ये ही तरूणीची हत्या घटनास्थळीच झाली आहे काय वा दुसर्या ठिकाणी हत्या करून पुरावा नष्ट करण्यासाठी हा तरूणीचा मृतदेह येथे आणून टाकला आहे. याचा नाशिक पोलीस शोध घेत आहेत.

नाशिकच्या वाडीवरे व सारूळ परिसरातील सीसीटीव्ही फुटेज, मोबाईल लोकेशन आणि तांत्रिक पुराव्यांच्या आधारे तपास केला जात आहे. नाशिक जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी घटनास्थळी भेट दिली आहे. या तरूणीच्या हत्येच्या तपासासंदर्भात पोलिस अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत. या प्रकरणाचा तपास करण्यासाठी नाशिक ग्रामीण पोलिसांकडून पथके तयार करण्यात आली आहेत.

घटनास्थळावर सापडलेल्या वस्तूंच्या आधारे आरोपींचा शोध सुरू असल्याचे नाशिक ग्रामीण पोलिस अधिक्षकांनी सांगितले आहे. या हत्या प्रकरणात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. या 25 वर्षीय तरूणीच्या हत्याकांडामुळे संपूर्णनाशिक जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. या प्रकरणातील आरोपींना लवकर अटक करण्याची मागणी नाशिक मधील वाडीवरे व सारूळ परिसरातील स्थानिक नागरिकांनी केली आहे. याप्रकरणात अधिक तपास नाशिक ग्रामीण पोलिस करत आहेत.

Leave a Comment

अधिक वाचा