आखातातील युद्धाचा परिणाम भारतातील बाटलीबंद पाण्याच्या उद्योगावर होणार; आता बाटलीबंद पाणी महागण्याची शक्यता

SHARE:

मुंबई – आखातातील युद्धाचा परिणाम आता भारतातील बाटलीबंद पाण्याच्या उद्योगावर होणार आहे, तर आता बाटलीबंद पाणी ही महागणार आहे. इराण युद्धामुळे आता बाटलीबंद पाणी महागणार आहे. वेस्ट आशियात सुरू असलेल्या इराण युद्धाचा परिणाम आता भारतातील बाटलीबंद पाण्याच्या उद्योगावरही दिसू लागला आहे. पॅकेजिंग साहित्याच्या वाढत्या किंमतींमुळे कंपन्या उन्हाळ्याच्या तोंडावर पाण्याच्या बाटल्यांचे दर वाढणार आहेत. ५ अब्ज डॉलर्सच्या भारतीय पॅकेज्ड वॉटर मार्केटमध्ये उत्पादन खर्च वाढल्यामुळे कंपन्या दर वाढवणार आहेत.

भारत देशात उन्हाळा सुरू होण्याच्या आधीच पाणी बॉटल महागणार आहे, असे ऑल इंडिया पॅकेज्ड ड्रिंकिंग वॉटर मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनने म्हटले आहे. युद्धामुळे प्लास्टिकच्या बाटल्या, झाकण, लेबल आणि कार्डबोर्ड बॉक्स यांसारख्या पॅकेजिंग साहित्याच्या किंमतींमध्ये मोठी वाढ झाली आहे. याचा परिणाम भारत देशातील बाटलीबंद पाणी तयार करणार्या कंपन्यांच्या खर्चावर होणार आहे. ऑल इंडिया पॅकेज्ड ड्रिंकिंग वॉटर मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनच्या माहितीनुसार सुमारे २,००० लहान उत्पादकांनी त्यांच्या वितरकांसाठी प्रति बाटली 5 टक्केने दरवाढ केली आहे.

भारताच्या उद्योग क्षेत्रातील माहितीनूसार येत्या काही दिवसांत किंमतींमध्ये १०  टक्के पर्यंत आणखी वाढ होणार आहे. किरकोळ बाजारात मात्र मोठा बदल दिसत नाही, कारण मोठ्या कंपन्या वाढलेल्या खर्चाचा काही भाग स्वतःच उचलत आहेत. साधारणपणे भारतात १  लिटर बाटलीबंद पाण्याची किंमत २० रुपयांपेक्षा कमी असते. उद्योगातील प्रतिनिधींच्या मते कच्च्या तेलाच्या वाढत्या किंमतीमुळे पॉलिमरचे दर वाढले आहेत, जे प्लास्टिक बाटल्या बनवण्यासाठी मुख्य कच्चा माल आहे.

भारत देशात प्लास्टिक बाटल्या तयार करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या साहित्याची किंमत जवळपास ५० टक्के वाढून १७० रुपये प्रति किलोपर्यंत पोहोचली आहे. तर बाटल्यांच्या झाकणांची किंमतही दुप्पटपेक्षा जास्त वाढून ०.४५ प्रति तुकडा झाली आहे. याशिवाय कारुगेटेड बॉक्स, लेबल आणि चिकट टेप यांच्या किंमतींमध्येही वेगाने वाढ झाली आहे. त्यामुळे भारत देशातील उत्पादन खर्च आणखी वाढत आहे. भारतासारख्या देशात जिथे सुमारे ७० टक्के भूजल प्रदूषित असल्याचे सांगितले जाते, तिथे स्वच्छ पाण्याची मिळणे हेच मोठे आव्हान आहे.

त्यामुळे भारत देशात बाटलीबंद पाण्याचा वापर वाढत आहे. बाटलीबंद पाण्याच्या बाजारात नैसर्गिक मिनरल वॉटरचा विभागही वाढला आहे. भारतात हा व्यवसाय सुमारे ४०० दशलक्ष डॉलर्सपर्यंत पोहोचला आहे. गेल्या वर्षी प्रीमियम पाण्याचा हिस्सा एकूण बाजारात ८  टक्के होता, तर २०२१ मध्ये तो फक्त १  टक्के होता. आता भारतात ही पिण्याचे पाणी महाग होणार आहे, असे ऑल इंडिया पॅकेज्ड ड्रिंकिंग वॉटर मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनने म्हटले आहे.

Leave a Comment

अधिक वाचा