​पुणे हादरले! वेश्याव्यवसायाचे रॅकेट उघड; ६ बांगलादेशी महिला गजाआड

SHARE:

पुणे – शहरात वेश्याव्यवसायाचा भांडाफोड करण्यात आला आहे. पोलिसांकडून 6 बांगलादेशी महिलांना अटक करण्यात आली आहे. पुणे शहरात ही धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. रविवारी रात्री पुणे पोलिसांनी बुधवार पेठ परिसरात धाड टाकली. या कारवाईत पोलिसांनी वेश्याव्यवसाय सुरू असलेल्या विविध इमारतींमध्ये तपासणी केली. यावेळी पुणे पोलिसांनी 6 विदेशी तरुणींना पकडले आहे. सर्व तरुणींनी बेकायदेशीरपणे भारतात प्रवेश केल्याचे समोर आले आहे.

सर्व तरूणी बुधवार पेठेत राहून वेश्याव्यवसाय करत होत्या. पुणे पोलिसंाकडून 6 तरुणींना अटक केली आहे, तर त्यांची चौकशी सुरू आहे. मागील काही दिवसांपासून पुणे पोलिसांनी शहरात बेकायदेशीरपणे वास्तव्य करणाऱ्या परदेशी नागरिकांविरोधात अकडक कारवाई केली आहे. पुणे पोलीस आयुक्तांच्या आदेशानुसार रविवारी रात्री संपूर्ण पुणे शहरात कोंबिंग ऑपरेशन राबवण्यात आले आहे. यात पुणे पोलिसांनी बुधवार पेठ भागातून बेकायदेशीरपणे वास्तव्यास असणार्या बांगलादेशी महिलांना अटक केली आहे.

पुण्यातील बुधवार पेठेतील सागर बिल्डिंगवर छापा टाकून ही कडक कारवाई करण्यात आली आहे. परिमंडळ 1 चे पुणे पोलीस उपायुक्त ऋषिकेश रावळ यांना मिळालेल्या माहितीच्या आधारे ही कडक कारवाई करण्यात आली आहे. पुण्यातील फरासखाना पोलीस ठाणे आणि खडक पोलीस ठाण्याच्या पुणे शहर संयुक्त पोलिस पथकाने रात्रीच्या वेळी ही कडक कारवाई केली आहे. पुणे पोलिसांकडून या विदेशी महिलांना अटक केल्यानंतर त्यांची प्राथमिक चौकशी केली आहे. या चौकशीत पुणे पोलिसांना महिलांकडून धक्कादायक माहिती मिळाली आहे.

या बांगलादेशी महिलांना सुरुवातीला ब्युटी पार्लर, शिवणकाम किंवा घरकाम अशा चांगल्या नोकऱ्यांचे आमिष दाखवण्यात आले होते. या आमिषाला बळी पाडून त्यांना बेकायदेशीर मार्गाने भारतात आणले गेले आहे. मात्र, पुण्यात आल्यानंतर त्या महिलांना बुधवार पेठ भागात आणले. व इथे त्यांना वेश्याव्यवसाय करण्यास सांगितले आहे. यावेळी संबंधित 6 बांगलादेशी महिलांना फसवून भारतात आणले आहे. आणि या महिलांना वेश्याव्यवसायात सामील केले आहे. ही माहिती पुणे पोलिसांच्या तपासात समोर आली आहे. या महिलांवर पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे.

त्या महिलांना भारतात कोणी आणले? या परदेशी महिलांनी भारताची सीमा कशी ओलांडली? आणि भारतात राहण्यासाठी आवश्यक असणारी बनावट कागदपत्रे कशी मिळवली? याचा तपास पुणे पोलीस करत आहेत. गेल्या 11 महिन्यांत पुणे पोलिसांनी पुणे शहराच्या विविध भागांतून 103 बेकायदेशीर बांगलादेशी नागरिकांना अटक केली आहे. कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर या सर्व लोकांना त्यांच्या मायदेशी परत पाठवण्यात आले आहे. या प्रकरणात अधिक तपास पुणे शहर पोलिस करत आहेत.

विवेक गंगाधरराव राऊत
Author: विवेक गंगाधरराव राऊत

Cheif Editor, Rayat Rakshak News, Maharashtra.

Leave a Comment