खटारा स्कूल बसने घेतला एका निष्पाप मुलीचा जीव, शालेय वाहनांच्या सुरक्षिततेवर प्रश्न उपस्थित

SHARE:

उत्तर प्रदेश – आग्रा येथून एक निष्काळजीपणाची घटना समोर आली आहे, ज्यामुळे प्रत्येक पालकाला धक्का बसला आहे. चालत्या खटारा स्कूल व्हॅनमधील सीट तुटल्यामुळे एका निष्पाप मुलीचा तोल गेला आणि ती खाली पडली, ज्यामुळे तिचा मृत्यू झाला. नैना असे या मुलीचे नाव आहे. ही घटना एत्मादपूरच्या नगला काले परिसरात घडली. या घटनेमुळे शालेय वाहनांच्या सुरक्षिततेवर आणि प्रशासकीय देखरेखीवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.

वृत्तानुसार, नैना स्कूल बसमधून प्रवास करत होती. बसची अवस्था इतकी वाईट होती की ती बसलेली सीट अचानक तुटली. तुटलेल्या सीटमुळे नैना थेट रस्त्यावर पडली आणि बसच्या चाकांनी तिला चिरडले. बसमधील इतर मुल ओरडताच चालकाने बस थांबवली. तिला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले, जिथे डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.

मुलीच्या मृत्यूची बातमी मिळताच कुटुंब हताश झाले आणि तिचे पालक अस्वस्थ झाले आहेत. या घटनेपासून, शाळा व्यवस्थापनावर कठोर कारवाईची मागणी करण्यात आली आहे. स्थानिक रहिवासी देखिल प्रशासन आणि शाळा व्यवस्थापनावर तीव्र संताप व्यक्त करत आहेत. जीर्ण बस रस्त्यावर आणून निष्पाप मुलांचे जीव धोक्यात घालण्याच्या निर्णयावर आता गंभीर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. दरम्यान, पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे. बसचा फिटनेस रिपोर्टही तपासला जात आहे.

गेल्या आठवड्यात, अलिगड-कासगंज रस्त्यावर असाच एक भयानक अपघात झाला, जिथे एका जीर्ण स्कूल बसने युकेजीच्या एका विद्यार्थिनीचा मृत्यू झाला. धोलना परिसरात शाळेतून घरी परतत असताना, चालत्या बसच्या टायरच्या वरील भाग अचानक तुटला ज्यामुळे ५ वर्षीय अनन्या थेट मागच्या चाकावर पडली. यात तिचा मृत्यू झाला. अपघाताच्या वेळी, बसमध्ये क्षमतेपेक्षा अधिक मुलं होते. तसेच स्कूल बस पूर्णपणे फिट नव्हती.

Leave a Comment

अधिक वाचा