भोंदू अशोक खरातने घेतलेली नावे व त्याच्याशी संबंधित राजकीय लोकांची माहिती पोलिसांनी आणि एसआयटीने जाहीर करावी; ठाकरेगट शिवसेना खासदार संजय राऊत यांची मागणी

SHARE:

मुंबई – भोंदू अशोक खरातने घेतलेली नावे व त्याच्याशी संबंधित राजकीय लोकांची व इतर लोकांची माहिती पोलिसांनी आणि एसआयटीने जाहीर करावी, अशी मागणी ठाकरेगट शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केली आहे. भोंदू अशोक खरातच्या प्रकरणाते कोण कोण सामील आहेत हे समोर आणा असे संजय राऊत म्हणाले आहेत. राज्याच्या महिला आणि बालकल्याण मंत्री, त्यांचे वडील हे भोंदू अशोक खरातचे भक्त होते. महिलांचे शोषण होत असताना आता त्यांनी यावर बोलायला हवे अशी मागणी खासदार संजय राऊत यांनी केली आहे.

राज्यात भोंदू अशोक खरात प्रकरणावरून राजकीय वातावरण तापले आहे. शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी राज्यातील भाजपा सरकारवर जोरदार टीका केली आहे. या भोंदू अशोक खरात प्रकरणात राज्यातील मोठ्या राजकीय लोकांचा सहभाग असल्याचा दावा केला आहे. भोंदू अशोक खरातने घेतलेली नावे आणि त्याच्याशी संबंधित सर्व राजकीय लोकांची व इतर लोकांची माहिती पोलिसांनी आणि एसआयटीने जाहीर करावी, अशी मागणी ठाकरेगटाचे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केली आहे.

शिवसेना खासदार संजय राऊत म्हणाले आहेत की, या प्रकरणात कोणीही लपून राहिलेले नाही. भोंदू अशोक खरातच्या प्रकरणामध्ये कोण कोण मोठ्या व्यक्ती आहेत, हे समोर यायला हवे. राज्याच्या महिला आणि बालकल्याण मंत्री आणि त्यांचे वडील या भोंदू अशोक खरातचे भक्त आहेत. राज्यात आता महिलांवर अत्याचार झाल्याचे समोर आल्यानंतर त्यावर या मंत्र्यांनी यावर बोलणे गरजेचे आहे. मात्र राज्यातील या भोंदू अशोक खरात प्रकरणात आता राष्ट्रपतींनी लक्ष द्यायची गरज भासत आहे.

कारण राष्ट्रपतीही एक महिला आहेत. राज्यात महिलांवर अत्याचार होत असताना राष्ट्रपतींनी राज्याच्या राज्यपालांना कडक कारवाईचे आदेश द्यावेत अशी मागणी शिवसेना संजय राऊत यांनी केली आहे. महाराष्ट्र राज्यासारख्या राज्यात एवढे मोठे प्रकरण घडले आहे. तरीही राज्यातील भाजपा सरकार माहिती लपवुन ठेवत असल्याचा आरोप ठाकरेगटाचे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केला आहे. भोंदू अशोक खरात प्रकरणात ही मोठे राजकारणी, आयएएस, आयपीएस अधिकारी आणि उद्योगपतींची नावे आहेत.

त्यामुळे त्याचाही एपस्टीनसारखा घातपात होण्याची शक्यता आहे. खासदार संजय राऊत म्हणाले आहेत की, मला असे वाटते की, नाशिकचे पोलीस आयुक्त यांनी सुरूवातीपासून या प्रकरणात तपासाची जी दिशा पकडली आहे, ती योग्य आहे. परंतु भोंदूबाबा अशोक खरातवर तुरुंगात त्याच्यावरती हल्ला होणे किंवा मारणे हे राज्यातील सरकारला परवडणार नाही. भोंदू अशोक खरातची सुरक्षा ही तुरुंग प्रशासनाची व राज्यसरकारची जबाबदारी आहे, असे ठाकरेगटाचे शिवसेना खासदार संजय राऊत म्हणाले आहेत.

Leave a Comment

अधिक वाचा