महसूल विभागातील प्रांताधिकाऱ्यासह लिपिकाला दोन लाखांची लाच घेताना अटक; लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून मोठी कडक कारवाई

SHARE:

पुणे – जिल्ह्यात महसूल विभागातील प्रांताधिकाऱ्यासह लिपिकाला दोन लाखांची लाच घेताना अटक करण्यात आली आहे. पुणे जिल्ह्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून महसूल विभागातील बड्या अधिकाऱ्यासह लिपिकावर मोठी कडक कारवाई करण्यात आलली आहे. २  लाखांची लाच घेताना अधिकाऱ्यासह लिपिकाला पकडले आहे. उत्तर पुणे जिल्ह्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने महसूल विभागातील बड्या अधिकाऱ्यावर ही कडक कारवाई केली आहे.

जुन्नर-आंबेगावचे उपविभागीय अधिकारी यांच्यावर ही कारवाई झाली आहे. जुन्नर आंबेगावचे प्रांताधिकारी गोविंद शिंदे यांच्यासह लिपिक यांना ५० हजार रुपयांची लाच प्रकरणात मंचर येथील प्रांताधिकारी कार्यालयात कडक कारवाई करण्यात आली आहे. प्रांताधिकारी गोविंद शिंदे यांच्यासह लिपिकाला लाचलुचपत विभागाने अटक केले आहे. मंचर पोलीसांत कारवाईची प्रक्रिया सुरु आहे.

आंबेगाव-जुन्नरचे प्रांत कार्यालय असणार्या मंचर येथे प्रांताधिकारी गोविंद शिंदे आणि लिपिक राहुल खैरनार यांनी २  लाख रुपयांची लाच स्वीकारल्याप्रकरणात लाचलुचपत विभागाने शुक्रवारी २७ मार्च २०२६  रोजी पकडले आहे. मंचर प्रांताधिकारी कार्यालयात ही कडक कारवाई करण्यात आली आहे. या प्रकरणात नारायणगाव येथील एका बिल्डरने लाचलुचपत विभागाकडे तक्रार केली होती. त्यानुसार प्रांताधिकारी गोविंद शिंदे आणि लिपिक राहुल खैरनार यांना अटक करण्यात आली आहे.

इमारतीच्या बांधकाम पूर्णत्व दाखल्यासाठी तक्रारदाराने प्रांताधिकारी कार्यालयात अर्ज केला होता. यासाठी जुन्नर-आंबेगावचे उपविभागीय प्रांताधिकारी गोविंद शिंदे शिंदे यांनी २  लाखांची लाच मागितली होती. तक्रारीची पडताळणी केल्यानंतर शुक्रवारी मंचर येथील प्रांत कार्यालयात सापळा रचला होता. तक्रारदाराकडून पन्नास हजाराची रक्कम स्वीकारताना दोघांना अटक केले आहे.

Leave a Comment

अधिक वाचा