सांगली – जिल्ह्यात 64 वर्षीय व्यक्तीने अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणात आरोपीविरोधांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सांगली शहरातील एका उपनगरातील अल्पवयीन मुलीवर 64 वर्षीय व्यक्तीने लैंगिक अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. आरोपीने ओळखीचा गैरफायदा घेत अल्पवयीन मुलीला आमिष दाखवून घरी बोलावले आणि अल्पवयीन मुलीवर अत्याचार केला आहे.
सांगली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार तो 64 वर्षीय व्यक्ती त्याच्या मुलासोबत राहत होता. तो फिरून गाड्या दुरुस्तीचे काम करत होता. काही कारणास्तव त्याची त्या अल्पवयीन मुलीशी ओळख झाली. हा आरोपी सुधीर नाईक हा अधूनमधून घरी एकटे असताना अल्पवयीन पीडित मुलीला खाऊ देण्याचे आमिष दाखवून घरी बोलावून घेत होता. नोव्हेंबर-डिसेंबर 2025 या काळात आरोपी सुधीर नाईक याने पीडित अल्पवयीन मुलीवर अनेक वेळा लैंगिक अत्याचार केल्याचे उघड झाले आहे.
या प्रकाराची कुठेही वाच्यता करू नकोस, असे आरोपीने पीडित अल्पवयीन मुलीला धमकावले होते. त्यानंतरही आरोपी सुधीर नाईक याने अनेक वेळा त्या पीडित अल्पवयीन मुलीशी शारीरिक संबंध ठेवल्याचे समोर आले आहे. काल पीडित अल्पवयीन मुलीच्या पोटात दुखू लागल्याने तिला सांगलीत हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. त्यावेळी ती अल्पवयीन मुलगी 27 आठवड्यांची गर्भवती असल्याचे स्पष्ट झाले आहे. आपली अल्पवयीन मुलगी गर्भवती असल्याचे समोर येताच तिच्या पालकांना धक्का बसला आहे.
पालकांनी पीडित मुलीला विश्वासात घेऊन तिची चौकशी केल्यानंतर पीडित मुलीने एकूण घडलेला प्रकार सांगितला आहे. त्यानंतर या घटनेची नोंद सांगली शहरातील विश्रामबाग पोलिस ठाण्यात झाली. व आरोपी विरोधात विश्रामबाग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निरीक्षक सुधीर भालेराव यांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन संशयित आरोपी सुधीर नाईक याचा शोध घेण्याचे आदेश पोलिसांना दिले. सांगली पोलिस ठाण्याकडील गुन्हे विभाग शाखेने आरोपीला अटक केली आहे. या प्रकरणात अधिक तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक कविता नाईक तपास करत आहेत.
Author: विवेक गंगाधरराव राऊत
Cheif Editor, Rayat Rakshak News, Maharashtra.






