वर्धा – पुलगाव मधे महिला दिनादिवशी ज्येष्ठ राजकीय नेत्याकडून अल्पवयीन मूलीवर अत्याचार केल्याचा प्रकार घडला आहे. वर्ध्यात राजकीय नेत्याकडून अल्पवयीन मुलीचं लैंगिक शोषण झाल्याचा प्रकार समोर आला आहे. हा राजकीय कार्यकर्ता अजितदादा गटाच्या नेत्याचा जवळचा आहे. या प्रकरणात वर्धा जिल्ह्यातील पुलगाव पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या राजकीय नेत्यांवर पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा राजकीय नेता २०२२ पासून शरीर सुखाची मागणी करत होता, अशी धक्कादायक घटना वर्धा जिल्ह्यातून समोर आली आहे.
काल जागतिक महिला दिनाच्या दिवशी समाजाला हादरवून टाकणारी ही घटना उघडकीस आली आहे. वर्ध्यात एका राजकीय पक्षाशी संबंधित एका ज्येष्ठ नेत्यावर अल्पवयीन मुलीचे दीर्घकाळ पासून लैंगिक सुखाची मागणी केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. माहितीनुसार, दिवाकर गमे वय 78 असे या आरोपीचे नाव आहे. वर्धा जिल्ह्यातील पुलगाव पोलिसांकडून दिवाकर गमे या आरोपीला अटक करण्यात आली आहे. पीडित तरुणीच्या तक्रारीवरून वर्धा जिल्ह्यातील पुलगाव पोलिस ठाण्यात पॉक्सो कायद्याअंतर्गत आणि इतर गंभीर कलमान्वये गुन्हा आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
माहितीनुसार, पीडित मुलगी २०२२ मध्ये १७ वर्षांची असताना आरोपी दिवाकर गमे याने नोकरीचे आमिष दाखवून आपल्या जाळ्यात ओढले होते. गेल्या ५ वर्षांपासून तिला आरोपीने लैंगिक शोषणाची मागणी केल्याचा आरोप करण्यात आला आहे. आरोपीचे पीडित मुलीच्या कुटुंबाशी जवळचे संबंध असल्याची माहिती मिळाली आहे. तसेच ३ दिवसांपूर्वी आरोपीने पीडितेला अश्लील फोटो आणि व्हिडिओ पाठवून पुन्हा तिचा लैंगिक छळ केल्याचा आरोप मुलीकडून करण्यात आला आहे. यामुळे पीडित मुलीकडून वर्धा पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे.
तक्रार मिळताच वर्धा पोलिसांनी आरोपी दिवाकर गमे याला अटक केली आहे.पोलिसांनी आरोपीचा मोबाईलही जप्त केला आहे. त्यातून आणखी धक्कादायक पुरावे समोर येण्याची शक्यता आहे. दिवाकर गमे हा महाज्योती या संस्थेत काही वर्षांपूर्वी संचालक म्हणून कार्यरत होता. आरोपी हा राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाच्या नेत्याचा निकटवर्तीय असल्याची माहिती मिळाली आहे. या प्रकरणामुळे वर्धा जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास वर्धा जिल्हा उपविभागीय पोलीस अधिकारी करत आहे.



