नाशिक जिल्ह्यात २५ लाखांच्या खंडणीसाठी व्यापाऱ्याचे अपहरण, ३ जणांविरोधात गुन्हा दाखल

SHARE:

नाशिक – जिल्ह्यात २५ लाखांच्या खंडणीसाठी व्यापार्याचे अपहरण करण्यात आले होते, त्यानंतर व्यापार्याचा मृत्यू झाला आहे, या प्रकरणात ३ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नाशिकमध्ये पोलीस असल्याचे सांगत व्यापाऱ्याचे अपहरण केले होते, व २५ लाखांची मागितली खंडणी मागण्यात आली होती. परंतु यादरम्यान व्यापाऱ्याचा मृत्यू झाला आहे. नाशिकमध्ये ही खळबळजनक घटना घडली आहे. नाशिक जिल्ह्यातील देवळा तालुक्यातील व्यापाऱ्याचे पोलीस असल्याचे सांगत अपहरण करून छळ केल्यामुळे मृत्यू झाला आहे.

या प्रकरणी पोलिसांनी तिघाविरोधात गुन्हा दाखल करून अटक केली आहे. मृत्यू झालेल्या व्यापाऱ्याचे नाव जब्बार तांबोळी असे आहे. आरोपींनी अपहरण आणि खंडणीसाठी कट आखला होता. माहितीनुसार, जब्बार तांबोळी हे पिकअप वाहनातून गुजरातमधून गुटखा भरून अभोणामार्गे देवळ्याकडे येत होते. देवळा-कळवण रस्त्यावर, भऊर फाटा परिसरात, काळ्या रंगाच्या स्कॉर्पिओ वाहनातून आलेल्या ३ जणांनी त्यांना अडवले आणि पोलिस महानिरीक्षकांचे पथक असल्याचे सांगून २५ लाख रुपयांची खंडणी मागितली.

खंडणीसाठी व्यापाऱ्याचा मुलगा आणि काही ग्रामस्थ ठेंगोडा परिसरातील नर्सरीजजवळ पैसे घेऊन पोहोचले. तडजोडीने ११ लाख रुपये खंडणी देण्याचे ठरले होते. खंडणी देण्याच्या वेळी जब्बार तांबोळी आणि संशयितांमध्ये वाद झाला. त्यावेळी जब्बार यांच्या छातीत अचानक दुखू लागले आणि ते बेशुध्द पडले.

बेशुध्द अवस्थेत असलेल्या जब्बार तांबोळी यांना तत्काळ दवाखान्यात नेण्यात आले, परंतु डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या प्रकरणात देवळा पोलिसांनी विलास जगताप, मोहम्मद शफीक मोहम्मद रफीक आणि महेश भामरे या तीन जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी त्यांना अटक केले आहे. या प्रकरणात अधिक तपास देवळा पोलिस करत आहेत.

Leave a Comment

अधिक वाचा