यवतमाळ – सावळी सदोबा सर्कलमधील चिमटा खडका इथं होत असलेला निम्न पैनगंगा धरण प्रकल्प विदर्भ तथा मराठवाडा मधील ९५ गावे तथा १५०,००० लोकसंख्याबाधित क्षेत्रातील बेकायदेशीर धरण रद्द झाले पाहिजे यासाठी राष्ट्रीय किसान मोर्चाच्या माध्यमातून शुक्रवार, दिनांक:१० एप्रिल २०२६ रोजी सकाळी ११.३० सकाळपासून ते सायंकाळी जवळपास ५ वाजेपर्यंत आर्णी तहसील कार्यालयावर निम्न पैनगंगा धरण प्रकल्प विरोधात सभा घेण्यात आली. परंतु कुठल्याही प्रकारचे शासन-प्रशासनाकडून लिखित आश्वासन न दिल्यामुळे राष्ट्रीय किसान मोर्चाचे आर्णी येथील दत्त रामपूर येथे नागपूर तुळजापूर हायवे वरती सायंकाळी दरम्यान चक्काजाम आंदोलन करण्यात आले.
वाहतुकीचा प्रश्न निर्माण झाला असता तहसीलदार तथा आर्णी ठाणेदार यांच्या आदेशावरून राष्ट्रीय किसान मोर्चा, भारत मुक्ती मोर्चा, बहुजन मुक्ती पार्टी यांच्या कार्यकर्त्यांना जोर जबरदस्ती पणे आरेराविणे असंविधानिक पद्धतीने आदेश देऊन अटक करण्यात आले होते व आर्णी पोलीस स्टेशनला नेण्यात आले तिथे त्यांना रात्री ९.३० वाजेपर्यंत ठेवण्यात आले असून संबंधित कार्यकर्त्यावरती गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात आले. अशी माहिती राष्ट्रीय किसान मोर्चा च्या पदाधिकाऱ्यांनी माहिती दिली.

दीपक इंगळे पाटील प्रदेशाध्यक्ष राष्ट्रीय किसान मोर्चा यांनी म्हटले की, आर्णी येथे निम्न पैनगंगा धरण प्रकल्पाविरोधात झालेल्या चक्का जाम आंदोलनासाठी आम्हाला जिल्हाधिकारी यवतमाळ यांनीच भाग पाडले. कारण आम्ही यापूर्वी तीन महिन्या आधी दिलेल्या निवेदनाला त्यांनी कोणतेही लेखी स्वरूपाचे उत्तर दिले नाही. त्यामुळे न्याय मिळवण्यासाठी आम्हाला रस्त्यावर उतरून चक्का जाम आंदोलन करावे लागले.
या आंदोलनानंतर आमच्यावर गुन्हे नोंद करण्यात आले. मात्र या परिस्थितीस जबाबदार असलेल्या जिल्हाधिकारी यवतमाळ यांच्यावरही गुन्हे नोंद करण्यात यावेत, या मागणीसाठी आम्ही अधिकृत तक्रार दिली आहे.
राष्ट्रीय किसान मोर्चा हा कायद्याच्या चौकटीत राहून संघर्ष करणारा संघटन आहे. अन्याय करणारा कोणीही असो तो अधिकारी असो किंवा सत्ता आम्ही सत्य आणि न्यायासाठी लढत राहणार. आमचा स्पष्ट इशारा आहे. निम्न पैनगंगा प्रकल्प रद्द केल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही! शेतकरी, शेतमजूर, महिला, तरुण आणि बुडीत क्षेत्रातील सर्व जनतेच्या हक्कासाठी हा संघर्ष अखेरपर्यंत सुरूच राहणार. आमच हे आंदोलन चमकुगिरी साठी नसून फोटो सेशन करण्यासाठी नसून शेतकऱ्यांच्या तथा कामगार वर्गाच्या हक्क अधिकारासाठी आहे असे त्यांनी म्हटले.

बालाजी कांबळे यांनी असे म्हटले की हे धरण काँग्रेसने आणले असून ते भारतीय जनता पार्टी ते धरणाचं काम पूर्ण करत आहे निम्न पैनगंगा प्रकल्प धरण विरोधी संघर्ष समिती हे केवळ २५ ते ३० वर्षापासून समाजाला गुमराह करण्याचे काम समिति करत आहे कारण ज्यांनी धरण आणले त्या काँग्रेसचे विरोधात बोलायचे नाही भारतीय जनता पार्टी सरकार जे धरणाचं काम करत आहे त्यांच्या विरोधात बोलायचे नाही मग ही लढाई कोणासोबत लढायची अशी त्यांनी म्हटले या कार्यक्रमाला कॉन्टर करण्यासाठी बीजेपीच्या आमदाराचा सावळी सदोबा येथे समाधान शिबिर लावण्यात आले अशी सुद्धा माहिती त्यांनी दिली. धरणाचा SI रिपोर्ट नाही,DPR रिपोर्ट नाही धरण बाधित क्षेत्रातील 95 गावाचे कुठल्या प्रकारचे पुनर्वसन न केल्या असल्यामुळे केवळ हुकूमशाहीपणे, जोरजबरदस्ती, बेकायदेशीरपणे धरणाच्या कामाला सुरुवात केली. आम्ही त्यांच्या हक्क अधिकारासाठी जर हे आंदोलन करत असेल रस्त्यावर उतरत असेल या दरम्यान शासन प्रशासन आमच्यावर गुन्हे दाखल करत असेल तर आम्ही सुद्धा जिल्हाधिकाऱ्यावरती तथा संबंधित कारवाई करणाऱ्या संबंधित अधिकाऱ्या वरती आम्ही सुद्धा FIR दाखल करू असे त्यांनी म्हटले.
या आंदोलनाचे नेतृत्व दीपक इंगळे, पाटील, बालाजी कांबळे, यांनी केले या आंदोलनात इंजि, प्रशांत मुनेश्वर,विनोद मुदाने,बहुजन मुक्ती पार्टी ,भुवन भुवनेश्वर,चक्रधर देवसरकर,गणपत गव्हाळे,गजानन गोडवे लहुजी क्रांती मोर्चा,प्रमोद जाधव,सुनील गवई,भारत मुक्ती मोर्चा, रवींद्र काळे, इंजि.विद्वान केवटे,बळवंत खडसे,देवराव साठे,सुखदेव पंचभाई,सुमेध मुनेश्वर इत्यादी कार्यकर्त्यांनी आंदोलन यशस्वी केल या आंदोलनात मराठवाडा आणि विदर्भ मधील मोठ्या प्रमाणात लोकांची उपस्थिती होती आर्णी तहसील कार्यालय ते दत्तारामपुर येथे मोठ्या प्रमाणात रॅली काढण्यात आली होती ..या दरम्यान.. गाव वाचवा शेती वाचवा भविष्य वाचवा!,निम्न पैनगंगा प्रकल्प धरण रद्द करा..! रद्द करा ..! यह सरकार ..! वह सरकार.! दलाल भडवोकी यह सरकार.! जमीन आमच्या हक्काची.! नाही कुणाच्या बापाची.! संविधान के सन्मान में हम उतरे मैदान मे.! धरण म्हणजे ९५ गावाचे मरण तथा बहुजन महापुरुषाच्या समर्थनात तथा बीजेपी,काँग्रेस,आरएसएस यांच्या विरोधात घोषणा देण्यात आल्या होत्या.
या आंदोलनातील विशेष बाब म्हणजे येणाऱ्या ॲम्बुलन्सला त्यांनी रस्ता मोकळा करून देण्यात येत होते.





