विशेष – दि.१७ जून २०२६ रोजी असलेल्या ‘राजमाता माँसाहेब जिजाऊ’ यांच्या ३५२ व्या स्मृतिदिनानिमित्त अभंगकार प्रा.अरुण बाबारावजी बुंदेले यांचा अभंग येथे वाचकांसाठी प्रकाशित करीत आहोत .
– अभंग –
राजमाता जिजाऊ
जिजाऊ मातेचे ।
संस्कार जीवन ।।
शिवबा पावन ।
घडविले ।।१।।
मायाळू ममत्व ।
कणखर तन ।।
मृदू मऊ मन ।
राजमाता ।।२।।
संपविले भेद ।
समतेचे राज ।।
बंधुतेचा साज ।
चढवून ।।३।।
स्वराज्य रक्षण ।
नीती अधिष्ठान ।।
खरे प्रतिष्ठान ।
माँसाहेब ।।४।।
जिजाऊ मातेला ।
करितो नमन ।।
करांनी वंदन ।
स्मृतिदिनी ।। ५ ।।
लेखक –
प्रा.अरुण बाबारावजी बुंदेले
राज्यस्तरीय संत कबीर
कवीराज पुरस्कार प्राप्त
अभंगकार, अमरावती.
संपर्क – ८०८७७४८६०९
Author: प्रा. अरुण बाबारावजी बुंदेले
लेखक एक उत्कृष्ट शिक्षक, प्राध्यापक, विद्यार्थी मार्गदर्शक, साहित्यिक, कवी, अभंगकार, समाजप्रबोधनकर्ते असून अमरावती शहरातील प्रतिष्ठित नागरिक आहेत. सामाजिक, शैक्षणिक, साहित्यिक विषयावरील बारा पुस्तकांचे लेखक असून बावीस पुरस्कारांचे मानकरी आहेत.






