पालघर – राज्यात गॅस पुरवठा विस्कळीत झाल्याने पालघर जिल्ह्यातील हॉटेल व्यावसायिकांसमोर मोठे संकट उभे राहीले आहे. पालघर जिल्ह्यातील अनेक हॉटेल्स बंद होणार आहेत. गॅस पुरवठा विस्कळीत झाल्याने व्यावसायिकांना मोठा फटका बसला आहे. अनेक हॉटेल व्यावसायिकांसमोर मोठे संकट उभे राहिले आहे. व्यावसायिक एलपीजी गॅसच्या तीव्र टंचाईमुळे शेकडो हॉटेल्स बंद होण्याची शक्यता व्यक्त केली आहे. अमेरिका, इस्त्राईल व इराण यांच्यामधील युद्धाचा परिणाम आता भारतात जाणवू लागला आहे.
सर्वसामान्य नागरिकांच्या जीवनावर त्याचा परिणाम होत आहे. गॅस वितरण प्रणालीला त्याचा मोठा फटका बसत आहे. यामुळे पालघर जिल्ह्यातील हॉटेल व्यावसायिकांसमोर मोठे संकट उभे आहे. व्यावसायिक एलपीजी गॅसच्या तीव्र टंचाईमुळे शेकडो हॉटेल्स बंद होण्याची शक्यता व्यक्त केली आहे. वसई तालुका हॉटेल असोसिएशनने प्रशासनाचे या गंभीर समस्येकडे लक्ष द्यावे अशी मागणी केली आहे. वसई-विरार पट्टयात गेल्या काही दिवसांपासून व्यावसायिक एलपीजी सिलिंडरचा मोठ्या प्रमाणावर तुटवडा निर्माण झाला आहे.
गॅस पुरवठा विस्कळीत झाल्यामुळे हॉटेल्स, रेस्टॉरंटस आणि खानावळींच्या कामकाजावर गंभीर परिणाम होत आहे. या संदर्भात हॉटेल व्यावसायिकांनी वारंवार पाठपुरावा करूनही परिस्थितीत सुधारणा झालेली नाही. नुकतीच या प्रश्नावर पालघर जिल्हाधिकाऱ्यांसोबत बैठक देखील पार पडली आहे. मात्र अद्याप कोणताही ठोस तोडगा निघालेला नाही. अनेकांनी शेगड्यांवर अन्न शिजवणे सुरू केले असले तरी तेही मर्यादित असून गॅसचा पुरवठा सुरळीत झाला नाही, तर वसई-विरारमधील शेकडो हॉटेल्स आणि खानावळींना आपले कामकाज अनिश्चित काळासाठी बंद ठेवावे लागण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
हॉटेल व्यवसाय हा या भागातील मोठ्या प्रमाणावर रोजगार देणारा उद्योग असून, हॉटेल्स बंद झाल्यास हजारो कामगार, आचारी तसेच होम डिलिव्हरी करणाऱ्या युवकांच्या उपजीविकेवर मोठे संकट येऊ शकते. त्याचबरोबर रोजच्या जेवणासाठी हॉटेल्सवर अवलंबून असलेल्या नागरिकांनाही मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागेल.
परिस्थिती आता हाताबाहेर जात आहे. अनेक हॉटेल्समध्ये गॅसचा साठा संपत आला आहे. इंधनाशिवाय आम्ही व्यवसाय करू शकत नाही. प्रशासनाने आणि गॅस एजन्सींनी या प्रश्नाकडे आपत्कालीन स्थिती म्हणून लक्ष देऊन उपाययोजना कराव्यात. वसई तालुका हॉटेल असोसिएशनने राज्यातील प्रशासनाकडे व्यावसायिक गॅसचा पुरवठा सुरळीत करण्याची मागणी केली आहे.





