साडीचं नसल्याचं, गायनं किती अपमान केलं? संतापित कृष्णा आळवणार्‍यानं आपल्या पत्नीला पेटवलं आणि…

SHARE:

बेळगाव : बेळगावजवळील हत्तरवाड गावात एका पतीने गाऊन घातल्याच्या शुल्लक कारणावरून पत्नीला पेटवले. मंजुळा नावाच्या महिलेवर रुग्णालयात उपचार सुरू असून, आरोपी पती कृष्णाजी पाटील याला पोलिसांनी अटक केली आहे. आठ वर्षांपासून सुरू असलेला मानसिक-शारीरिक छळ या अमानवीय घरगुती हिंसाचाराचे भयावह रूप दर्शवतो.

संसारात छोट्या मोठ्या कुरबुरी, भांडणं होतचं असतात. मात्र ते वाद हे तात्पुरते असतात, भांडण मिटवून पुन्हा गुण्या-गोविंदाने राहण्याकडे लोकांचा कल असतो. पण एखाद्या शुल्लक कारणावरून भांडण वाढलं आणि ते जीवघेणं ठरलं तर ? पत्नीने घरात साडी नेसण्याऐवजी गाऊन घातला, या अतिशय शुल्लक कारणावरून भडकलेल्या पतीने, त्याच्या पत्नीसोबत जे केलं त्याने अख्खं गाव हादरलं. साडी नेसण्याऐवजी गाऊन घालणाऱ्या महिलेला, तिच्या पतीने थेट पेटवून दिल्याची भयानक, अमानवीय घटना बेळगाव जवळ घडली आहे. या संतापजनक पण तितक्याच दुर्दैवी घटनेत महिला गंभीर जखमी झाली असूव तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहे. पोलिसांनी आरोपी पतीला अटक केली असून पुढील तपास सुरू आहे.

आठ वर्षांपूर्वी झालं होतं लग्न

समोर आलेल्या माहितीनुसार, कृष्णाजी पाटील असं आरोपी पतीचं नाव असून मंजुळा असं जखमी, पीडित महिलेचं नाव आहे. खानापुर तालुक्यातील हातरवाड गावात ही अमानवीय घटना घडली आहे, जिथे घरात साडीऐवजी गाऊन घातल्याच्या कारणावरून कृष्णाजीने त्याच्या पत्नीसोबत हे नृशंस कृत्य केलं.

आठ वर्षांपूर्वी हत्तरवाडा गावात कृष्णाजी पाटील आणि मंजुळा यांचे लग्न झालं होतं. मात्र असं म्हटलं जातं की लग्न झाल्यापासूनच विकृत कृष्णाजी हा त्याच्या आपल्या पत्नीचा मानसिक आणि शारीरिक छळ करत होता. मात्र त्यावर आता हद्द झाली.

गाऊन घातला म्हणून पेटवलं

काही दिवसांपूर्ली सकाळी ११च्या सुमारासनंदगड गावातील दुर्गानगर येथील भाड्याच्या घरात ही घटना घडली. त्यादिवशी मंजुळाने गाऊन घातला होता. मात्र घरात साडी नेसण्याऐवजी गाऊन का घातला, या शुल्लक मुद्यावरून कृष्णाजीने तिच्याशी वाद घालायला सुरूवात केली. तिला जबर मारहाण केली, मात्र तेवढ्यावरच त्या नराधमाचं समाधान झाल नाही.

रागाच्या भरात विकृत कृष्णाजीने त्याच्याच पत्नीला पेटवून दिलं. यामध्ये मंजुळा गंभीर जखणी झाली. तिचा आवाज ऐकून शेजाऱ्यांनी धाव घेत आग विझवली आणि तिला कसबसं वाचवलं. त्यानंतर शेजाऱ्यांनी घटनेची माहिती तातडीने पोलिसांना दिली. घडलेला प्रकार कळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. भाजल्यामुळे जखमी झालेल्या मंजुळाला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करत पती कृष्णाजी पाटील याला ताब्यात घेत बेड्या ठोकल्या . याप्रकरणी पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे.

Leave a Comment

अधिक वाचा