पुणे – महाविद्यालयाच्या प्राचार्यांना ब्लॅकमेल करून पोलिसांनी ७ लाखांची खंडणी घेतल्याचा प्रकार समोर आला आहे, या प्रकरणात ३ पोलिस निलंबित करण्यात आले आहेत. या प्रकरणात पुण्यातील रील स्टार सोनाली हिंगे आणि दोन पोलिसांचे निलंबन करण्यात आले आहे. प्राचार्यांकडून ७ लाखांची खंडणी घेतल्याचा आरोप या प्रकरणातील ३ पोलिसांवर करण्यात आला आहे. या घटनेने पुणे शहर पोलीस दलात मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणात रील स्टार म्हणून ओळखली जाणारी पुण्यातील महिला पोलीस कर्मचारी सोनाली हिंगे हिच्यासह ३ पोलिसांचे निलंबन करण्यात आले आहे.
पुणे शहर परिसरातील नामांकित महाविद्यालयाच्या प्राचार्यांना ब्लॅकमेल करून ७ लाखांची खंडणी उकळल्याचा गंभीर आरोप या ३ पोलिस कर्मचार्यांवर केला आहे. या कडक कारवाईत पोलीस उपनिरीक्षक अजित बडे सायबर पोलीस ठाणे, पोलीस शिपाई सुदाम तायडे आणि दामिनी पथकातील सोनाली हिंगे या ३ पोलिस कर्मचार्यांचा समावेश आहे. कर्तव्यातील हलगर्जीपणा आणि बेजबाबदार वर्तन केल्याप्रकरणी पुण्यातील ३ पोलिस कर्मचार्यांवर निलंबनाची कडक कारवाई करण्यात आली आहे. पोलिस विभागीय चौकशी पूर्ण होईपर्यंत हे निलंबन कायम राहणार आहे. या प्रकरणात एका महाविद्यालयातील अल्पवयीन विद्यार्थिनीची काही कागदपत्रे अडकल्याने तिने पोलिसांची मदत घेतली.
मात्र, या प्रकरणात पुण्यातील ३ पोलिसांनी याचाच गैरफायदा घेत विद्यार्थिनीला सोबत घेऊन प्राचार्यांना जाब विचारण्यास सुरुवात केली. पुढे त्यांनी विद्यार्थिनीमार्फत प्राचार्य आणि महाविद्यालयाविरोधात छळाची तक्रार देण्यास भाग पाडले. तक्रारीची भीती दाखवत या ३ पोलिसांनी कॉलेजच्या प्राचार्यांना धमकावले आहे. हे प्रकरण गंभीर आहे, अनेक तक्रारी आहेत. जर केस दाखल झाली तर, तुमच्यावर पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करून अटक करू आणि महाविद्यालयाची बदनामी करू, अशी धमकी देत या ३ पोलिसांकडून १० लाखांची मागणी करण्यात आली आहे. भीतीपोटी या कॉलेजच्या प्राचार्यांनी ७ लाख रुपये दिले, अशी माहिती मिळाली आहे. ही रक्कम ३ पोलिसांनी आपापसांत वाटून घेतल्याचाही आरोप करण्यात आला आहे.
हा संपूर्ण प्रकार पाहून त्या विद्यार्थिनीला संशय आला. आणि तिने धाडस दाखवत पालकांना ही माहिती दिली आहे. त्यानंतर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडे तक्रार करण्यात आली. चौकशीत हा प्रकार उघड झाल्यानंतर बंडगार्डन पोलीस ठाण्यात या तिघांपोलिसांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेनंतर पोलीस आयुक्त यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. या प्रकरणात पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी चौकशीचे आदेश दिले. आणि प्राथमिक तपासात ३ पोलिस कर्मचारी दोषी आहे, हे कळाल्यानंतर पोलीस आयुक्तांनी कडक कारवाई केली आहे, व संबंधित ३ पोलिसांना निलंबित केले आहे. गुन्हेगारांवर वचक ठेवण्याची जबाबदारी असलेल्या पोलिसांनीच वर्दीचा गैरवापर करून खंडणी घेतल्याने पोलिसांवरील विश्वास कमी झाला आहे. या प्रकरणामुळे पुणे पोलीस दलाची प्रतिमा मलीन झाली आहे. या प्रकरणात अधिक तपास पुण्यातील बंडगार्डन पोलिस करत आहेत.





